Skip to content

मेष रास- २०२३ मध्ये या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. जाणून घ्या नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य, कुटुंब. माहिती.

नमस्कार मित्रांनो.

२०२३ हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. आणि यावर्षी मेष राशींच्या व्यक्तींच्या जीवनात नक्की काय काय घडणार आहे? यंदा तरी जे अविवाहित आहेत त्यांची लग्न होतील का? नोकरी मिळेल का? ज्यांना नोकरीत बढती हवी आहे ती त्यांना मिळेल का? करियर कसं असेल? कौटुंबिक पातळ्यांवर काही बदल होतील का? चला हे जाणून घेऊया.

सगळ्यात आधी समजून घेऊ आर्थिक बाजू- २०२३ संपूर्ण वर्षात मेष राशींच्या व्यक्तींची आर्थिक प्रगती होईल . तसेच त्यांना आर्थिक स्थिरता ही येईल. नक्कीच हा विचार तुमच्या मनाला सुखावून गेला असेल. पण खर्च मात्र कायम राहणार आहे. अकराव्या भावात शनि महाराजांची उपस्थिती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल आणि तुमचे उत्पन्नही उत्तरोत्तर वाढेल.

परंतु बाराव्या भावात असलेल्या गुरूमुळे धार्मिक आणि इतर कार्यांमध्ये खर्च होत राहील. तुम्ही खूप परोपकारही कराल. ऑक्टोंबर ते डिसेंबर गुरु बाराव्या भावात प्रवेश करेल. तेव्हा उधळपट्टीचा काळ सुरू होईल. आणि त्या काळात तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.

खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कारण अनावश्यक खर्चामुळे तुम्ही आर्थिक दबावात येऊ शकता. म्हणजे पैसा भरपूर येणार आहे आर्थिक स्थिरता ही येणार आहे पण तुम्ही असाच खर्च करत राहिला तर मात्र तुमच्यावर दबाव येईल.

आता पाहूयात नोकरी आणि व्यवसाय- २०२३ मध्ये मेष राशींच्या लोकांच्या करिअरच्या दृष्टीने विचार करता चांगलेच परिणाम मिळतील. वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमची गाडी वेगाने रुळावर धावू राहील.२०२२ मध्ये ज्या गोष्टी मनात तुम्ही ठेवल्या होत्या पण त्या करता आल्या नाहीत त्या आत्ता २०२३ मध्ये पूर्ण होतील.

तुमच्या नोकरीत ज्या अडचणी येत होत्या त्या सुद्धा दूर होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ आणि सहकार्य दोन्ही तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या सहकर्मचाऱ्यांचे सुद्धा चांगले सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या नोकरीत चांगली कामगिरी करू शकाल. आणि तुमची पदोन्नती सुद्धा होऊ शकते. साधारण मार्च ते ऑगस्ट च्या दरम्यान. चांगल्या पदासह तुम्हाला चांगला पगारही मिळेल.

ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल आणि तुमच्या करिअरमध्ये एकंदरीतच प्रगती पाहायला मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता हे वर्ष चढउताराचा असेल. तुमच्या बिझनेस पार्टनर सोबत तुमच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतात. त्यांना थोडा पाठिंबा द्या आणि त्यांच्यासोबत राहा. मात्र त्याबरोबरच त्यांच्या हालचालींवर ही लक्ष ठेवा.

असं केल्याने तुमचा व्यवसाय हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल पासून व्यवसायात तेजी यायला लागेल. आणि वर्षाच्या शेवटच्या काळातही तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. कौटुंबिक विचार करता तुम्ही तुमच्या कामात जास्त व्यस्त असाल आणि त्यामुळे कुटुंबाला वेळ कमी द्याल. इतकच काय कामामुळे तुम्हाला कुटुंबापासून दूर सुद्धा जायला लागेल.

अशा परिस्थितीमुळे तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास सुद्धा होईल. परंतु वर्षाच्या मध्यात तुमचं लक्ष कुटुंबाकडे वळेल. घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन होईल. आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढेल. कुटुंबातील वातावरण धार्मिक आणि अध्यात्मिक राहील.

एकंदरीतच तुमच्या कुटुंबामध्ये यावर्षी आनंदी आनंद राहील. बघुयात अविवाहित लोकांसाठी हे वर्ष कसं असेल
यावर्षी मेष राशींच्या अविवाहित तरुण-तरुणींचा लग्न होण्याचे योग आहेत मे महिन्या पासून तुमच्या लग्नाच्या चर्चा सुरू होतील आणि वर्षाच्या शेवटच्या म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान तुमचा विवाह होऊ शकतो.

त्या दृष्टीने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आरोग्याच्या दृष्टीने मात्र २०२३ मेष राशीसाठी फारसा अनुकूल नाही. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील.त्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घ्या. नियमित व्यायाम करा आणि त्याचबरोबर वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या.

आता बघुयात यावर्षी जे काही चढ-उतार मेष राशींच्या आयुष्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांनी ज्योतिषीय उपाय काय करावे. जर २०२३ यावर्षी तुम्ही मंगळवारी दर मंगळवारी हनुमान चालीसा किंवा बजरंग बली चा पाठ केला तर नक्कीच हे वर्ष तुम्हाला चांगलं जाईल.

बुधवारी एखाद्या धार्मिक स्थळी काळे तीळ सुद्धा दान करा. शक्य असल्यास गुरुवारी उपवास करा. आणि रोज स्नान केल्यानंतर कपाळावर हळद किंवा कुंकू लावा .
या उपायांनी २०२३ मध्ये येणारे छोटे-मोठे चढ-उतार तुम्हाला सोपे जातील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *