१० जुलै २०२२ आषाढी एकादशीला या गोष्टी चुकूनही करू नका. नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. 

आषाढी एकादशीला देवसेना एकादशी असेही म्हणतात. या दिवशी फक्त जण उपवास करतात पूजा करतात नामस्मरण करतात. पण हे सगळं करत असताना काही गोष्टी अशा आहेत की ज्या आषाढी एकादशीला चुकूनही करू नयेत. नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो.

कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया. मंडळी मान्यतेनुसार आषाढी एकादशीची अशी एक कथा आहे. की एकेकाळी मृदूअन्य  नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेतल. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवप्रभूंनी त्याला वरदान दिल की तुला कोणत्याही देवाकडून मृत्यू येणार नाही.

परंतु एका स्त्रीच्या हातून तुझा वध होईल. या वरदानामुळे उन्मत्त झालेला मृदू मान्य जेव्हा देवांवर अन्याय करू लागला, आक्रमण करू लागला. या परिस्थितीत सर्व देव पुन्हा भोलेनाथांकडे गेले. परंतु त्यांनी स्वतःच वरदान दिले असल्याकारणाने त्यांनाही काही शक्य नव्हत.

त्यानंतर सगळे देव आणि स्वतः शिवप्रभू सुद्धा एका गुहेत जाऊन लपले. तिथे देवांच्या श्वासातून एक देवी प्रकट झाली. या देवीचे नाव होतं एकादशी. तिने मृदू मांण्याचा वध करून देवांची सुटका केली. या दिवशी भरपूर पाऊस हि पडला आणि देवांना स्नानही घडल.

तसेच देवगृहेत लपून बसल्यामुळे बुद्ध मांडण्याचा झाला. तेव्हापासून एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. तेव्हापासून एकादशी सुरू झाली असं म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशीचे व्रत करत भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते. त्यामुळे सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते.

पण या एकादशीच्या दिवशी काही गोष्टी अशा आहेत की ज्या अजिबात करू नये. त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भात खाऊ नये. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी कधीही चुकूनही भात खाऊ नये. तुम्ही जरी उपवास करणार नसला तरीसुद्धा. जो व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खातो त्या व्यक्तीला विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही आणि पाप त्याच्या हातून घडतं असं म्हणतात.

त्याचबरोबर मिठाचे सेवन करू नये. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये.किंवा खाल्लं तरी कमी प्रमाणात खाव. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी मांसा हार करू नये शास्त्रानुसार एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानल जात. 

त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसा हार करू नये. सात्विक आहार घ्यावा. आणखी काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचं सेवन एकादशीच्या दिवशी करू नये. एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर, तूर डाळ, वांगी, कांदा लसूण यांचे सेवन करण टाळावं. तसं तर तुम्ही उपवास करणार असाल तरी या गोष्टी खाण्याचा संबंध येत नाही.

पण जरी एखाद्या व्यक्ती उपवास करणार नसेल तरीसुद्धा त्याने या गोष्टी खाणे टाळावे. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी पानही खाऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खोटं बोलू नये. जुगार खेळू नये, मद्यपान करू नये. 

आणि मगाशी म्हटलं तसं मांसाहार करू नये. इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही करू नये. सात्विक आहार घ्यावा . सात्विक विचार करावे. आणि ईश्वराचे नामस्मरण करत राहावं. मग मंडळी तुम्ही सुद्धा एकादशीचे व्रत करणार असाल तर जय हरी विठ्ठल  लिहायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.