Skip to content

सूर्यग्रहण जून २०२१- १० जूनच्या सूर्यग्रहणा नंतर या राशीच्या लोकांना जास्त त्रास. बघा तुमची रास तर नाही ना यात.

  • by

नमस्कार मित्रांनो.

या वर्षातली पहिले चंद्र ग्रहण २६ मे रोजी झाले आहे आणि आता वर्षाचे पहिले सूर्यग्रहण होणार आहे. वर्षाचे पहिले सूर्यग्रहण गुरुवारी १० जून रोजी होणार आहे. असे म्हटले जाते की हे सूर्य ग्रहण भारतात अर्धवट दिसेल. जे कुंडलाकार असणार आहे.

खगोल शास्त्राच्या मते सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यात चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. या काळा दरम्यान सूर्याचा ९९ टक्के भाग चंद्राने व्यापलेला असतो आणि सूर्याची बारीकशी तेजस्वी कडी दिसून येते. हे सूर्यग्रहण रिंग ऑफ फायर म्हणून ओळखले जाते. जे चमकदार अंगठी सारखे दिसते.

वर्षाचे हे २ रे ग्रहण अशा वेळी होणार आहे. जेव्हा आपल्या सगळ्यांवर को-रो-ना- सारख्या साथीच्या रो-गां-मुळे संपूर्ण जगाला भरपूर संकटाचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत ५ राशींना खूप त्रास होणार आहे. तर आपण आजच्या लेखामध्ये या राशि बद्दल जाणून घेऊया.

१) वृषभ राशी- वृषभ राशी वर सूर्य ग्रहणाचा प्रभाव होणार आहे. आपल्या राशीसाठी सूर्यग्रहण शुभ मानले जात आहेत. आर्थिक बाबतीतही आपल्याला विशेष नफा मिळण्याची शक्यता आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टीने हे ग्रहण आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकते.

या वेळी आपला खर्च वाढेल. जरी आपण हे पैसे स्वतःवर खर्च कराल. परंतु यावेळी बचत करणे आपल्यासाठी फारच अवघड होणार आहेत. दुसरीकडे ग्रहणाचा अशुभ परिणामामुळे वर्षाच्या अखेरीस तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.

आपण केलेला व्यवसाय करार आपले पैसे बुडवू शकेल. कोणत्याही दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत पैसे गुंतवू नका. प्रेम आणि नात्याचा बाबतीतही हा काळ चांगला नाही म्हणून काळजी घ्या.

२) मिथुन राशी- मिथुन राशि साठी ग्रहणाचा अशुभ परिणामामुळे आपल्याला व्यवसाय आणि नोकरी मध्ये खूप चढ उतरांचा सामना करावा लागू शकतो. आपले खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आणि आपण कर्जात पडू शकतो. म्हणून कोणाकडून पैसे घेताना दहा वेळा विचार करा.

जर आपण शेअर बाजारात गुंतवणुकीच्या विचार करत असाल तर ही कल्पना आत्ताच सोडा. यावेळी कोठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराचा, फॅमिलीचा सल्ला घ्या. ग्रहणा वेळी आपल्या मनात शिवशंकर भोलेनाथाच्या जप अवश्य करा.

३) सिंह राशी- सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अनेक समस्या घेऊन आले आहे. असे म्हटले जाते की सूर्यग्रहण जास्त जास्त वाढेल तसे तसे आपल्या शरीराचा हाडांना त्रास होऊ लागेल. या वेळी आपल्याला आपल्या डोळ्या संबंधी देखील समस्या होऊ शकतात.

चुकूनही उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नका. नोकरी-व्यवसायाच्या बाबतीतही हा काळ तुमच्यासाठी शुभ मानला जात नाही. ऑफिस च्या बाबतीत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या वेळी आपण काळजीपूर्वक पैसे खर्च केले पाहिजेत.

या व्यतिरिक्त आपण यावेळी काही अनावश्यक वादांमध्ये देखील अडकू शकतात. ग्रहणाचा अशुभ परिणाम टाळण्यासाठी भगवंताचे स्मरण करा आणि इतरांना मदत करा.

तूळ राशी- तूळ राशीच्या लोकांसाठी यावेळी सूर्यग्रहण अशुभ प्रभाव देईल. विशेषता ग-र्भ-व-ती महिलांना यावेळी विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे. ग्रहणामुळे आपल्या बाळाला काही नुकसान होण्याची शक्यता असू शकते. हे टाळण्यासाठी ग्रहणा वेळी सुद्धा घराबाहेर जाऊ नका.

दुसरीकडे जर आपण कार्य क्षेत्राबद्दल बोललो तर आपणास नोकरी आणि व्यवसाय या दोघांमध्ये काम केल्यासारखे वाटणार नाही. यावेळी काही कारणास्तव ताणतणाव वाढेल. आर्थिक बाबतीतही आपणास अडचणींना सामना करावा लागू शकतो. ग्रहणा नंतर तुम्हाला एक दोन दिवस कोणतेही काम केल्यासारखे वाटणार नाही.

मकर राशि- या सूर्यग्रहणा मुळे मकर राशीतील मुले आणि तरुणांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अभ्यासाच्या बाबतीत आपल्याला या वेळी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. यासह भावंडांशी असलेले संबंध देखील काही काळ खराब होऊ शकतात.

आपण या वेळी नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही कल्पना पूर्णपणे सोडून द्या. असे करणे आपल्यासाठी हानीकारक ठरू शकते. तसेच यावेळी आपल्या व्यवसायात आपल्याला नफा मिळत नाही.

हे वर्ष जसजशी प्रगती होत जाईल तस तसे आपल्याला आर्थिक फायदा मिळू लागेल. तर या होत्या त्या पाच राशी यांच्यावर सूर्यग्रहणाचा काही प्रमाणात प्रभाव पडणार आहेत बाकी इतर राशीसाठी सूर्यग्रहण अत्यंत अशुभ असणार आहे.

टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.