नमस्कार मित्रांनो
आपली जवळची व्यक्ती मृ-त पावली तर आपण सुतक पाळतो. त्यात आपण देवपूजा करीत आहेत तेलकट व मसालेदार पदार्थ खात नाहीत. स्त्रिया टिकली लावत नाहीत व एका ठिकाणी बसून आपण दहा दिवस शोक व्यक्त करतो.
पण सुतक म्हणजे नेमके काय? का पाळावे व त्यामागील नेमके वैज्ञानिक कारण काय हे आपल्याला माहीत आहे का? की परंपरा आहे सर्वजण करतात म्हणून आपणही तसेच करावे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये पाहूया.
आपले शरीर हे पंच महाभूतांनी बनलेले असते आपल्या शरीरात नेहमी अग्नी प्रज्वलित असतो. त्यामुळेच आपल्याला
भूक लागते. परंतु शरीरातून आत्मा निघून गेला की, शरीरातला अग्नि विजून जातो व देह निस्तेज होतो आणि जेथे तेज म्हणजेच अग्नि नाही. तेथे विषारी कृमी, कीटक जीवजंतूंची वाढ खूप वेगाने होते.
हे जीवजंतू त्या मृत शरीराच्या आसपास सगळीकडे पसरतात व या जंतूंचा इतरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये. म्हणून व याचा संसर्ग होऊन इतरांना रोग बाधा होऊ नये यासाठी मृ-त शरीर अग्नीत दहन केले जाते.
हा अंतिम विधी करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे हे जीवजंतू सगळीकडे पसरतात. ते खूप सूक्ष्म असतात आणि त्यांना नष्ट होण्यासाठी दहा दिवस लागतात. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात. पण अशिक्षित व्यक्तींना ते समजणार नाही व ते ऐकूनही घेणार नाही.
म्हणून आपल्या पूर्वीच्या ऋषी मुनींनी याला श्रद्धा व प्रेमाच्या चौकटीत बांधले व त्याला सुतक असे नाव दिले. व दहा दिवस सुतक पाळुन एका ठिकाणी बसण्यास सांगितले. म्हणजे त्या जंतूंचा इतरांना संसर्ग होणार नाही व जंतूही नष्ट होतील हे झाले सुतका विषयी.
आता देवपूजा का करू नये हे आपण बघूयात. कुठलाही धार्मिक विधी पूजा, पारायण हे मनापासून केले तर त्यातून ऊर्जा मिळते आणि त्यातून नकळत आनंद व प्रसन्नता प्राप्त होते. सुतक हे आरोग्याच्या दृष्टीने शरीराला असते मनाला नाही.
परंतु घरातील एखादी व्यक्ती मृ-त पावली तर तेथील वातावरण हे मन प्रसन्न होईल इतके शुद्ध नसते. मृ-त पावलेल्या व्यक्तीच्या आठवणी व भेटायला येणारी माणसे यांच्यामुळे काहीही केले तरी उपासना व पूजा करणाऱ्याचे मन एकाग्र होऊ शकत नाही. म्हणून सुतकाच्या काळात दहा ते पंधरा दिवस धार्मिक विधी करू नये असे म्हटले जाते.
आता स्त्रिया टिकली का लावत नाहीत ते आपण बघूया. ज्यांच्या घरातील व्यक्ती मृत पावते ते शोक अवस्थेत असतात. मग त्यांना टिकली लावणे, चांगले कपडे घालणे, डोक्याला तेल लावणे या गोष्टी करणे योग्य वाटत नाही. त्यासाठी वेळही मिळत नाही.
घरातील व्यक्ती मृत झालेली आहे आणि आपण व्यवस्थित तयारी करून राहणे हे योग्य नाही. म्हणून स्त्रिया टिकली लावत नाही तसेच केसांना तेल लावत नाहीत. यामागे कोणतेही धार्मिक व वैज्ञानिक कारण नाही.
तसेच घरातील व्यक्ती जर मृ-त झाली असेल तर त्या व्यक्तीच्या आठवणीत जेवण केले जात नाही व भूकही लागत नाही. म्हणून कमीत कमी जेवण केले जाते व त्या व्यक्तीच्या आठवणी व दुःख म्हणून जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाल्ले जात नाही. अशाप्रकारे सुतक पाळले जाते.
जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद