Skip to content

सोमवारी भगवान शंकर यांचे व्रत करताना या गोष्टी लक्षात ठेवा? आयुष्यभर फायदा होईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

सोमवारी भगवान शंकर यांचे व्रत करताना या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे. बरेच जण हे शिव शंकराचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे व श्रद्धेने शंकराची पूजा अर्चना करत असतात. बरेच भक्त हे सोमवारी भगवान शंकरांचा उपवास देखील करतात. मित्रांनो या दिवशी लवकर उठून स्नान करून शिवमंदिरात जाऊन भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा. तसेच देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल दूध अर्पण करावे.

भगवान शंकर यांना धोतरा बेलपत्र इत्यादी अर्पण करावे. तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करावी. नंतर शिवचालीसा आणि आरती करावी. असे म्हटले जाते की सोमवारच्या दिवशी पती-पत्नीने एकत्र पूजा केली तर यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. घरात समृद्धी आणि कीर्ती नांदते.

याशिवाय मित्रांनो अविवाहित मुली देखील मनाप्रमाणे जोडीदार मिळावा म्हणून सोमवारचे व्रत करतात. परंतु मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असे मानले जाते की भगवान शंकराची सोमवारी पूजा केल्याने उपवास केल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो. परंतु मित्रांनो या दिवशी सोमवारचे व्रत करताना काही नियम देखील आपणाला पाळायचे आहेत.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला सोमवारी प्रत करताना नेमके कोणते नियम पाळायचे आहेत या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो अनेक वेळा सोमवारचे व्रत आणि नकळतपणे काही चुका होतात. आणि या चुकांमुळे उपवासाचे फळ मिळत नाही असे मानले जाते. तर मित्रांनो हे नियम नेमके कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ आणि प्राथमिक विधी आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. शक्य असल्यास मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. आणि व्रताचा संकल्प घ्या. यानंतर भगवान शंकर आणि माता-पार्वतीची पूजा करा. आणि व्रताची कथा नक्कीच ऐका.

मित्रांनो जे लोक सोमवारचे व्रत करतात त्यांनी उपवासात फलाहर घेऊ शकतात. सोमवारी व्रत करण्याचे तीन प्रकार आहेत. यामध्ये सामान्य प्रतिसंवाद सौम्य प्रदोष आणि सोळा सोमवार यांचा समावेश आहे. तिन्ही उपवासाचे विधी आणि उपासनेचे नियम समान आहेत. सर्व उपवासांमध्ये एकदाच भोजन करावे.

त्याचबरोबर मित्रांनो सोमवारच्या दिवशी व्रत करत असताना सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते. मित्रांनो जेव्हा तुम्ही सोमवारच्या दिवशी अभिषेक करत असता त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला तांब्याच्या भांड्यात दूध ओतायचे नाही. तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते. आणि ते महादेवांना अर्पण करणे योग्य राहत नाही. त्यामुळे मित्रांनो शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे.

तरच जला अभिषेक हा आपला पूर्ण होतो. तसेच मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार शिवलिंगावर रोलि आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये. शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा. सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात प्रदक्षिणाकरता तेव्हा हे लक्षात ठेवा. की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका. जेथून दूध वाहते तेथेच थांबुन आणि परत जा.

त्याच बरोबर मित्रांनो शिवाला कधीही तुळस वाहू नये. फक्त शालिग्रामवर वाहिलेली तुळस शीवाला चालते. तर मित्रांनो हे होते काही नियम जे आपणाला सोमवारच्या दिवशी आपण पाळायचे आहेत.आपण ज्यावेळेस भगवान शिवशंकरांचा उपवास करतो. म्हणजे सोमवारच्या दिवशी आपण परत करत असताना हे नियम नक्कीच लक्षात ठेवा.

यामुळे भगवान भोलेनाथ आणि आता पार्वतीच्या कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. तर माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *