Skip to content

सावधान. गाईला शिळी भाकर खायला देताय होऊ शकता कंगाल..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात गाईला खूप महत्त्व दिले गेले आहे. कारण असे मानले जाते की गाईमध्ये ३३ कोटी देव वास करतात. गाईची सेवा निस्वार्थ केल्याने घरात लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. म्हणजे काय तर गाय ही साक्षात लक्ष्मीचे रूपच मानले जाते. गाय ही खूप पवित्र असते आणि प्रत्येकाला प्रिय असते. आपल्याला जिथे कुठे काय दिसते आपण तिथे तिचा आशीर्वाद घेतो.

आणि बराच वेळ गाई आपल्या दारासमोर येऊन उभी राहते याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद द्यायला आली आहे. आपण गाईला धान्य व भाकर खायला देतो पण काही वेळा आपण इथे चुकतो गाईला काही गोष्टी खायला देतो ज्या खूप अशुभ असतात आणि देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात की कोणती वस्तू आपण गाईला खायला नाही दिली पाहिजे.

तुम्ही गाईची सेवा करत असाल तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. गाईला बृहस्पती ग्रहासोबत जोडले गेले आहे. म्हणजेच गुरु ग्रह सोबत जोडल्या गेले आहे. गाई दारात आली की आपण तिला एखादी भाकर किंवा चपाती खायला देतो.

पण काही लोक आहेत जी गाईला शिळी भाकर किंवा चपाती खायला देतात. ही खूप अशुभ गोष्ट आहे. दारासमोर गाई स्वताहून येऊन उभी राहिली तर समजून जा देवी लक्ष्मी आपल्या दारात आली आहे. तुम्ही जर गाईला शिळी भाकर किंवा चपाती खायला घालत असाल तर यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो. आणि यामुळे आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते.

म्हणून गाईला कधीच शेळी भाकर खायला घालू नका. गाईला जर तुम्ही खराब धान्य खायला देत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपु शकते. आणि तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. गाईला जर तुम्ही खराब झालेले अन्न खायला देत असाल तर तुमच्या परिवारावर वाईट परिणाम होऊ शकतो. उरलेलं अन्न शिळी भाकर खराब झालेला अन्न गाईला कधीच खायला देऊ नका नाहीतर तुमच्या घरात आलेली लक्ष्मी आल्या पावली परत माघारी जाईल.

मित्रांनो गाईला काय खायला दिले पाहिजे हे सुद्धा जाणून घेऊयात.नेहमी घरात बनवलेली पहिली चपाती गाईला खायला द्या. दर गुरुवारी जर तुम्ही गाईला चपाती वर चिमूटभर हळद खायला देत असाल तर तुम्हाला सुख शांती धनसंपत्ती व ऐश्वर्या प्राप्त होईल.

तुमच्या कुंडलीतील दृष्ट ग्रह निघून जातील.जे लोक मानसिक तणावातून जात असतील तर त्यांनी चपातीवर थोडा गुळ टाकून गाईला खायला द्या. त्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुमचा मानसिक ताण कमी होईल. यामुळे तुमचा आणि तुमच्या परिवाराचा स्वास्थ्य निरोगी राहील.

तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या सगळ्या ग्रहांमध्ये दोष असेल तर तुम्ही रोज गाईला चपाती खायला द्या यामुळे तुम्हाला लवकर चांगला लाभ होईल. आणि सगळे ग्रह हळूहळू शुभ होतील. तुमच्या घरात काही शुभ कार्य घडत नसेल तर तुम्ही गाईला भाकर किंवा चपाती खायला द्या. गाईच्या मस्तकावर तुमचे डोके ठेवून एक इच्छा मागा. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *