Skip to content

११ नोव्हेंबर नंतर बदलेल या ६ राशींचे दिवस. जुळून येतील धनलाभाचे योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी ११ नोव्हेंबरला शुक्रदेव आपले स्थान बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. या संक्रमणामुळे अनेक राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होऊ शकतात. ज्योतिष शास्त्र नुसार अकरा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी शुक्रदेव संक्रमण करतील.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रदेव हे शुक्राचार्य राक्षसांचे गुरु आहेत. शुक्र संपत्ती समृद्धी वैभव प्रेम आणि सौंदर्य दर्शविते. शुक्र देवाच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो ते जाणून घेऊया.

१) मकर रास- मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीतील पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे नोकर दारांसाठी हा कालावधी अनुकूल असू शकतो. त्यांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. तसेच पगारही वाढू शकतो. या काळात वैयक्तिक आयुष्य ही चांगले राहण्याची संभावना आहे. सामाजिक स्थिती सुधारण्याबरोबरच आर्थिक लाभ होऊ शकतो.

२) कुंभ रास- शुक्र हा कुंभ राशीच्या कुंडलीतील चौथ्या घराचा स्वामी आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वेळोवेळी प्रोत्साहन मिळू शकते. आणि पगारात वाढ ही होऊ शकते.

३) तूळ रास- शुक्र हा तूळ राशीच्या लोकांच्या कुंडलीतील आठव्या घराचा स्वामी आहे. त्यानुसार या राशीच्या लोकांना या संक्रमणामुळे आर्थिक लाभही होऊ शकतो. उत्पन्नाचे सोस्त्र वाढवण्याची संभावना असून गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला करू शकतो. 

४) धनु रास- धनु राशीच्या लोकांच्या कुंडलीतील सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. निर्यातीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. 

५) मीन रास- उच्च शिक्षणाची संबंधित या राशीच्या लोकांना या काळात यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. सल्लागार म्हणून काम करत असलेल्या लोकांनाही चांगले परिणाम मिळू शकतात.

६) सिंह रास- शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या काही व्यवसायिकांनाही या काळात फायदा होऊ शकतो. या काळात सिंह राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *