Skip to content

होळीची ही पौराणिक कथा नक्की ऐका…..तुम्हाला लाभेल पुण्य….

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो येत्या काही दिवसात होळीचा सण येत आहे, त्याची तयारी देखील काहीजणांनी सुरू केली आहे. हा सण खुपच शुभ असतो, या दिवशी घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येण्यास वाट मोकळी होते. त्यामुळे घरातील वातावरण देखील आनंदमय होते, आरोग्य चांगले व सदृढ होते. 

हा सण आपणाला अनेक गोष्टी शिकवून जातो, शिवाय अनेक मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना एकत्र आणतो. होळीमध्ये नकारात्मकता, वाईट गोष्टींचे दहन झाल्याने एक चांगल्या घटना जीवनात घडत राहतात. तसेच खास म्हणजे या दिवशी होळीची कथा कानावर पडणे अत्यंत शुभ असते, ही कथा नक्की ऐकावी.

आज मित्रहो या लेखाद्वारे तुम्हाला या कथेचे कथन केले जाणार आहे, त्यामुळे हा लेख नक्कीच शेवटपर्यंत वाचा. ही कथा जाणून घेतल्याने तुमच्या पुण्यकर्मात आपोआप वाढ होते. आपण होळी साजरी करण्यामागील आख्यायिका सांगताना कथित केले जाते की हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता.

त्याचा पुत्र प्रल्हाद हा श्रीहरी विष्णू देवांचा खूप मोठा भक्त होता. तो नेहमी त्यांची मनोभावे पूजा करत असत, भक्ती करत असत. मात्र त्याचे वडील हिरण्यकश्यपू याचे म्हणणे होते की सर्वांनी त्याचीच पूजा करावी व त्यालाच देव मानावे. त्याला अगदी सर्वलोकी त्याला देव मानावे अशी त्याची इच्छा होती.

पण प्रल्हादाला आपल्या पित्याचे असे हे म्हणणे अजिबात मान्य न्हवते. तो नेहमीच श्रीहरी विष्णूचा करायचा. त्यांच्याच पूजेत मग्न राहायचा. त्यावेळी हिरण्यकश्यपू याने श्रीहरी विष्णूची भक्ती सोडून फक्त हिरण्यकश्यपूची भक्ती करावे अशी सूचना आपला मुलगा प्रल्हाद याला दिली. 

असे खूपदा त्याने प्रल्हादाला समजावले होते, त्याला अशी सूचना दिली होती. मात्र प्रल्हादावर याचा काहीच परिणाम झाला नाही. तो आपल्या पित्याचे म्हणणे ऐकायलाच तयार न्हवते. त्यावेळी हिरण्यकश्यपू प्रल्हादवर खूप जास्त नाराज झाला होता, अखेर त्याचा हट्ट सहन न झाल्याने त्याने प्रल्हादला मारण्याचा बेत केला. 

हिरण्यकश्यपूने अनेकवेळा प्रल्हादाला मारण्याचा डाव रचला पण प्रत्येक वेळी प्रल्हादचे आपोआप रक्षण होत राहिले. तसेच हिरण्यकश्यपू याची एक बहीण देखील होती जीचे नाव होलिका असे होते, तिला भगवंतांकडून एक वर मिळाला होता.

ज्यामध्ये सांगितले गेले होते की तिला अग्निपासून अजिबात धोका होणार नाही. ती आगीत सुद्धा जळू शकणार नाही, तिला काहीच धोका होणार नाही. त्यामुळे हिरण्यकश्यपू याने एक युक्ती योजली, त्याने एक चिता तयार केली. त्यावेळी होलिकाच्या मांडीवर त्याने प्रल्हादाला बसवले व ती चिता पेटवली. 

पण दरम्यान प्रल्हादाला त्यावेळी सुद्धा काहीच झाले नाही, तो अजिबात घाबरला नाही शिवाय त्याने श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करणे देखील सोडले नाही. तेव्हा तिथे चमत्कार झाला व होलिका त्या आगीत पूर्णपणे जळाली मात्र प्रल्हाद तेव्हा देखील सुखरूप आगीच्या बाहेर आला. 

त्यादिवशी असत्यावर सत्याने आपसूकच विजय मिळवला होता, तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. यादिवशी नकारात्मकतेला सकारात्मक शक्तीने मागे टाकले होते. म्हणून यादिवशी मित्रहो तुम्ही देखील देवाची मनोभावे पूजा करा. 

आजचा हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जे आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *