Skip to content

ही मराठमोळी अभिनेत्री अभिनय सोडून वळली कृषी विभागात. जाणून घ्या सविस्तर माहिती…..!

  • by

नमस्कार.

मित्रहो अनेकांना निरनिराळ्या आवडी निवडी असतात, मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकारांच्या आवडीचे तर नेहमीच अनेक फाटे असतात. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीतून एक मराठमोळी अभिनेत्री विशेष चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री आहे प्राजक्ता गायकवाड. 

प्राजक्ता खूपच प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिची लोकप्रियता देखील भरपूर आहे. सोशल मीडियावर नेहमीच ती खूप सक्रिय असते तसेच चर्चेत देखील असते. त्यामुळे अनेक लोक तिचे खूप चाहते आहेत. प्राजक्ता चे अनेक सुंदर फोटो नेहमी पाहायला मिळतात.

प्राजक्ता जशी दिसायला सुंदर आहे तशीच तिची आवड सुद्धा खूप छान आहे, तिला शेती विभागात खूप रस आहे. तसेच तिला प्राणी देखील खूप आवडतात. ती नेहमी शेतात काम करत असतानाचे, प्राण्यांसोबतचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर नेहमी तिचे शेतातील फोती पाहायला मिळतात. ती अनेक व्हिडीओ देखील शेअर करत असते, व्हायरल झालेल्या एक व्हिडिओ मध्ये ती शेळी च्या पाठीवरून अगदी अलगद कुरवाळताना दिसली आहे. तिला अस पाहून तिचे अनेक चाहते खूप आनंदी झाले असून, काहीजणांनी छान छान कमेन्ट देखील केली आहे. 

तसेच आणखी एका व्हिडीओ मध्ये ती ऊसाचा पाला कापताना दिसून आलाय आहे, त्यामध्ये ती काम असताना पाहिल्यावर अजिबात वाटत नाही की ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. खूपच सराईतपणे ती हे काम करत असल्याचे दिसून येते. 

तसेच आणखी एका व्हिडीओ मध्ये ती बैलाच्या पाठीवरून हाथ फिरवत आहे, त्याला झालेल्या लहानश्या जखमेवर मायेने हाथ फिरवत आहे. कदाचित यावेळी त्या मूक प्राण्याला सुद्धा तिची माया जाणवली असावी. ती त्याला अलगद मिठी देखील मारताना दिसली आहे.

तसेच प्राजक्ताचा अजून एक व्हिडिओ तर खूपच छान आहे, त्यामध्ये ती शेतातील पाटात जे पाणी असते त्यातुन कोमल पावले टाकत चालत जाताना दिसली आहे. हा व्हिडीओ खूपच आकर्षक असून निसर्गाप्रति सर्वांचे प्रेम वाढवतो. तसेच तिच्या आणखी एका व्हिडीओ मध्ये ती झाडांच्या बाबतीत खास माहिती जाणून घेताना दिसली आहे. 

प्राजक्ताला ” स्वराज्यरक्षक संभाजी ” आणि “आई माझी काळूबाई” या मालिकांध्ये झळकताना पाहिले होते. तिने यामध्ये खूपच रेखीव भूमिका साकारून भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेतून तिला एक निराळीच ओळख आणि प्रसिद्धी लाभली आहे.

त्यामुळे अनेकजण तिला खूप पसंद करतात. शिवाय एक उत्तम अभिनेत्री सह ती उत्तम स्त्री देखील असल्याने तिच्या प्रति नेहमीच लोक आदर करतात. प्राजक्ता नेहमी अशीच रसिकांच्या हृदयात राहो ही सदिच्छा. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. 

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *