Skip to content

शरीरावर ही लक्षणे दिसत असतील तर समजून जा शनिदेव आहेत आपल्यावर प्रसन्न.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो हिंदू धर्मात शनिवारचा दिवस हा शनी देवांना समर्पित केला जातो, शनिवारी अनेक लोक शनी देवांची व मारुतीची मनोभावे पूजा करतात. त्यांची आराधना करतात. मनातील भावना, खंत, वाटणारी भीती किंवा जाणवत असलेल्या संकटा बद्दल सर्वकाही देवाला सांगतात. 

देवांचे नेहमीच आपल्यावर लक्ष असते, आपण किती संकटात अडकलो आहोत किंवा आता यातून कसे बाहेर पडणार आहोत हे सर्वकाही देवाला नेहमी माहीत असते. या नवग्रहात शनी हा अगदी क्रूर मानला जातो. शनीच्या साथीमुळे व्यक्ती कितीही श्रीमंत असेल तरीही त्याला त्रास होतोच.

शनी ग्रह हा इमानदार व्यक्तींसाठी यश , सुख, संपत्ती नेहमीच दान करत असतो. शनी ही संतुलन आणि न्यायाची देवता आहे. आपण आपल्या जीवनात सत्कर्म व वाईट कर्म किती प्रमाणात करतो याचा हिशोब नेहमीच शनी देव ठेवत असतात आणि त्यानुसारच आपली शिक्षा ठरली जाते. 

शनी हेच आयुष्य सुखी बनवतात, तेच आपली धनसंपत्ती आहेत आणि तेच आपल्याला मोक्ष देतात.असेही म्हणले जाते की शनी पापी व्यक्तींसाठी अत्यंत क्रूर व दुःखदायक आहेत. शनीची साडेसाती लागली तर आपल्या जीवनात बरेच चढ उतार येत असतात.

या साडेसाती मुळे संपूर्ण आयुष्याची वाट लागते, मात्र शनी देव हे बऱ्याच लोकांसाठी शुभ देखील असतात.सूर्यपुत्र शनिदेव हे मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्यांना फळ देतात. मित्रहो ग्रंथात असे सांगितले आहे की शनिदेव ज्या लोकांवर प्रसन्न असतात त्यांच्या शरीरावर काही लक्षणे दिसून येतात. 

त्या बद्दल आपण आज या लेखातून सविस्तर जाणून घेणार आहोत.मित्रहो शनिदेव ज्या व्यक्तीवर कृपा ठेवतात त्या व्यक्तीला लहानपणापासून हाडांचा ठीसुळपणा व हाडे दुखणे अशा समस्या जाणवतात. पाय मुरगळणे, हाथ फॅक्चर होणे, कंबर दुःखी अशा व्याधींनी या व्यक्ती खूप त्रस्त असतात.

मात्र तरीही हे स्वावलंबी असतात, मनातून एकटे असूनही खंबीर असतात. शनी देवाची कृपा असणाऱ्या व्यक्ती लबाडी, खोटे बोलणे असे कधीच करत नाहीत. शिवाय यांचे मित्र परिवार देखील कमी असतो. असे व्यक्ती नेहमी सत्याच्या मार्गावर चालतात.

 हे व्यक्ती समाजसुधारक, संन्यासी असतात. जर कुंडलीत शनी देव स्थित असेल तर त्या व्यक्तीला वयाच्या पस्तिशीनंतर धनसंपत्ती मिळण्याची शक्यता असते. मित्रहो शनी देवांना दुतोंडी व्यक्ती अजिबात आवडत नाहीत. ते आपल्या भक्तांच्या चुकांवर कधीच पांघरून घालत नाहीत. जी व्यक्ती लहान मुले, वृद्ध लोक, स्त्रिया यांच्यावर अन्याय करतात.

त्या व्यक्तीला शनी देव कधीच माफ करत नाहीत. सत्याच्या बाजूने नेहमी शनिदेव असतात व असत्याची सर्व शक्ती काढून घेतात. धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींवर शनी देवाची सदैव कृपा राहते. मित्रहो नेहमी शनी देवांची पूजा करत रहा, सत्याची बाजू घेऊन जीवन जगा. शनी देव नेहमीच तुमच्या सोबत राहतील. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *