शनि गोचर २०२२ या राशींच्या लोकांना साडेसाती पासून मुक्ती. आता आयुष्यात येणार आनंदाची बहार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. यावर्षी २०२२ मध्ये अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. आयुष्य आणि कर्मफल देणारे शनिदेव २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनि चा कुंभ राशीत प्रवेश होताच काही राशींवर त्याचा परिणाम होणार आहे.

काही राशींना साडेसाती पासून सुटका मिळणार आहे. मग कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना साडेसाती पासून सुटका मिळणार आहे चला जाणून घेऊया.

मंडळी २९ एप्रिल २०२२ रोजी शनीच्या राशी परिवर्तनाने धनु राशीच्या लोकांना साडेसाती पासून सुटका मिळणार आहे. आणि त्यांचा चांगला काळ सुरू होईल. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती मिळेल. सर्व प्रलंबित कामे सुद्धा पूर्ण होतील. समाजात मानसन्मान वाढेल.

परंतु १२ जुलैपासून शनिदेव पुन्हा मकर राशीत पूर्वगामी अवस्थेत प्रवेश करतील. आणि १७ जानेवारी २०२३ पर्यंत या राशीत राहतील. या काळात धनु राशीच्या लोकांवर शनीची दृष्टी येईल. एकूणच या राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ रोजी शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळणार आहे.

तूळ राशीमध्ये शनि उच्च असतो तर मेष राशी मध्ये शनि दुर्बल राशी असतो. २७ नक्षत्रांपैकी शनि महाराजांकडे पुष्य, अनुराधा, पूर्वा भाद्रपदा, नक्षत्रांची मालकी आहे. बुध आणि शुक्र हे शनि सूर्याचे अनुकूल ग्रह आहेत. चंद्र आणि मंगळ हे शत्रु ग्रह मानले जातात.

शनीचा भ्रमण कालावधी सुमारे तेहतीस महिने आहे. तसेच शनीची महादशा २९ वर्षांची आहे. जर कुंडली मध्ये शनि मजबूत स्थितीत असेल तर व्यक्तीला आयुष्यात कधीही आरोग्याची चिंता नाही. त्याचबरोबर सर्व कामेही पूर्ण होतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.