श्रावण विशेष श्रावण सुरू होण्याआधी घरातून बाहेर काढा या ३ वस्तू शिवजी होतील प्रसन्न.

नमस्कार मित्रांनो.

निसर्ग चित्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्त्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याच वर्णन केलं जातं. आषाढी अमावस्या दिवा पूजन म्हणजे व्रत वैकल्यांना सुरुवात होते. आणि वातावरण ही बदलते, ऊन पावसाचा खेळ सुरू होतो.

श्रावण महिना हा भगवान शिव शंकरांना समर्पित आहे. त्यांच्यासाठी अनेक व्रत केली जातात उपवास केले जातात आणि भरपूर साधनाही केली जाते. अशा या पवित्र श्रावण महिन्यात येणा-या सकारात्मक आणि सात्विक अण्णाचं ग्रहण करण्यासाठी आपण नकारात्मक ऊर्जा आधीच बाहेर काढायला हवी. 

याच गोष्टी तुम्ही घरातून बाहेर काढायला हव्यात श्रावण सुरू होण्याआधी, कोणते आहेत ३ गोष्टी चला जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंचा आपल्या जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होत असतो. घरातील प्रत्येक वस्तूमध्ये तिची स्वतःची अशी ठराविक ऊर्जा असते. 

याचाच आपल्या जीवनावर परिणाम होतो आणि म्हणूनच घरात तुटलेली फुटलेली तिजोरी ठेवल्यास आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. घरात फुटकी भांडी चिरलेली भांडी यातून सुद्धा नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात बाहेर पडते जी आपल्याला हानी पोहोचवते. 

पैसा घरात टिकत नाही पाण्यासारखा पैसा खर्च होतो अशा अनेक समस्या उद्भवतात. तसेच घरात किंवा देव्हाऱ्यात देवी देवतांची खंडित किंवा तुटलेले फोटो ठेवू नये. यामुळे सुद्धा आर्थिक परिस्थिती खालावते म्हणूनच त्यांना नदीच्या प्रवाहात सोडून द्यायला हवे. आणि त्या जागी नवीन मूर्तींची स्थापना करायला हवी. 

तसेच घरामध्ये भंगार किंवा इतर प्रसारा ठेवल्याने प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्या गोष्टींची घरात गरज नाही त्या गोष्टी घरात ठेवू नये.छतावर पडलेले भंगार हे दारिद्र घरात आणण्यास कारणीभूत असते. यामुळे पितृदोष सुद्धा लागतात यामुळे वापरात नसलेल्या वस्तू किंवा कपडे घरात ठेवू नये. 

घरात त्यामुळे नकारात्मक ऊर्जेची साठवणूक होते. म्हणूनच घरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या येतात. श्रावण महिन्यात भगवान शिव शंकर आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते. आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.

श्रावण महिना महादेवांना प्रिय असल्याचं कारण म्हणजे या महिन्यातच पार्वती मातेने भगवान शिव शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठं तप केल होत अस सांगितल जात. श्रावणी पूजेत केल्या जाणाऱ्या जल अर्पणात रुद्राभिषेकाला सुद्धा महत्त्व आहे.

शिव पूजन करणे शक्य नसेल तर भक्ती भावाने एक बेलाचे पान वाहिले तरीसुद्धा संपूर्ण पूजेचे पुण्य मिळत अस म्हटल जातं त्याचबरोबर श्रावणामध्ये शिवप्रतिकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे म्हणजे लाभदायक मानल जात. तर मंडळी तुम्ही सुद्धा श्रावणात व्रतवैकल्य करत असाल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.