Skip to content

मिन राशीच्या लोकांबद्दल जाणून घ्या काही खास माहिती. त्यांचा स्वभाव, सवय, प्रेम..!

  • by

नमस्कार.

मित्रहो मिन रास ही राशीचक्रातील अखेरची रास आहे, मिन राशीच्या प्रतीक चिन्हात आपणाला दोन मासे उलट पोहताना दिसतात. हे मासे बहुमुखी आहेत म्हणून आपल्यातही अनेक लक्षणे दिसून येतात. आपण समुद्रातील माशा प्रमाणे खतरनाक असू शकता किंवा मग तलावातील माशा प्रमाणे विनम्र असू शकता. 

तसेच आपणाला स्वतंत्र राहायला नेहमी आवडते. समूहात असताना देखील आपण स्वतंत्रला प्राधान्य देत असतो. आपण आळशी व स्वार्थी देखील असू शकता. आपणाला आराम करणे पसंद असते, कामातून नेहमी विसावा मिळावा असे वाटते. लोकांशी सहज मिळते जुळते होता, कोणाचाही तुमच्यावर लगेच प्रभाव पडतो. लगेच आपण प्रभावित होत असता. 

जोपर्यंत आपण आपले हित साधत नाही तोपर्यंत आपण आपल्या मित्राच्या हिताची काळजी करत नाही. आपण जगातील सर्वात हीन चरित्र असू शकता जे अतिशय निंदनीय आहे. आपण विनम्र आणि दयाळू आहात. आपणाला दुःखी कष्टी लोकांची लगेच दया येते. 

त्यांना मदत करावी असे लगेच वाटते आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील देखील असता. आपण संवेदनशील असता. त्यामुळे स्वभाव भावनिक देखील खूप असतो, प्रत्येक बाबतीत भावना सहज गुंततात. अनेकांशी आपली भावनिक मैत्री संबंध जास्त असतात. 

आपण लवचिक असल्याने सहजपणे कोणाशीही मैत्री करू शकता. तसेच आपण दयाळू, सहिष्णू आहात. आपली काल्पनिक शक्ती जास्त असते, कल्पनेत वावरणे आपणास आवडते मात्र जेव्हा आपला सत्याशी सामना होतो, वास्तविक जगात तुम्ही ज्यावेळी परत येता त्यावेळी तुम्हाला स्वतःला सावरावे लागते. 

आपण आपल्या काल्पनिक जगात कुढत राहण्याचा नेहमी प्रयत्न करता. आपला मुख्य ग्रह नेपच्यून असून,नेपच्यून ग्रह समुद्राची देवता असून सत्याच्या विभाजनाचे प्रतीक आहे.तो एक रहस्यमय असून अध्यात्मिक आहे. ते आपण आपल्या पंचइंद्रियांनी जाणून घेऊ शकत नाही.

बारावे घर मिन राशीचे आहे, हे घर भावना ,समर्पण आणि रहस्यमय आहे. हे एक असे स्थान आहे जिथे आपण आपल्या मर्यादेच्या विरोधात जाऊन पाहू शकतो की आपण काय चूक भूल केली आहे आणि त्याला पूर्ववत कसे करावे. आपली प्रमुख ताकद आपली कल्पना शक्ती आहे.

म्हणूनच आपण निर्माता आहात.आपण गर्विष्ठ नसून लवचिक आहे. त्यामुळे सहजपणे परिस्थितीशी एकजूट होता. आपण दानशूर असता. लोकांना मदत करण्याची इच्छा नेहमीच आपणाला होत असते. तसेच आपण दयाळू, सहिष्णू आणि प्राथमिक आहात. आपण निष्क्रिय आणि खूप जास्त भोळे असू शकता.

म्हणून आपण दुसऱ्याच्या स्वार्थापोटी सहज शोषित होता. आपण अत्यंत भावुक, अनिश्चयवादी आणि पळपुटे आहात. मित्रहो आपला स्वभाव उत्तम आहे, मात्र काही त्रुटी देखील त्यामध्ये आहेत. 

आजची ही माहिती आपणाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा, लेख आवडला असेल तर इतरांना देखील लगेचच शेअर करा तसेच लाईक करायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *