Skip to content

श्री कृष्ण वाणी- भविष्यवाणीतील या ५ गोष्टी तंतोतंत खऱ्या ठरताय आता.

  • by

नमस्कार मित्रांनो.

भगवान श्रीकृष्णांनी महाभारत काळातच कलियुगाचे सविस्तर वर्णन केले होते. कलियुगात लोक कसे असतील, आयुष्य कसे जगतील, लोक एकमेकांशी कसे लागतील हे सगळ त्यांनी सांगितले होत. आज आपण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या पाच गोष्टींवर विचार करणार आहोत.

ज्या आज १००% खऱ्या ठरत आहेत. महाभारत काळामध्ये एकदा पाचही पांडवांनी कलियुगाबद्दल भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारले. की कलियुगामध्ये माणस कशी असतील, तसा विचार करतील, कशी वागतील, आणि कलियुगात मोक्ष कसा मिळेल. हे सगळे प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्णांनी पाचही पांडवांना वनात जायला सांगितल. आणि तिथे गेल्यावर त्यांना जे काही दिसेल ते सविस्तर येऊन सांगायला सांगितल. 

श्रीकृष्णाचे आज्ञा मिळाल्यावर पाचही पांडव वनात गेले. आणि काही वेळाने परत आले. एक एक करून पाचही पांडवांनी वनात जे जे पहिले ते सांगितल. सगळ्यात आधी युधिष्ठिराने सांगितल. की जंगलात त्याने दोन सोंडी असलेला हत्ती पाहिला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात असेच लोक राज्य करतील. जे बोलतील एक आणि करतील दुसरच. थोडक्यात काय तर सामान्यजणांच दोन्ही बाजूंनी शोषण होईल.

त्यानंतर भीमा ने सांगितल की त्याने जंगलात पाहिल की एक गाय आपल्या मुलाला इतकी चाटत होती की त्या मुलाच रक्त बाहेर येऊ लागल होत. मग श्रीकृष्णांनी त्याचा अर्थ सांगितला की कलियुगामध्ये पालक मुलांचे इतके लाड करतील की त्यांचे लाड मुलांच्या प्रगतीच्या विकासाच्या आड येतील. 

दुसऱ्याचा मुलगा संन्यासी झाला तर लोक त्याचं कौतुक करतील. पण स्वतःचा मुलगा संन्यास घेऊ इच्छित असेल तर मात्र आई-वडील दुखी होतील. आई-वडिलांचे प्रेम मुलांच्या प्रगतीच्या आड येईल आणि त्यामुळे मुलांच्या विकासाची शक्यता नाकारली जाईल. 

अर्जुनाने सांगितले की त्यांनी एक असा विचित्र पक्षी पाहिला की, ज्याच्या पंखांवर वेदांचे मंत्र लिहिलेले होते. पण तो मात्र स्वतः मांस खात होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या परिस्थितीचे वर्णन करताना सांगितले की, विधवान म्हनवले जाणारे लोकच धुराचार करतील. विद्वानांची निष्ठा त्यांच्या विदेशी नसून त्यांच्या मालमत्तेची असेल. संपत्तीची असेल. इतरांची संपत्ती हिसकावण्यात त्यांची विद्वत्ता ते कामी लावतील.

नकुल म्हणाला की त्याने डोंगरावरून एक मोठा खडक पडताना पाहिला. आणि मोठ मोठी झाड सुद्धा तो खडक थांबवू शकत नव्हती. पण एका छोट्या रोपट्यावर आदळल्यानंतर तो खडक तिथेच थांबला. मग याचा अर्थ सांगताना श्रीकृष्ण म्हणाले की, कलियुगात माणसाची बुद्धी कमकुवत होईल. 

त्याच जीवन कोलमडून पडेल आणि संपत्ती किंवा सक्तीचे झाड ही पडझड थांबवू शकणार नाहीत.  पण हरिनामा सारखी छोटी वनस्पती माणसाच्या जीवनाचा ऱ्हास थांबवेल. हरी कीर्तनाने माणसाची बुद्धी बळकट होईल.

त्यानंतर सहदेव म्हणाला की त्याने जंगलामध्ये अनेक विहिरी पाहिल्या त्यापैकी फक्त मधली विहीर रिकामी होती. आणि जी सर्वात खोल होती. सहदेवाला त्याचा अर्थ सांगताना श्रीकृष्ण म्हणाले कलयुगात श्रीमंत लोक आपल्या छंदासाठी, हौसे, मौजे साठी भरपूर पैसा खर्च करतील. पण त्याचबरोबर रस्त्यावरती मात्र लोक भुकेने मरतील. इतरांना मदत करण्यात कोणालाही स्वारस्य नसेल. 

आणि भगवान श्रीकृष्णांनी शेवटी हे सुद्धा सांगितल की, कलियुगातून तारुण जाण्याचा एकच मार्ग असेल आणि तो म्हणजे हरिनाम सतकीर्तन ईश्वराच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहावंश जे काही कार्य करतो आहोत ते ईश्वराला समर्पित कराव. अस केल्यामुळे आपल्या कलियुगात ज्या वाईट गोष्टी घडणार आहे त. त्यापासून नक्कीच बचाव होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *