Skip to content

श्रावणात सत्यनारायण केल्याने काय लाभ होतो? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

श्रावणात सत्यनारायणाची पूजा का करावी? या पूजेने काय लाभ होतो कुठल्या संकटात असताना आपण सत्यनारायण करायला हवा चला जाणून घेऊयात.

आपल्याला आयुष्यात अनेक चांगल्या वाईट प्रसंगातून जावे लागते. वाईट प्रसंगांमधून धिराने मार्ग काढावा लागतो आणि मग आपले मनोधैर्य टिकून ठेवावे लागते. अशा कठीण प्रसंगात तून आपल्या अडचणींचा मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे सत्यनारायण.

घरच्या घरी अगदी सहज काही करता येणाऱ्या उपासना आहेत. आणि त्यातीलच हे एक व्रत आहे. त्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच, पण जगायला ही बळ मिळते.
कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केलं तर मनाचा सात्विक पणा अनुभवता येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांनाच दिसून येईल.

सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्व.
याबद्दलची ज्योतिष अभ्यासात अस्मिता दीक्षित यांनी दिलेली माहिती बघूया विवाह झाल्यावर सत्यनारायण पुजावाआणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रुढी परंपरा आहे श्रावण महिन्यातला एखादा चांगला दिवस पाहून किंवा वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते.

मात्र काही घरात वर्षभरात ही पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्य संचयाचा . त्यादरम्यान सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने श्रावणात संचय करावा या हेतूने पूजेच्या आयोजन केले जाते. त्यामुळे लाभ काय होतात तेही जाणून घेऊ सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते .

हे व्रत करणारा मनुष्य ह्यालो की सर्व सुखभोगून शेवटी आनंद रूप मोक्ष जातो. असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ही व्रत करण्याची परंपरा आहे. घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायला पाहिजे. आता सत्य नारायणाचा विधी बघूयात.

घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला एक चौरंग किंवा पाठमांडावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात पैसे आणि फुल घालावेत त्यावर एक ताम्हण ठेवावे आणि त्यावर मूठभर तांदूळ पसरवावे. त्यावर तुळशी पत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी.

आणि त्याची पूजा करावी. श्रीकृष्णाला १०८ किंवा १००८ अशा संख्या तुळस अर्पण करावी. पूजेत मन एकाग्र व्हावे यासाठी हा मोठा आकडा दिलेला आहे. तुळस अर्पण करून केळीचे खांब पवित्र मानले गेले जातात. त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते. मांगल्य आणि पावित्र्य जाणवते परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवणे सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा.

म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थ प्रसाद द्यावा त्याबरोबर न्याहारीची डिश आणि पेय तसेच सरबत आहेत त्यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळलं तरी चालत. सत्यनारायण पूजेचा आनंद घ्यावा श्रीकृष्ण च्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षदा फुल आणि तुळस अर्पण करावी. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे यासाठी देवाला विनंती करावी.

धूप दीप उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने देवाला शरण जावे. सत्यनारायण व्रत पोथी मिळते त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवा. त्या दिवशी घरात जे काही जेवण बनवले आहे त्याचा महानैवेद्य दाखवावा. आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा.

तसेच शिर्‍याचा प्रसाद बाहेरच्या दोन-तीन जणांच्या मुखी तरी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचे पुण्यही मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षदा वाहून पुनरा ग मनाचे असे तीन वेळा म्हणावे. आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी. आणि नमस्कार करावा.

हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे. त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे हे व्रत करतानाही उपासना करताना त्यामागे एक मेक अशी आहे की आपण करत असलेल्या उपासनेची व्रताची कुठेही वाच्यता करू नये. कुठेही आअक्षर देखील काढायचे नाही. तरच ते फुल तृप्त होईल हे धान्य असू द्यात. नाहीतर कर्नोतोपरी झालं तर, याचे महत्त्व कमी होऊन फळ प्राप्त होणार नाही.

यात सातत्य ठेवावे. उपासनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर, त्यातील असामान्य प्रचंड आपला प्रवास आनंददायी करते. फक्त त्यात समर्पणाची भावना हवी. साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशही नको. तरच ती पूजा फल तृप्त होईल. मग मंडळी श्रावणामध्ये तुम्ही तुमच्याकडे सत्यनारायण पूजा करता की नाही हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *