Skip to content

मीन रास जुलै महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मीन राशीसाठी जुलै महिना यश देईल का? करियर मध्ये त्यांना यश मिळेल का? कुटुंबातील वातावरण कसे असेल? चला हे सविस्तर जाणून घेऊया.

मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना नक्कीच यश येणारा असणार आहे. १० व्या भावाचा स्वामी गुरु पहिल्या भावात राहिल्यास करियरचा आलेख मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. गुरु आणि मंगळाची पंचम भावावर पूर्ण दृष्टी असेल. पंचम भाव हा विद्या अभ्यासाचा भाव आहे. 

गुरुचे स्वतःच्या राशीत असणे देखील या राशीच्या लोकांना शुभ ठरणार आहे. यावेळी शनि ग्रहाची पूर्ण दृष्टी दुसऱ्या ग्रहावर असल्यामुळे कौटुंबिक कलह दूर होतील. मात्र प्रेम जीवनात काही अडचणी येऊ शकतात. पंचम भावात मंगळाची पूर्ण दृष्टी असल्यामुळे प्रियसी सोबत भांडणाचे योग येऊ शकतात. नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

थोड शांततेत घ्या. आर्थिक परिस्थिती ठीक राहील पण दहाव्या घरात शनी असल्यामुळे खर्चात वाढ होईल. अपघाताच्या बाबतीतही सावध राहावे लागेल. सहाव्या भागात शनीची पूर्ण दृष्टी असल्यामुळे काही जुने आजार त्रास देऊ शकतील. मीन राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला जाणार आहे. 

महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमच्या राशीनुसार दशम घराचा स्वामी गुरु पहिल्या घरात राहणार आहे. आणि त्यामुळे तुमचे करिअर सर्व बाबतीत मजबूत होईल. त्यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व अडचणी सुद्धा दूर होतील. नोकरी येणाऱ्या अडचणींपासून आराम मिळेल. 

नोकरीचे नवे मार्ग सुद्धा खुले होतील. दशम भावात सूर्य आणि बुधाची दृष्टी असल्यामुळे सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना महिन्याच्या पूर्वार्धात यशप्राप्ती होईल. नोकरीत पदोन्नती चे योग आहेत आणि पदोन्नती बरोबर स्थान बदलाचे सुद्धा योग आहेत. ठिकाण बदलल्याने तुमचे करिअर वेगळे वळण घेईल. 

महिन्याच्या उत्तरार्धात शुक्राचे सहाव्या भावात आणि सूर्याचे पाचव्या भावात ब्राह्मण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. खासगी क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. 

तुमचे स्पर्धकही तुमच्या प्रतीमेचे कौतुक करतील. यादरम्यान तुमची सगळीच प्रलंबित काम पूर्ण होतील. परदेशी व्यवसाय आणि परदेशी नोकरी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना तर हा काळ चांगलाच राहणार आहे. 

नवीन योजनांसह तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकाल. मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो चांगला जाणार आहे. महिन्याच्या पूर्वार्धात उत्पन्नाचे चांगले योग दिसत आहेत. स्थानिकांना गुप्तधन ही मिळण्याचे संकेत आहेत.

अकराव्या घरात स्वामी शनीच्या बाराव्या घरात तुमच्या स्वतःच्या स्थितीत असल्याने तुम्हाला सावध मात्र राहावं लागेल. या काळात तुम्ही फार खर्च करू शकता. या महिन्याचा पूर्वार्ध मात्र हुशारीने घालावा आणि अनावश्यक खर्च टाळा.

महिन्याच्या पूर्वार्धात सूर्याचे पंचम भावात जाणारे आणि अकराव्या भावात पूर्ण दृष्टीने पहाणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातून आणि व्यवसायातून व्यापारातून चांगला पैसा मिळू शकेल. आणि याउलट मंगळ आणि राहूची दुसऱ्या घरात युती होत असल्याने तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा पूर्ण लाभ मिळू शकणार नाही.

जमीन मालमत्तेतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. सरकारी कामातही पैशाचा मार्ग मोकळा होईल. यावेळी गुंतवणुकीबाबत सावध राहणे गरजेचे आहे. जमीन किंवा स्थिर मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अंधविश्वास टाळा.

मीन राशीच्या लोकांना या महिन्यात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या महिन्यात सहाव्या भावात शनीची पूर्ण दृष्टी असल्यामुळे काही जुने आजार तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. साधे दुखी सारख्या समस्या तुम्हाला तनाव देऊ शकतात. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत ताबडतोब असा सल्ला घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल.

महिन्याच्या उत्तरार्धात पंचम भावात सूर्याचे भ्रमण असेल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या तब्येतीत सुधारणा होईल. बऱ्याच काळापासून आजारी असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला असेल. आणि तुमचे आरोग्य सुधारेल. यादरम्यान तुम्हाला चांगले चांगले खाण्याकडे मात्र लक्ष द्यावे लागेल. अर्थात पौष्टिक आहार घ्यावा लागेल. 

यावेळी तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवु नका. तुझ्या जोडीदाराचे गांभीर्याने ऐका आणि स्वतःहून सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. मस्करी करताना कडवट भाषा वापरण टाळले तर बर होईल. चांगली गोष्ट ही आहे की, पाचव्या भावात बृहस्पति पूर्ण असल्यामुळे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवाल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *