Skip to content

रुद्राक्ष धारण करण्याची असंख्य फायदे! जाणून घ्या रुद्राक्ष धारण करण्याचे नियम..

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये अनेक गोष्टींना विशेष असे महत्त्व दिले जाते. प्रत्येक देवी देवतांना विशेष असे स्थान दिले गेले आहे. प्रत्येक भक्त आपल्या कुलदेवतेची पूजा आराधना करतात. अगदी मनोभावे प्रार्थना देखील करत असतात. जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात रुद्राक्षाला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो धार्मिक मान्यता कशी आहे की भगवान शिवांच्या अश्रूंपासून रुद्राक्ष तयार झाला आहे. त्यामुळे त्याला खूपच पवित्र मानले गेले आहे. तसेच मित्रांनो आपल्या आजूबाजूला बरेच लोक ही रुद्राक्ष परिधान करतात.

मित्रांनो रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा आपल्याला मिळत असते. तर मित्रांनो रुद्राक्ष धारण केल्याने आपल्याला नेमके कोणते फायदे होतात. याविषयीची माहिती आज मी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे. हिंदू मान्यतेनुसार या सर्व रुद्राक्षांची स्वतःची स्वतंत्र शक्ती आहे.

१) ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की रुद्राक्ष धारण केल्याने सर्व संकटे दूर होतात. एक मुखी रुद्राक्ष पासून ते एकवीस मुखी रुद्राक्ष पर्यंत त्याचे पर्याय आढळतात.

२) मित्रांनो रुद्राक्ष धारण केल्याने आपले आरोग्य देखील चांगले राहते. आरोग्यासाठी रुद्राक्ष धारण करणे देखील गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार रुद्राक्ष शरीराला बळ देतो. हृदयविकार ताप सर्दी खोकला यासंबंधीतील आजार दूर करतो. रुद्राक्ष धारण केल्याने चेहऱ्यावर चमक येते. ज्यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक बनते.

३) बरेच जण रुद्राक्षाची माळ जपासाठी वापरतात. त्यामुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास वाढतो. रुद्राक्ष च्या बिया आरोग्य आणि अध्यात्मिक बळ देण्यासाठीउवयुक्त आहे.

४) रुद्राक्ष धारण केल्याने आपल्या मागील पापाचा नाश होतो. ज्यामुळे वर्तमान जीवनात अडचणी येतात. रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य रुद्राचे रूप धारण करू शकतो. हे सर्व पापामधून बाहेर पडण्यास मदत करते आणि एखाद्याच्या जीवनातील ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत करते.

५) तसेच मित्रांना रुद्राक्ष हे नकारात्मक गोष्टींचा नाश करतो. इतकी ताकद त्याच्यामध्ये असते. रुद्राक्ष हा एकमेव अध्यात्मिक मनी मानला जातो.

मित्रांनो असे अनेक फायदे रुद्राक्ष धारण केल्यामुळे होतात. त्यामुळे मित्रांनो रुद्राक्ष हा प्रत्येकाने धारण करायला हवा. रुद्राक्षामध्ये खूपच ताकत असते आणि त्याचे फायदे आपणालाच खूप होत असतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *