Skip to content

श्रावणात दिसले हे १३ संकेत तर समजून जा प्रत्यक्ष महादेव आले आहेत आपल्या घरी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

भगवान शिवशंभूंचा सर्वात प्रिय महिना म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्यात प्रत्येक जण देवाधिदेव महादेवांची उपासना करतो. शिवालयात जाऊन शिवलिंगा ची पूजा करतो. ओम नमः शिवाय यासारख्या महामंत्रांचा जप करतो. जेणेकरून शिवशंभो प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील इच्छांची, कामांची पूर्तता करतील. आपल्या जीवनातील दुःख कष्ट हरण करतील. 

मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये जर हे तेरा संकेत आपल्या दृष्टीस पडले तर हे तेरा संकेत आपणास जाणवले तर लक्षात घ्या आपण केलेली पूजा शिवशंभोंनी मान्य केलेली आहे. आणि महादेवांची असीम कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. हे तेरा संकेत कोणती असतात. 

यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत घराबाहेर पडतात गोमातेचे म्हणजेच गाईचे दर्शन होणे. मित्रांनो घराबाहेर पडताच तुम्हाला एखादी गोमाता दिसली तर लक्षात घ्या हिंदू धर्मानुसार त्या गायीमध्ये ३३ कोटी देवता वास करतात. भगवान भोलेनाथ सुद्धा गोमातेमध्ये वास करतात.

म्हणूनच प्रत्येकक्ष भगवान भोलेनाथांनी आपणास दर्शन दिलेला आहे. हा एक खूप मोठा संकेत आहे. की भगवान भोलेनाथांनी आपली पूजा स्वीकार केलेली आहे. मित्रांनो यासारखाच दुसरा संकेत तो म्हणजे घराबाहेर पडताच नंदीदेवांच म्हणजेच बैलाचे दर्शन होणे, नंदी देव हे भगवान शिव शंकरांचे एक प्रमुख गन आहेत. 

आणि त्यांच्या दर्शनाने सुद्धा हा संकेत प्राप्त होतो की शिवशंभुणी आपली पूजा स्वीकारलेली आहे. स्वप्नामध्ये किंवा साक्षात नागदेवतेचे दर्शन होणे सापाचे दर्शन होणे हा सुद्धा एक मोठा संकेत आहे. कारण नागदेवता शिवशंकरांच्या गळ्यामध्ये आभूषण स्वरूप आहेत. शिवशंभुर्णी त्यांना गळ्यामध्ये धारण केलेल आहे.

 विशेष करून सोनेरी सफेद काळ्या किंवा करड्या रंगाच्या सापाचे दर्शन नागाचे दर्शन हे श्रावण महिन्यात अतिशय शुभ मानण्यात आलेल आहे. भगवान शिव शंकरांच्या हातात जे शस्त्र सदैव असतं ते म्हणजे त्रिशूल हे शिवशंभूंच अतिशय प्रिय शस्त्र आहे. 

जर या त्रिशुळाचे दर्शन स्वप्नामध्ये असेल किंवा साक्षात असेल जर तुम्हाला या श्रावण महिन्यात होत असेल तर हा सुद्धा मोठा संकेत आहे. की शिवशंकरांच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख कष्ट आणि संकटे लवकरच निघून जाणार आहेत. श्रावण महिन्यात रुद्राक्षाचे दर्शन सुद्धा प्रत्यक्ष शिवदर्शना इतकच हिंदू धर्म शास्त्राने महत्त्वपूर्ण मानलेला आहे.

रुद्राक्षाचे दिसणं म्हणजेच  प्रत्यक्ष शिवशंभुंणी तुम्हाला दर्शन देण्यासारख आहे. याचा अर्थ हा संकेत अस सांगतो की आपल्या मनातील इच्छांची पूर्तता मनोकामनांची पूर्तता शीघ्र लवकरात लवकर होणार आहे. मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये आपल्या द्वारे आपल्या दरवाजामध्ये आपल्या दारापुढे जर एखादी विद्वान धार्मिक व्यक्ती एखादे साधू संत ऋषीमुनी येत असतील तर त्यांना रिकाम्या हाती कधीच परत पाठवू नका. 

आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या कुवती प्रमाणे सामर्थ्याप्रमाणे त्यांना आपण दानधर्म नक्की करा कारण हा सुद्धा एक फार मोठा संकेत आहे. की जटाधारी साधुसंत ऋषीमुनी आपल्या द्वारी आल्यास हा प्रत्यक्ष शिवशंभुणी आपल्या आपली पूजा स्वीकार केल्याचा संकेत आहे. स्वप्नामध्ये माता पार्वतीने दर्शन दिल्यास जे विवाहित इच्छुक मुल मुली आहेत त्यांचे विवाहाचे योग लवकरात लवकर जुळून येतात.

स्वप्नामध्ये शिव मंदिराच दर्शन होणे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे. शिवकृपा प्राप्त होण्याचा भगवान शिवशंकर जर आपल्या स्वप्नामध्ये तांडव नृत्य करताना आपण पाहिले भगवान शिवशंकर तांडव नृत्य करताना जर आपणास स्वप्न पडल तर लवकरच आपले शत्रू शांत होतात. आणि अडकलेले पैसे सुद्धा लवकरच प्राप्त होतात. 

श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात दूध किंवा दही दिसणे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे. की भगवान शिव शंकराची अपार कृपा लवकरच आपणास प्राप्त होणार आहे. भांग किंवा भस्म यांचा साक्षात झालेले दर्शन अचानक झालेल दर्शन हा सुद्धा संकेत आहे की भगवान शिव शंकरांनी साक्षात आपणास दर्शन दिलेल आहे.

आपली पूजा त्यांनी मान्य केलेली आहे. तर मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये या १३ पैकी एक तरी संकेत आपणास दिसला तर शिवशंभूंची कृपा आपल्यावर नक्की बरसलेली आहे. त्यांनी आपली पूजा स्वीकार केलेली आहे. हे समजून जा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.