Skip to content

राहूचा गोचर ‘या’ राशीं समोर आवाहन. जाणून घ्या उपाय आणि सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो.

राहू आणि केतू जेव्हा जेव्हा आपल्या राशीचे परिवर्तन करतात तेव्हा त्याचा संपूर्ण बारा राशींवर प्रभाव पडत असतो. हे दोन्ही ग्रह यावर्षी आपली राशी बदलणार आहे. त्यांच्या संक्रमणास दीड वर्षाचा कालावधी लागतो आणि हाच कालावधी ३० ऑक्टोबरला संपणार आहे. या वर्षाच्या अखेरीस दोघेही मीन राशीत प्रवेश करतील. दोन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे काही राशींना त्रास सहन करावा लागू शकतो.

मात्र त्यासाठी काही ज्योतिषी उपाय देखील सांगण्यात आले आहे. हे केल्यास राहूचा प्रभाव बरीच अंशी कमी होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि कोणत्या उपायाने राहूचा प्रभाव कमी करता येईल.

राहू आणि केतू हे छायाग्रह मानले जातात आणि नेहमी ते उलटे फिरत असतात. ज्योतिष शास्त्रात या दोन्ही ग्रहांना अशुभ ग्रह मानले जातात. त्यांच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते.

१) मेष रास – राहूचे संक्रमण मेष राशीसाठी प्रत्येक क्षेत्रात उलथापालत करू शकते. मेष राशीने सावध राहणं आवश्यक मानले गेले आहे. फक्त या राशींच्या लोकांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. निरर्थक वाद विरोधापासून दूर राहावे. असा ज्योतिषीय सल्ला देण्यात येतो.

२) वृषभ रास – राहू वृषभ राशित १२ व्या भागात गोचर करेल. म्हणून खर्च वाढतील. आरोग्य गडबडू शकेल. तर वृषभ राशीची लोक कोणत्याही प्रदेशाची संबंधित व्यवसाय करीत असाल तर तुम्हाला आधी काळजी घ्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला नुकसानही होऊ शकत. सोबतच वृषभ राशीचे लोक नोकरी करत असेल तर यांनी वादविवादापासून दूर राहाव अस सांगितल जात.

३) सिंह रास – सिंह राशीच्या नवव्या घरात स्थित राहू आहे. या काळात कुटुंबात वाद होऊ शकतो आणि प्रवासात जास्त खर्च होऊ शकतो. नशीब साथ देणार नाही. नोकरी व्यवसायात आव्हानांना सामोरे जावे लागू शकतो. यासोबत सिंह राशीला अधिक संघर्ष करावा लागू शकतो.

४) कन्या रास – राहू कन्या राशीच्या आठव्या भावात प्रवेश करतोय. नोकरी व्यवसायात मेहनत घ्यावी करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शिवाय हा काळ कन्या राशीसाठी आव्हानांनी भरलेला असेल.

५) मकर रास – मकर राशीत राहू चौथ्या घरात संघर्षाला चालना देणारे आहे. नोकरी नोकरी करिअर मालमत्ता आणि आईच्या आजारासाठी हा काळ वाईट मानला जातो. मकर राशींच्या व्यक्तींना नोकरी करियर आणि इतर बाबतीतही अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

६) मीन रास – मीन राशीत राहून दुसऱ्या भावात भ्रमण करतोय . या काळात मीन राशीला अचानक काही खर्चाचा सामना करावा लागू शकतो. मीन राशीच्या बोलण्यात काही कटूता येऊ शकते. कुटुंबातील कोणाशी तरी संबंध बिघडू शकतात. त्यासोबतच मीन राशींच्या व्यक्तींना आरोग्य बाबतीतही काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मीन राशींच्या लोकांनी काही सतर्क राहणे आवश्यक मानले गेले.

तस पाहता राहू आणि केतू राशी परिवर्तनामुळे सर्वच १२ राशींवर परिणाम होणार आहे. त्याच्या परिणामामुळे आयुष्यात समस्या उद्भवणार आहे. त्यासाठी काही ज्योतिषी उपाय सांगण्यात आले आहेत.त्यामुळे कमी करता येईल. उपाय पुढील प्रमाणे करून पहावेत.

१) गुरूंचे उपाय करावेत म्हणजेच केसचा तिलक लावावा, मंदिरात पिवळ्या वस्तूंच दान कराव आणि गुरुवारी उपवास करावा. २) तामसिक भोजन आणि मधिरा पान टाळाव. ३) हनुमान चालीसाचे पठण करत राहावे. ४) वाणी आणि क्रोध यावर ताबा ठेवावा.

५) कोणाबद्दलही वाईट बोलू नये आणि कोणाचेही नुकसान करू नये. ६) यासोबतच आपले विचार नियोजना गुप्त ठेवावेत. ७) सासरच्या मंडळींची चांगले संबंध ठेवावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *