Skip to content

वृश्चिक रास- ऑगस्ट महिन्यात तुमच्या जीवनात या घटना १००% घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

वृश्चिक रास ही राशीचक्रातली आठवी रास असून विंचू हे या राशीचे बोधचिन्ह आहे. विंचवाच्या नांगी मध्ये जहरी विष असत. आणि चुकून जर कोणी विंचवाच्या नांगी वर पाय दिला तर विंचू त्याला दंश केल्याशिवाय राहत नाही. तसाच काहीसा स्वभाव या राशीतील लोकांचा असतो. 

त्यांना कोणी डीवचल तर ते त्या व्यक्तीला सोडत नाहीत. तर मग बघूया कसा जाणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना.या महिन्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा काही वाद असेल किंवा जुना वाद असेल तर तो मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. 

जर तुमचेकाका किंवा काकू दुसऱ्या शहरात राहत असतील तर ते तुमच्या घरी येऊ शकतात. कुटुंबात एखादी अचंबित करणारी घटना घडू शकते. ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रित होईल. तुम्ही यात तुमचा सहभाग ठेवा. त्यामुळे तुमची कुटुंबात प्रतिष्ठा वाढेल. 

कोणाशीही कठोर शब्दात बोलणे टाळा. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करा. ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. या महिन्यात व्यवसायातील खर्च वाढतील ज्यामुळे तुम्ही काही काळ तणावात राहू शकता.अशा परिस्थितीत कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या वडिलांचा सल्ला मात्र नक्की घ्या. 

नोकरी करणाऱ्या लोकांचा त्यांच्या कामाबाबत सकारात्मक दृष्टीकोन असेल आणि ते त्यांच्या कामात समाधानी असतील. तुमचे सहकारी हे तुमच्या कामावर खुश होतील. आणि ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुकही होऊ शकते. या काळात सरकारी अधिकारी कामानिमित्त प्रवास करण्याची शक्यता आहे. तुम्ही खूप मेहनत कराल पण अपेक्षित परिणाम मात्र मिळणार नाही. 

त्यामुळे मन उदास होईल.अशावेळी तुमची समस्या तुमच्या पालकांना सांगा म्हणजे ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. जर तुम्ही आता बारावी उत्तीर्ण झालेले असाल आणि कॉलेजमध्ये असाल तर तुमचे विशेष लक्ष तुमच्या करिअरवर असायला हवे. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांच्या बोलण्याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष करा. 

तुम्ही कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यात तुम्हाला काही शुभ संकेत मिळू शकतात. तुमचे मन त्यामुळे रोमांचक होईल. जे भविष्यात सकारात्मक परिणाम करून देईल. घरगुती जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठींबा मिळेल. आणि त्याचबरोबर त्यांचा तुमच्यावर प्रभाव राहील. 

तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्या दोघांचे नाते अधिक घट्ट होईल. यावेळी जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल काही शंका असेल तर ते त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. जी लोक स्थळ बघत आहेत अर्थात लग्नाची वाट बघत आहेत किंवा ते त्यांच्या भविष्याबद्दलच्या चिंतेत आहेत. 

या लोकांना अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. प्रयत्न चालू ठेवा. शारीरिक दृष्ट्या तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल कोणतीही समस्या उद्भवणार नाही.  त्याचबरोबर दम्याच्या रुग्णांना या महिन्यात थोडीशी काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे डॉक्टरांचे अधिक संपर्क करून ठेवा आणि काही त्रास वाटल्यास लगेच डॉक्टरांना भेट द्या. 

या महिन्यात तुमची बौद्धिक क्षमता विकसित होईल. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने काम कराल. महिन्याच्या मधल्या डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यासाठी वृश्चिक राशीचा भाग्यशाली अंक असेल आठ आणि शुभ रंग असेल राखाडी. 

तुम्हाला एक महत्त्वाची टीप आहे. तुमच्या कुटुंबातील एखाद्याला गंभीर आजार असल्यास त्याची  प्रकृती अचानक बिघडू शकते म्हणून या महिन्यात त्यांची जास्त काळजी घ्या. आणि डॉक्टरांच्या संपर्कात रहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.