Skip to content

श्रावण महिन्यात सौभाग्यवती स्त्रियांनी नक्की करा ही ५ कामे घर स्वर्ग बनेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिन्यात आपण शिव पूजा करतो मात्र शिवपुजे सोबतच सौभाग्यवती स्त्रियांनी ही पाच कामे श्रावणात नक्की करावी. यामुळे घरातून दरिद्रता आणि गरीबी निघून जाते. मग तिला भविष्य प्राप्त होत. अखंड सौभाग्य लाभत अस मानल जात की भगवान शिव शंकराची पूजा शक्तीविना अपूर्ण असते. आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात आपण माता पार्वतीची देवी दुर्गेची सुद्धा पूजा ही नक्की करावी. 

संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या भूलोकावर अमृत वर्षा होत असतो. आणि म्हणूनच या महिन्यात केलेले पूजा पाठ धार्मिक अनुष्ठान ही अत्यंत सफल बनतात. सौभाग्यवती स्त्रियांनी ही पाच कामे केल्याने या स्त्रियांना अखंड सौभाग्य तर प्राप्त होतच मात्र घराची समृद्धी घरामध्ये समृद्धी येते, बरकत येते. जाणून घेऊया की ही पाच कामे कोणती आहेत.

त्यातील पहिल काम श्रावण महिन्यातील मंगळवारी किंवा बुधवारी किंवा जास्त महिलांना दररोज हे करण शक्य असेल त्यांनी दररोज गणपती बाप्पांना २१ दुर्वा अर्पण कराव्या. जर २१ दुर्वा अर्पण करणे शक्य नसेल तर फक्त चार ते पाच दुर्वा सुद्धा भगवान श्री गणेशांना आपण अर्पण करू शकता. भगवान श्री गणेश हे प्रथमेश आहेत.

देवांमध्ये प्रथम पुज्य आहेत. कोणत्याही कार्याचा आरंभ त्यांच्याशिवाय होत नाही. आणि त्यांच्यासोबत रिद्धी सिद्धी सुद्धा वास करतात. आणि म्हणून घरातून गरीबी आणि दरिद्रता हद्दपार करण्यासाठी हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने वायफळ खर्च सुद्धा होत नाहीत. ६४ कलांचे अधिपती असणारे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आणि म्हणून घरात जर मोठा आजारपण असेल तर सातत्याने दुखापती होत असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकता. 

कार्य नंबर दोन या श्रावण महिन्यामध्ये आपण माता गौरीची मनोभावे पूजा करा. माता पार्वतीची मनोभावे पूजा करा. आणि पिवळ्या रंगाचे थोडस सिंदूर आपण दररोज मातेला अर्पण करा. आणि हेच पिवळसंदूर आपण स्वतःच्या मागे मध्ये सुद्धा भरा. जसा आपण सिंदूर लावतो त्याच प्रकारे थोडासा हा पिवळा सिंदूर आपण स्वतःच्या मांग मध्ये भरा.

यामुळे वैवाहिक जीवन सुखमय बनत पती-पत्नीतील वाद संपुष्टात येतात व तिला दीर्घायुष्य लाभत. माता गौरीच्या आशीर्वादाने अखंड सौभाग्याचे वरदान सुद्धा प्राप्त होत. कार्य नंबर तीन या श्रावण महिन्यात शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची आपण सवय लावा आणि आपली देवपूजा कमीत कमी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी होईल याची काळजी घ्या. मन प्रसन्न ठेवा. 

यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. ज्या प्रकारे मातेचे रूप आहे. अगदी त्या समान आपण सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे घरातल वातावरण सुखद बनत. सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. उपाय नंबर चार या श्रावण महिन्यात आपण सौभाग्याचा लेण म्हणजेच सौभाग्य अलंकार माता गौरीला नक्की अर्पण करा. आणि यासाठी शिवरात्रीचा दिवस किंवा प्रदोष ज्या दिवशी प्रदोष आहे त्या दिवसाची आपण निवड करा.

सोबतच आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणाऱ्या महिलेला सुद्धा आपण हे सौभाग्याचा लेण देऊ करा ती महिला सौभाग्यवती असेल याची मात्र काळजी मात्र घ्या. त्या महिलेची आपण पदस्पर्श करायची आहेत म्हणजे तिच्या पाया पडायचा आहे. पाया पडताना आपल्या पदराने किंवा जर तुम्ही ओढणी घेत आहात.

तर त्या ओढणीच्या टोकाने त्या ज्येष्ठ महिलेच्या अंगठ्यांना स्पर्श करा आणि त्या महिलेला आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देण्यास सांगा. यामुळे अखंड सौभाग्याचे वरदान प्राप्त होत. आणि पाचवा आणि अंतिम उपाय म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करण होय. हिरवा रंग हा सुख आणि सौभाग्याचे प्रतिक आहे. 

समृद्धीचे प्रतीक आहे. आणि म्हणून सौभाग्यवती स्त्रियांनी या श्रावण महिन्यात आपल्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की परिधान करावे सोबतच  मेहंदी सुद्धा लावू शकता. तर अशा प्रकारे ही पाच कार्य या श्रावण महिन्यात सौभाग्यवती स्त्रियांनी नक्की करावी आणि माता गौरीचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *