Skip to content

श्रावणात १४ पैकी १ उपासना तरी नक्की करा. आणि अपेक्षित फळ मिळवा.

नमस्कार मित्रांनो.

श्रावणात करायच्या १४ उपासना:- १७ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे श्रावण महिना. आणि या श्रावणामध्ये तुम्ही कोणती उपासना करणार आहात. काही ठरलंय का जर नसेल ठरलं तर हा व्हिडिओ ऐका. १४उपासना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे १४च्या १४ तुम्हाला करणे अशक्य आहे हे मान्य आहे.

पण त्यातली कमीत कमी एक उपासना जरी तुम्ही केली तरी सुद्धा त्याचे तुम्हाला दिव्य अनुभव येतील चला तर मग पाहूया त्या चौदा उपासना कोणत्या आहेत आणि त्याचे तुम्हाला काय लाभ होणार आहेत.

मित्रांनो श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यांमध्ये केलेल्या साधना उपासना आपल्याला काही पटीने अधिक फळ देऊन जातात म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये उपासना करण्यावर भर दिला जातो. कोणी श्रावणी सोमवारचे व्रत करते तर कोणी श्रावणी शनिवार करते अशा वेगवेगळ्या उपासना श्रावणामध्ये केल्या जातात त्याप्रमाणे तुम्ही तुमची साधना निवडा आणि ती करा. चला बघूयात त्या चौदा उपासना कोणत्या.

१) श्रावण महिन्यामध्ये तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायाचे नित्य वाचन करावे २१ दिवसात पारायण पूर्ण होते.
२) श्री सूक्ताचे नित्य पठण करणे जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा. श्रावणामध्ये रोज १६ वेळा श्रीसूक्त म्हणा. ही उपासना केल्याने माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल.

३) श्री शनि महात्म्याचे पठण करणे किंवा शनि महाराजांच्या एखाद्या मंत्राचा जप करणे. (ओम श शनिचराय नमः) हा अगदी साधा सरळ सोपा मंत्र आहे ज्यांना साडेसाती चालू आहे किंवा शनीची या चालू आहे किंवा शनिदोषाचा काही त्रास आहे. त्यांनी हा उपाय नक्की करावा. ४) श्रावणातल्या दर सोमवारी महादेवांच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करावा. श्रावण मास हा खरंतर शंकर महादेवांच्या उपासनेचा काळ आहे. त्यामुळे या काळामध्ये घरातील शंकराच्या पिंडीवर दूध आणि अभिषेक करायला विसरू नका.

५) मंगळवार किंवा शुक्रवार दोन्हीपैकी कोणताही एक वार निवडा आणि आपल्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्या दिवशी कुंकू मार्चन करा. म्हणजे मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा. पण श्रावणात एकदा तरी कुलस्वामिनीला कुंकू मार्चन नक्की करा. ६) सप्तशतीचा पाठ करू शकता गुरुचरित्राचे पठण करू शकता किंवा साई चरित्र अशा पवित्र ग्रंथाचा पठण करू शकता.

७) दर्शनी वारी चार चमचे हळद घेऊन गोमूत्र घालून घराचा उंबरठा सारणे. ८) गायत्री मंत्राचे सकाळी नित्य पठण करणे आणि सूर्यनमस्कार करणे. ९) श्री स्वामी समर्थ या अद्भुत दिव्य मंत्राचा नित्य जप करणे. रोज कमीत कमी ११ माळी तरी कराव्यात.

१०) शुक्रवारी देवीला खीर पुरीचा नैवेद्य अर्पण करणे निदान एक शुक्रवार जरी जमले तरी चालेल. महालक्ष्मी चा जप सुद्धा त्या शुक्रवारी करावा. ११) श्रावणी सोमवारी लघु रुद्र किंवा महादेवांचा जप जसे की ओम नमः शिवाय या साध्या सरळ सोप्या मंत्राचा जप जसा जमेल तसा करावा

१२) श्रावणी सोमवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करावी. १३) अनेक घरातून जिवतीचे पूजन केले जाते. कुलाचाराचा तो एक भाग असतो त्यामुळे शुक्रवारी जिवती पूजन अवश्य करावे. १४) श्रावणातील कोणतेही एका वारी आपल्या कुळदेवी तेची ओटी भरावी.

मंडळी या होत्या त्या चौदा उपासना यापैकी कोणतीही एक उपासना जर तुम्हाला करायला जमेल तुम्ही निवडा आणि करा. यापैकी कोणतीही एक उपासना केली तर तुमचे मन मन शांतीने भरून जाईल. फक्त उपासना करताना श्रद्धा भक्ती पूर्व अंतःकरणाने करावी म्हणजे झाले.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *