नमस्कार मित्रांनो.
मिथुन ही राशिचक्रातील तिसरी रास असून बुध हा वायु तत्वाचा ग्रह या राशीचा स्वामी ग्रह आहे. जो अतिशय बुद्धिमान ग्रह मानला जातो. या राशीचा बोधचिन्ह म्हणजे एकमेकांशी संवाद साधत असलेली स्त्री पुरुष जोडपे.
संवाद बोलन प्रचार प्रसार या सर्वांचा अर्थ या बोधचिन्हातून आपल्याला ठळकपणे जाणवतो. मित्रांनो अगदी तसा स्वभाव असतो मिथुन राशीच्या लोकांचा. संवाद साधणं बोलणं हा नैसर्गिक स्थायी स्वभाव आहे. तो या मिथुन राशीच्या मंडळींचा असतो.
चला आता जाणून घेऊ मिथुन राशीच्या मंडळींना मे महिना कसा जाणार आहे. त्यांच्या आयुष्यात काय काय घडणार आहे. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा सांभाळ असल्यामुळे एखादी गोष्ट कशी सादर करावी ही यांच्याकडून शिकण्यासारखे असते.
ही मंडळी उत्कृष्ट नकलाकार असतात. तसेच नाटक-सिनेमा या क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटवतात. कौटुंबिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी बंध अधिक मजबूत होतील. काही गोष्टींबाबत मतभिन्नता असू शकते.
परंतु ते परस्पर सामंजस्याने सोडवले जातील. या दरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्या. कारण ते अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्यावर समाधानी असतील. आणि कोणाच्याही मनात चुकीची भावना राहणार नाही.
शेजार्यांसोबत काहीतरी नवीन करण्याचा विचार तुम्ही करू शकता. ज्यामुळे तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल. गेल्या महिन्यात तुमच्या व्यवसायात मंदी सुरू होती ती या महिन्यात फायद्यात बदलेल. तुम्हाला फक्त सतर्क राहण्याची गरज आहे. जेणेकरून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातून नफा मिळवू शकता.
त्याच बरोबर खर्च कमी करण्याकडे देखील लक्ष द्या. आणि पैशांची बचत जास्त करा. जी लोकं सरकारी नोकरी करत आहेत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही परंतु खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर तुम्हाला नवीन क्षेत्रातून ऑफरदेखील मिळू शकते.
ज्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल असेल. आम्ही सध्या अविवाहित असाल तर या महिन्यात तुम्हाला नीराश पाहावं लागेल. जर तुम्ही आधीच एखाद्याशी नातेसंबंधात असाल तर तुमचा तुमच्या जोडीदारावरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे परस्पर मतभेद वाढतील.
विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि दोघांचा एकमेकांवरील विश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील रणनीतीवर ही चर्चा करायल. लग्नाची वाट पाहत असलेल्या लोकांना त्यांच्या मित्राकडून लग्नाचे प्रस्ताव येतील.
महिन्याच्या मध्यभागी पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात. जसं की उलट्या-जुलाब बद्धकोष्ठता गॅस त्यामुळे जेवणाची विशेष काळजी घ्या. बाहेरचे अन्न खाणं टाळा. शक्यतो फक्त घरगुती आणि पौष्टिक आहार घ्या. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या.
महिन्याच्या मध्यात एखादी गोष्ट मनाला अस्वस्थ करु शकते. त्यामुळे मनसोक्त राहण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमची वागणूक मवाळ ठेवा. नाही तर अस्वस्थता वाढेल. जर तुम्ही मनातल्या गोष्टी कोणाची शेअर केल्या तर त्याचे चांगले परिणाम मिळतील.
पण विश्वास व्यक्ती जवळच मन मोकळे करा. मे महिन्या साठी मिथुन राशीचा भाग्यशाली अंक आहे 5 आणि भाग्यशाली रंग असेल निळा. त्यामुळे या महिन्यात या रंगाला प्राधान्य द्या.
कुटुंबातील एखादा सदस्य विनाकारण तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल. अशावेळी तुम्ही जरा संयम आणि हुशारीने हाताळा तर तुमचा कोणीही गैरफायदा घेऊ शकणार नाही. त्यामुळे आधी त्या गोष्टींची जाणीव असू द्या.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.