Skip to content

होळी नंतर या राशींच्या समस्या वाढणार, होऊ शकते मोठी गडबड. हे उपाय करा समस्या दूर होतील.

  • by

नमस्कार मंडळी.

मंडळी शुक्र हा भौतिक सुख कला आणि सौंदर्याचा कारक मांडला जातो. जरी शुक्र ग्रह जीवनात शुभ परिणाम देत असेल तरी राहू, केतू किंवा मंगळ यांच्याशी संयोगाने नकारात्मक प्रभाव पडतो. यावेळी होळीच्या अवघ्या चार दिवसांनी म्हणजेच १२ मार्चला शुक्र आणि राहू चा संयोग मेष राशीत होणार आहे, ते ६ एप्रिल २०२३ पर्यंत दोन्ही ग्रह एकत्र राहतील. शुक्र आणि राहुच्या या संयोगामुळे कोणत्या राशींना हानी पोहोचू शकते ते आपण जाणून घेऊयात.

१) मेष रास- शुक्र आणि राहू सहयोग ज्योतिष शास्त्रीय गणनेनुसार शुक्र राहू युती तुमच्या नातेसंबंधात परिणाम करू शकते. नात्यात तुमची फसवणूक होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही थोडे गोंधळात पडू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा टिकवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील.

२) वृषभ रास- राहू शुक्र संयोगानंतर वृषभ राशीच्या लोकांना नवीन संबंधांमध्ये सावधगिरीने पुढे जावे लागेल. जुने संबंध तुमच्या चिंतेचे कारण असू शकतात. लव लाईफ मध्ये तुम्हाला खूप समजूतदारपणे निर्णय घ्यावे लागतील. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या बोलण्याने इतरांचे मन अजिबात अस्वस्थ होऊ देऊ नका हे लक्षात ठेवा.

३) कन्या रास- शुक्र राहू युती देखील कन्या राशींच्या लोकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तुमचे बोलणे कठोर असू शकते. तुमच्या वागण्याने लोक अस्वस्थ होऊ शकतात. अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराला प्राधान्य द्या. त्यांच्याशी अजिबात गैरवर्तन करू नका.

४) मीन रास- शुक्र आणि राहूच्या सहयोगामुळे मीन राशींच्या लोकांना तणावही वाढू शकतो. वैवाहिक जीवनात खूप सावधगिरी बाळगावी लागेल. लव लाइफ मधील समस्या सोडवण्यात अडचणी येतील. कौटुंबिक सहकार्य मिळणार नाही. पती-पत्नी मधील मतभेदही वाढू शकतील. घरगुती त्रास तणाव अशी परिस्थिती दिसून येईल.

मित्रांनो या सगळ्या राशींच्या समस्यांवर आपण उपाय सुद्धा जाणून घेणार आहोत. शुक्र आणि राहू चा संयोग एखाद्या व्यक्तीला खूप त्रास देऊ लागला असेल तर काही विशेष उपाय करणे योग्य आहे. रोज सकाळी शुक्राच्या मंत्राचा जप करा. शुक्रवारी नियमित व्रत करावे.

शुक्रवारी जेवणात दही किंवा खीर सारख्या गोष्टींचा वापर करावा. शुक्रवारी पांढरे कपडे घाला. ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर हिरा किंवा ओपल शुक्राचे रत्न घाला. राहूची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पक्षांना सतनाज द्या. गरजूंना अन्नदान करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *