Skip to content

वृषभ रास- २०२३ मध्ये या ३ महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. जाणून घ्या नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य, कुटुंब. माहिती. आणि उपाय.

नमस्कार मित्रांनो

२०२३ वर्षात वृषभ राशींच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. कोणत्या आहेत त्या घटना चला जाणून घेऊयात. २०२३ च्या राशिभविष्य नुसार वृषभ राशीच्या लोकांना २०२३हे वर्ष आर्थिक दृष्ट्या थोडस अस्थिर असणार आहे. वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. जानेवारी ते एप्रिल आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला अनेक मार्गांनी पैसे मिळण्याची शक्यता आहे.

आणि तुम्हाला या काळात एकापेक्षा अनेक माध्यमांतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल ते ऑक्टोबर मध्ये मात्र खर्च वाढेल. धार्मिक आणि शुभकार्यांवर ही खर्च होतील. त्यानंतर अनेक अनावश्यक खर्चांना सुरुवात होईल. जे तुम्हाला इच्छा नसतानाही करावे लागतील. काही सहलींवर तर काही आजारांवर पैसे हे खर्च होतीलच.

ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान आर्थिक स्थिती पुन्हा सुधारण्यास सुरुवात होईल. खर्चात कपात होईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. म्हणजे थोडक्यात काय तर तुमची आर्थिक स्थिती चढ-उतार असणारी असेल. नोकरी आणि व्यवसायाचा विचार करता वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल. त्यांचे योग्यता सिद्ध करण्याची त्यांना संधी मिळेल.

तुमची वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तुमची बदली होऊ शकते. या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची ही शक्यता आहे. त्यानंतर वर्षभर मेहनत मात्र करावी लागेल. या वर्षात जून ते नोव्हेंबर दरम्यान नोकऱ्यांमध्ये चढउतारही पाहायला मिळतील. काळात नोकरीत बदल किंवा नवीन नोकरी मिळण्याची ही शक्यता आहे. काही महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांसाठी विभागीय बदल होऊ शकतात.

हे वर्ष व्यापारी या जगात संबंधित लोकांसाठी चांगला आहे. परदेशाशी संबंधित व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार सुद्धा होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगतिशील असा. सुरुवातीला तुमचं लक्ष पूर्णपणे व्यवसाय सुधारण्यात असेल. वर्षाचा मध्य व्यवसायात चांगले यशही देऊन जाईल. परंतु वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला नुकसान आणि व्यवसायात संकटांना सामोरे जावे लागू शकतो.

त्यामुळे त्या गोष्टींची ही तयारी ठेवा. आता वळूयात कौटुंबिक गोष्टींकडे. वृषभ राशीच्या जातकांना जातक म्हणजेच वृषभ राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनाबाबत सुखद बातमी मिळेल. म्हणजे एखादी आनंदाची बातमी यावर्षी तुम्हाला मिळू शकते. कौटुंबिक पातळ्यांवर वर्षाच्या सुरुवातीला तुमचा कल तुमच्या कुटुंबाकडे असेल या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुखाची पूर्ण काळजी घ्या.

तुम्ही स्वतः मानसिक दडपणाखाली असला तरी तुम्ही कुटुंबात मात्र आनंद टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कौटुंबिक जीवनात तणाव वाढेल आणि प्रिय व्यक्तीच्या आरोग्याचा समस्येबद्दल तुमची चिंता वाढू शकते. पण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कौटुंबिक जीवनात आनंदाचा वातावरण राहील. घरात एखाद्या धार्मिक कार्य होऊ शकतं. शुभ कार्य ही होऊ शकतो.

वृषभ राशीच्या तरुण-तरुणींचे लग्न जमण्याचे ही योग आहेत. तुम्ही स्थळ शोधत असाल तर यावर्षी नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश येईल. ज्योतिषीय उपाय सुद्धा तुम्ही काही करू शकता. ज्यामुळे २०२३ त्या काही थोड्याफार अडचणी तुम्हाला येत आहेत त्याही दूर होतील.

पहिला उपाय म्हणजे शुक्रवारी माता महालक्ष्मीच्या स्त्री-सुताच पठण करा किंवा महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा पटनही तुम्ही करू शकता. शनिवारी मुंग्यांना पीठ खायला द्यावं किंवा माशांना खायला द्याव. आरोग्य चांगल असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवासही करू शकता. छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा नक्कीच २०२३ तुम्हाला चांगला जाईल. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *