Skip to content

स्वामींच्या आवडत्या या ५ गोष्टी जो भक्त पाळतो या गोष्टी त्याच्यावर लवकर होते स्वामींची कृपा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्या स्वामी समर्थांना या पाच गोष्टी अत्यंत मनापासून आवडतात या पाच गोष्टी जो पण फक्त करतो जो पण सेवेकरी करतो या व्यक्तींवर स्वामींची कृपा नक्की होते. आणि स्वामी त्याच्या भक्तीवर त्याच्या कामावर त्याच्या कर्मावर नक्की प्रसन्न होतात व त्याला भरभरून यश देतात तर मित्रांनो तुम्हीही स्वामींचे सेवेकरी आहात.

किंवा नसाल आणि तुम्हाला स्वामींवर त्यांच्या लिलेवर विश्वास असेल तर तुम्ही या स्वामींच्या पाच आवडत्या गोष्टी नक्की करा. जो व्यक्ती या पाच गोष्टी करेल त्याच्यावर स्वामी खुश होतील स्वामी त्याला आनंदी करतील. व भरभरून यश देतील. स्वामींना दुसरे काही हवे नसते स्वामींना हवे असते फक्त ते म्हणजे चांगले कर्म आणि भक्ती.

१) सगुण उपासना- आता सगुण उपासना म्हणजे काय असते ते म्हणजे खऱ्या मनाने मनात चांगले भावाने पूजा करणे सोबतच मनात कोणताही लालच नसणे फक्त सगुण भावाने उपासना करणे स्वामींची पूजा करणे जेही तुमच्या नी होईल. 

११ माळ २१ माळ ५१ माळ  सोबतच स्वामींचा पाठ करावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी तुम्हाला हे पाहिजे म्हणून मी स्वामींची पूजा करते अशी कोणतीही भावना मनात ठेवू नका. 

सोबतच मी एक महिना स्वामींची पूजा करणार दोन महिना स्वामींची पूजा करणार असे दिवस ठरवू नका फक्त तुम्ही स्वामींना मना भावाने आपले गुरू मानून त्यांची पूजा करा. कधी ना कधी तुमचा तो दिवस येईल ज्या दिवशी तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही एकमेकांना तुमचा अनुभव सांगाल. म्हणून स्वामींना पहिली गोष्ट आवडते ती म्हणजे सगुण उपासना.

२) अन्नदान- दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना आवडते ती म्हणजे अन्नदान शक्य तेवढ्या गरजूंना अन्नदान करा. अन्नदान करू शकत नसाल तर दुसरी कोणतीही मदत जी त्या माणसाला हवी असेल ती करा कारण मला फक्त ही पैशांची नसते तर तुमच्या सोबतीची ही मदत कोणासाठी उत्तम ठरू शकते म्हणून मदत नक्की करा.

 तुम्ही कधी ना कधी बघितलं ते आंधळ्या माणसांना रोज रोड क्रॉस करायला मदत लागते पण आपण त्यांना मदत करत नाही कारण आपण घाईत असतो कामात असतो. असे न करता त्यांना मदत करा तसेच मित्रांनो अपंग लोक असतात.

त्यांना बसमध्ये चढायला ट्रेनमध्ये चढायला खूप त्रास होतो तुम्ही त्यांनाही नक्की मदत करा. सोबतच आपल्या घरी किती ना काय वेडा कोणीतरी काहीतरी मागायला आलेला असतो तो बिचारा गरीबला कित्येक वेळी आपण खाली हात पाठवून देतो.

पण तुम्ही तुमच्या साठी जे काही अन्न व चपाती बनवत असाल त्यातून त्याला एक चपाती व थोडी भाजी तर तुम्ही देऊ शकतात. व ती नक्की द्या. कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेलेले आहे त्यापेक्षा कोणतेही मोठे दान या जगात नाही. म्हणून अन्नदान हे स्वामीला खूप आवडते.

३) दत्त महाराजांचे स्वामींचे नामस्मरण- मित्रांनो दत्त महाराजांचे रूप स्वरूप हे श्री स्वामी समर्थ आहे. चला मित्रांनो आपण रोज स्वामींची व दत्त महाराजांची माळ केली किंवा या दोघा स्वामींचा जप नाम तोंडात असले तर नामजप स्वामींना अत्यंत प्रिय असत. कारण स्वामी जेव्हा हयात होते जेव्हा स्वामींचा अस्तित्व या जगात होत जेव्हा ते स्वतः भक्तांना दर्शन द्यायचे.

तेव्हा ते फक्त एवढेच सांगायचे की नामजप करा सर्व काही ठीक होईल. नामजप करायला कधी टाळायचं नाही जर तुम्हाला देवासमोर बसून नामजप करू शकत नसाल तर तुम्ही उठल्या बसता चालता बोलता स्वामींचा नावाचा श्री स्वामी समर्थ असा नामजप करू शकतात.

४) माणूस जोडण्याची आवड व जणप्रियता- मित्रांनो स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं की माणसं कशी जोडायची, माणसांना स्वामी बद्दल माहिती कशी द्यावी.

आपले चांगले अनुभव कसे सांगावे हे त्यांना माहिती असतं म्हणून स्वामींना माणस जोडणारी लोक अत्यंत प्रिय असतात. आणि माणस तोडणारी लोक त्यांना अजिबात आवडत नाही म्हणून माणस जोडा स्वामींचे चांगले अनुभव लोकांना सांगा.

 आणि त्यांना सांगा काही दुःख असतील तर तुम्ही चिंता करू नका आनंदात राहा आपण त्यांना पॉझिटिव्ह विचार दिले होते टीव्ही विचार करायला सांगितले तर तेही आपल्यामुळे थोडेतरी आनंदित होतील. म्हणून माणूस जोडण्याची आवश्यकता असते आणि ही जनप्रीयता स्वामींना खूप आवडते.

५) मित्रांनो स्वामींची दुसरी गोष्ट ती  म्हणजे सध्याची परिस्थिती आहे त्यात समाधानी व आनंदाने राहायचं. म्हणजे आता तुम्हाला देवाने जे दिले ते पण तुम्ही स्वतः कमावले त्याच मध्ये आनंदी व समाधानी राहा. 

कारण आपण असे बरेच व्यक्ती बघतो जे देवाकडे सतत मागणी करत राहतात स्वामींनी मला हे नाही दिल स्वामींनी मला ते नाही दिलं पण असे व्यक्ती स्वामींना कधीच आवडत नाही. स्वामींना हेच आवडतं की तुम्हाला जे काही दिले त्यामध्ये समाधानी.

खुशी व आनंदी राहा. कारण जी परिस्थिती असते ती कधी ना कधी बदलते  ती नेहमीसाठी आपल्या आयुष्यात आलेली नसतेच म्हणून खुश आणि आनंदी समाधानी राहा. तर मित्रांनो या पाच गोष्टी सगुण उपासना गरजूंना अन्नदान स्वामींचे नामस्मरण, माणूस जोडण्याची कला व समाधानी राहणे या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणायच्या. त्याने स्वामी प्रसन्न होतात हे लक्षात ठेवा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *