Skip to content

या मंदिरात २० हजार उंदीर रहस्य काय? भक्त उंदरांचा उष्टा प्रसाद का खातात?

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरात एकही उंदीर दिसला तर तुम्हाला भीती वाटेल अस्वस्थ वाटेल. तुम्ही त्याला तुमच्या घरातून हाकलून देण्याचे प्रयत्न कराल. कारण प्लेग सारख्या अनेक भयानक रोगांचं कारण उंदीर असतो. पण तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का? आपल्या भारतात एक देवी मातेचा असं मंदिर आहे जिथे तब्बल वीस हजार उंदीर राहतात. आणि या मंदिरात येणाऱ्या भाविकांना चक्क उंदरांनी खाल्लेला प्रसाद देण्यात येतोय.

राजस्थान मधील बिकानेर मध्ये हे मंदिर आहे ज्याची सध्या खूप चर्चा आहे. हे जगातील उंदरांचं एकमेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात असलेल्या एवढ्या उंदरांच काय रहस्य आहे. आणि अशी कोणती गोष्ट आहे जिथे फक्त उंदरांचा उष्टा प्रसाद तर खातात मात्र त्यांना कोणताही रोग होत नाही. चला तर पुन्हा एकदा माहीतीला सुरुवात करूया तो शेवटपर्यंत नक्की पहा.

पौराणिक ग्रंथ हिंदू धर्मात ३३ कोटी देवतांचे उल्लेख आहे. आणि प्रत्येक भक्त आपापल्या पद्धतीने आणि श्रद्धेने पूजा करतो. शिवाय हवा पृथ्वी पाणी आणि पक्षी इत्यादींची ही देवता म्हणून पूजा केली जाते. आणि त्यांच्या मंदिरांबद्दल आपण अनेकदा ऐकलेही असेल. मात्र उंदरांची पूजा किंवा उंदरांनी खाल्लेला प्रसाद तुम्ही खाल्लाय का.

हे मंदिर राजस्थानच्या ऐतिहासिक शहर बिकानेर पासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या देशनोक येथे स्थित आहे. ज्याला उंदरांची माता किंवा उंदरांच मंदिर देखील म्हटले जाते. जी बिकानेर राजघराणीचीच कुलदेवी आहे. याच देवीच्या आशीर्वादाने बिकानेर आणि जोधपुर या संस्थानाची स्थापना झाली असे म्हणतात. करणी मातेचे सध्याचे मंदिर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बिकानेर संस्थानातील महाराजा गंगा सिंग यांनी बांधल होत.

हे मंदिर त्या वीस हजार काळ्या आणि काही पांढऱ्या उंदरांसाठी प्रसिद्ध आहे. जे या मंदिरात राहतात आणि ते पूजनीय मानले जातात. इथे उंदीर हे पवित्र मानले जातात. आणि त्यांना कबबा असे म्हणतात. येथील उंदरांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक भाविक या मंदिरात दूर दुरून येतात. मुघल शैलीतील हे मंदिर बांधण्यासाठी संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आलाय.

या मंदिरातील उंदरान व्यतिरिक्त संगमरवरी मुख्य गेटवर केलेली उत्कृष्ट कारागिरी मुख्य गेटवरील चांदीची मोठे दरवाजे मातीचा सोन्याचा छत आणि उंदरांच्या प्रसादासाठी ठेवलेली मोठी चांदीची ताट हे ही मुख्य आकर्षण आहे. हे मंदिर पौराणिक आणि लोककथांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर उच्च श्रद्धेचे ठिकाण मानले जात.

येथे अनेक भाविक देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. असाही समज आहे की इथे उंदीर मारल्यास त्याच्या जागी चांदीचा उंदीर बसवावा लागतो. करणी माता मंदिराच्या गर्भगृहात विराजमान आहे. करणी मातेच्या एका हातात त्रिशूल आहे. त्याच्या सोबतच त्यांच्या दोन्ही बहिणी बसलेल्या आहेत. मंदिराची संपूर्ण रचना संगमरवरी असून त्याची वास्तू मोघल शैलीशी मिळती जुळती आहे.

या मंदिराचा मुख्य दरवाजा घनचांदीस आहे. मंदिराच्या आत अनेक चांदीचे दरवाजे देखील आहेत. ज्याच्यावर या मंदिराच्या इतिहासाशी संबंधित कलाकृती कोरली आहे. १९९९ मध्ये हैदराबादचे ज्वेलर्स कुंदलाल वर्मा यांच्या मदतीने हे मंदिर आणखी शोभित केल गेल. आणि संगमरवरी नक्षीकाम आणि चांदीचे उंदीर देखील त्यांनी मंदिराला दान केले. आश्चर्याची बाब म्हणजे इतके उंदीर होऊ नये मंदिरात दुर्गंध अजिबात येत नाही.

आजपर्यंत कोणताही आजार इथे पसरलेला नाही. शिवाय उंदरांचा उष्टाप्रसाद खाऊन आजवर एकही भावीक येथे आजारी पडलेला नाही. इतकच नाही तर काही दशकांपूर्वीची प्लेगची साथ भारतभर पसरली होती तेव्हाही या मंदिरात भाविकांची जत्रा असायची. आणि ते उंदरांनी तयार केलेल्या प्रसाद खात होते. करणी मातेबद्दल एक अख्यायिका आहे. ज्यांना भक्त माता जगदंबेचा अवतारही मानतात.

करणी मातेचा जन्म १३८७ मध्ये एक चरण कुटुंबात झाला असे सांगितले जात. त्यांच बालपणीच नाव रीघूबाई रीघूबाईचा विवाह कीपोजीचरणाशी झाला होता. लग्नानंतर लगेच असतीला संसारिक जीवनाचा कंटाळा आला म्हणून तीन कीपोजीचरणाचा विवाह तिची लहान बहिण गुलाबीशशि केला.आणि आईच्या भक्ती मध्ये आणि लोकांच्या सेवेत स्वतःला झोकून दिल.

लोककल्याण अलौकिक कार्य आणि चमत्कारिक शक्तीमुळे स्थानिक लोकांनी रीघूजीबाईची करणी माता नावाने पूजा करू लागले. सध्या हे मंदिर जिथे आहे तिथे करणी माता आपल्या आवडत्या देवीची पूजा करत असे. हे गुहा आजही मंदिराच्या आवारात आहे. १५१ वर्ष जगल्यानंतर २३ मार्च १५३८ करणी माता ज्योतिर्लिंग झाली अस म्हणतात. त्यांच्या ज्योतिर्लिंगानंतर भक्तांनी करणी मातेची मूर्ती स्थापन केली. आणि त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली. जे तेव्हापासून सुरू आहे.

आता उंदरांबद्दल बोलायचं झालं तर मंदिराच्या आत उंदरांसाठी एक छत आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वत्र उंदीर दिसतात. मंदिराच्या आतील मुख्य मूर्तीवर जाण्यासाठी तुम्हाला पाय ओढत चालाव लागत. यावरून उंदरांची संख्या किती आहे याचा अंदाज लावता येतो. कारण पाय वर ठेवला तर उंदीर खाली येऊन जखमी होऊ शकतात. आणि ते अशुभ मानले जात. या मंदिरात वीस हजार काळ्या उंदरांसह पांढरे उंदीरही आपल्याला या मंदिरात पाहायला मिळत आहेत.

मात्र हे उंदीर अधिक पवित्र मानले जातात. असा विश्वास आहे. की जर तुम्हाला पांढरा उंदीर दिसला तर तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. मात्र हे पांढरे उंदीर तुम्हाला सहजासहजी दिसत नाहीत. याबरोबर मंदिराची काही रंजक कथाही आहेत. स्थानिक कथेनुसार इथे वीस हजार सेविकांचा सैन्य युद्धातून पाठ फिरवून देशमुख गावात पळून गेल.

युद्धात पाठ दाखवून हे सैन्या इकडे आल्यान करणी मातेला कळाल्यावर मातेने त्या सर्व सैनिकांना शिक्षा म्हणून उंदीर बनवलं. त्या बदल्यात सैनिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. आणि देवीची नेहमी सेवा करण्याचे वचन दिल. स्वतः करणी माता आणि तिची चार मुले म्हणून पांढरे उंदीर तुम्हाला इथे पाहायला मिळतात.

शिवाय पांढऱ्या उंदरांबद्दल असेही सांगितले जाते की नवस मागितलेल्या व्यक्ती देवीच्या मंदिरात आला आणि उद्या त्याच्या पायाला स्पर्श करून गेला तर असा विश्वास आहे की नवस स्वीकारला गेला आहे असं समजाव. आता वीस हजार उंदरांमध्ये फक्त चार पांढरे उंदीर आहेत. भक्तांचे डोळे या पांढऱ्या उंदरांना शोधत असतात. असे म्हणतात जेव्हापासून हे मंदिर इथे बांधल गेल आहे.

तेव्हापासूनच इथे उंदरांचा वावर आहे. त्यांची संख्या वाढलीही नाही आणि कमीही झाली नाही. उंदीर डोक्यावर चढला तर ते शुभ मानलं जात. मांजर किंवा गरुड उंदरांना इजा करू नाही म्हणून मंदिराला चारही बाजूने बारीक जाळी लावली आहे. उंदीर स्वतः परिसरा बाहेर जात नाही. या मंदिरात इतर मंदिरांप्रमाणे पुजारी नाही.

चरण घराण्यातील सदस्यच या मंदिराची देखभाल करतात. नवरात्रीच्या काळात इथे मोठी गर्दी पाहायला मिळते मंदिरात फक्त नवरात्र आणि उपनवरात्र साजरी केली जाते माता करणी ला दुर्गेचा अवतार म्हटलं जात. बिकानेर मध्ये कोणतेही संकट आलं तर आई करणी तिचं रक्षण करते असं म्हणतात.

आता या मंदिरात पोहोचायचं कसं तर करणी माता मंदिरापर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे. बिकानेर ते देशनोक हे अंतर ३० किलोमीटर आहे. तिथे बस ट्रेन टॅक्सी इत्यादी तिथे पोहोचू शकतात. जर तुम्हाला स्वतःच्या मार्गाने जायचं असेल तर मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे.

तुम्ही वाटेत उंदरांच मंदिर म्हणून कोणालाही विचारपूस केली तर तुम्ही मंदिरात पोहोचले म्हणूनच समजा. तर करणी मातेच्या मंदिराबद्दल आणि वीस हजार उंदरांबद्दल तुम्हाला ही माहिती होती का. किंवा तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *