Skip to content

सिंधुताई सपकाळ: माईंच्या संघर्षाची कहाणी, वाचताना रडू येईल…

  • by

नमस्कार मित्रांनो.

अनाथांची माय म्हणून ओळख असणारे पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारीत एक छोटीशी कथा आज आपण पाहणार आहोत. समाजाकडून नाकारली गेलेली आणि गुरांच्या मागे फिरत शेण गोळा करणारी ती मुलगी. 

जन्मत:च नको असलेली आणि चिंगी या नावाने तिला उपेक्षित केलं गेलं होतं. बाप गुरे चारायला सोबत घेऊन जायचा. त्यांच्या मागे फिरत शेण गोळा करणे हेच तिचे काम. पायामध्ये काटा घुसुदे नाहीतर पाठीचा काटा ढिला होऊ दे. काम नाही तर जेवन नाही… मार खायला लागे तो वेगळाच. 

अवघ्या ९ वर्षात त्यांचं लग्न झालं. इतक्या लहान वयात ३५ वर्षीय पुरुषासोबत त्यांचे लग्न झाले. काम मात्र तेच होते शेण गोळा करायचे. घरातील कामे सुद्धा करावी लागत. अशा या सर्व संकटामध्ये दोन बाळंत पणे झेलावी लागली.

तिसरं बाळ पोटात असताना सुद्धा त्यांना गुरांमागे शेण गोळा करण्यासाठी फिरावे लागत. त्यांच्या सोबत गावातील अनेक स्त्रिया सोबत असायच्या. शेण विकायच्या गोष्टी वरून गावातील सावकारासोबत भांडण झाले. मात्र याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली.

 दमडाजी असं त्या सावकाराच नाव होतं. त्याने तिचा बदला घेण्यासाठी हलकटपणा केला. त्या सावकाराने तिच्या पोटातील बाळ त्याचे असल्याचे सिंधूच्या सासरी जाऊन सांगितले. या प्रकरणाचा परिणाम सुद्धा तसाच झाला. लाथा बुक्क्यांचा मार त्यांना खावा लागला.

त्यांच्या सासरच्यांनी त्यांना अर्ध मेल्या अवस्थेत गोठ्यामध्ये टाकून दिलं. कारण गुरानी त्यांना तुडवून मारलं तर त्यांच्यावर आळ येणार नाही. मात्र तिच्या सवयीमुळे गुरांनी तिला धक्का सुद्धा लावला नाही. ती तिथून बाहेर पडली आणि ते गावच सोडलं. एकदा रेल्वेच्या रुळावर आपला जीव देण्यासाठी देखील गेली. 

मात्र या सर्व गोष्टींमध्ये बाळाची काय चूक असा विचार करून मागे आली. नंतर त्या स्टेशन वरच ती भिक मागू लागली. इथे सुद्धा मिळालेली भीक सुद्धा ती इतर भिकाऱ्यांसोबत वाटून खाऊ लागली. हेच त्यांचे सहकारी आणि रक्षकसुद्धा झाले.

२१ व्या वर्षात ती आयुष्यात येणाऱ्या संकटाचे धडे शिकू लागली. तिच्या सहकाऱ्यामध्ये असणाऱ्या लहान मुलांची ती आई झाली होती. तसेच जिथे लहान अनाथ मुले दिसली त्यांना सोबत घेऊन वाढवू लागली. अस करत ती अनाथांची माय बनली. एक चांगली सुरुवात म्हणजे तिने लहान मुलांसाठी ममता बाल संस्था उभी केली. 

लोकांकडून देखील त्यांना मदतीचा हात मिळाला. ४ – ५ मुलांची ही माय आता शेकडो मुलांची माय झाली होती. त्यामुळे काम सुद्धा वाढत गेलं, तसे मदतीचे हात सुद्धा वाढत गेले. एक नंतर दोन आणि दोन नंतर तीन अशा संस्था उभ्या होऊ लागल्या. त्यामुळे काम आणखी वाढल.

या कार्याची फक्त गाव, जिल्हा, राज्य किंवा देश इतकीच सीमा न राहता परदेशी सुद्धा त्यांच्या कार्याची माहिती गेली. त्यांनी लावलेलं छोटंसं रोपट त्याच आता वटवृक्ष बनलं होतं. या वटवृक्षाच्या छ्त्रछायेखाली अनेक मुले वाढू लागली होती. तसेच त्या मुलांना एक नवीन ओळख सुद्धा मिळाली.

 त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांना अनेक सन्माने मिळत गेली. गुरमागे फिरत शेण गोळा करणारी, मार खाणारी ती आता फक्त २-४ नव्हे तर साडे सातशे पुरस्कारांची मानकरी बनली. यामध्ये तिला अनेक संस्थांकडून पुरस्कार मिळाले. 

मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून मिळालेले दोन पुरस्कार महत्त्वाचे होते. त्यातील एक म्हणजे २०१२ सा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा होय. तर दुसरा म्हणजे काही दिवसापूर्वीच मिळालेला पद्मश्री पुरस्कार.!

मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला होता. ज्यामध्ये त्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत बोलत होत्या, कसा आहेस रे उध्दवा! असं त्या विचारत होत्या. हा मान त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने मिळविला होता. अलीकडेच वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांना कर्करोग झाला. 

बघता बघता या कर्करोगामुळे त्यांची तब्येत बिघडत गेली. संध्याकाळी पुण्यामधील गलॅक्सी हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याचे वृत्त सर्व चॅनल वर दिसून आलं. अनेक लोकांच्या मनात खळबळ माजली. त्या सुखरूप असुदेत अशी प्रार्थना चालू होती आणि तेवढ्यातच त्या आपल्या थकलेल्या शरीराचा त्याग करून आपल्या सर्वामधून निघून गेल्या. 

अशी बातमी समोर आली. मन फार खंतावून गेल. अनेक अनाथ मुलांची माय पोरक करून निघून गेली. ती कधीही न परतण्यासाठी निघून गेली. परंतु, त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य निघून जाणार आहे काय… नाही ते तर कायम आपल्या स्मरणात राहील. स्वतः अनाथपण तिने भोगलं होतं आणि अनेक अनाथांची माय ती बनली होती. 

ही माय निघून जरी गेली तरी तिच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहणार आहेत. सिंधुताई सपकाळ माई यांना लाख लाख प्रणाम! 

आजचा हा लेख तुम्हा सर्वांना कसा वाटला. सिंधुताई सपकाळ यांची हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली. हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रणींना सुद्धा शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *