Skip to content

१२ नोव्हेंबर मोठा शनिवार, संकष्टी चतुर्थी बाप्पाला वाहा हे ‘लाल’ फुल इच्छा ताबडतोब होईल पूर्ण…

  • by

नमस्कार मित्रांनो.

माघ हा मुख्यतः भगवान श्रीहरी विष्णू तसेच सूर्यदेव यांच्या उपासनेचा महिना मानला जातो. गणेश जयंतीला गणपती बाप्पांना नक्की अर्पण करा हे एक फुल. मनातील कोणतीही इच्छा नक्कीच पूर्ण होईल. १२ नोव्हेंबर शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जात.

 जर आपल्या जीवनात काही इच्छा असतील जे अनेक प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसतील तसेच कार्यामध्ये अडथळे येत असतील तर ते काम पूर्ण होण्यासाठी आणि याच बरोबर आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल मग ती कोणतीही इच्छा असेल किंवा घरामध्ये काही नकारात्मक उर्जा असेल तर ते दूर करण्यासाठी या या संकष्टीला जर काही विशेष उपाय केले तर आपली ती सर्व कामे मार्गी लागतात. 

बाप्पा आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी आनंद देतो. त्याच बरोबर श्री गणेशाचे आगमन झाल्याने आपल्या घरामध्ये सर्व शुभ कार्य घडू लागतात. आजच्या दिवशी केलेली विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा ही जास्तीत जास्त लाभदायक ठरते. त्यामुळे या दिवशी त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय सुद्धा नक्की करा. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा नक्की कशी करायची तर सकाळी लवकर उठायचं आहे. 

स्नानादी निवृत्त व्हायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवघरातील बाप्पांची मूर्ती घ्यायची, त्यानंतर एका चौरंगावर लाल रंगाचा स्वच्छ वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे , लाल रंग हा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लाल रंगाच स्वच्छ वस्त्र चौरंगावर अंथरायचं आहे आणि त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल ती स्थापित करायचे आहे. स्थापित केल्यानंतर गणपतीबाप्पांना आवाहन करायचा आहे.

त्यांची विधीवत पूजा करायचे आहे आणि त्यांच्या सोबतच महादेव माता पार्वती नंदी आणि कार्तिक  भगवान असा जो परिवार आहे त्यांची सुद्धा मनोभावे पूजा करायचे आहे. गणपती बाप्पांना गंध अक्षता फुले अर्पण करायचे आहेत. धूप दीप दाखवायचा आहे.  गणपती बाप्पांना जास्वंदीची फुले आणि दुर्वा  अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्यांची पूजा करताना जास्वंदीचे फूल आणि दूर्वा अर्पण करायला विसरु नका.

जर तुम्हाला जास्वंदी चे फुल मिळाल नाही तर कोणताही लाल रंगाचे फूल तुम्ही अर्पण करू शकता आणि याबरोबरच आणखी एक फुल गणपती बाप्पांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचा आहे आणि ते म्हणजे कण्हेरीचे फुल. कण्हेरीचे लाल रंगाचे जे फूल आहे तेसुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला कण्हेरीचे फुल गणपती बाप्पाच्या चरणी नक्की अर्पण करा. 

यानंतर अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचे पठण सुद्धा करायचा आहे. गणपती बाप्पांचे अशी काही श्लोक असतील स्तोत्र मंत्र असतील तर ते सध्या तुम्ही या ठिकाणी बोलू शकता. त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवायचा आहे. ज्याप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणपती बाप्पांना आपण मोदकांचा नैवेद्य दाखवतो तर माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांना माव्या पासून बनवलेले पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

त्या पासून बनवलेले लाडू गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. शक्यतो हा नैवेद्य घरात बनलेला असावा. जर तुमच्याकडे त्याचा एखादा पदार्थ नसेल तुम्ही  तीळ आणि गूळ सुद्धा गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. असे मानले जाते की जी व्यक्ती या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचे पदार्थ नैवेद्द  करते त्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती मिळते. 

हे देखील शक्य असेल तर या दिवशी गणेश मंदिरात जाऊन तेथे जाऊन गणपतीची मनोभावे पूजा करावी. या दिवशी जर आपण २१ दुर्वांच्या २१ जोड्या बनवून यांचे माळ गणपती बाप्पांना अर्पण केली तर यामुळे सुद्धा आपल्या इच्छा कोणतीही असुद्या ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील. तुमच्या जीवनातील सर्व विघ्न गणपतीबाप्पा दूर करतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *