Skip to content

१२ राशी व त्यांचे स्वभाव. बघा तुमची किंवा तुमच्या घरातील व्यक्तींशी जुळतेय का ही माहिती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आपण जाणून घेऊया १२ राशी व त्यांचे स्वभाव. 

मेष राशी- मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीची देवता भगवान विष्णू आहे. या राशीचा जप मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः हा आहे. मेष राशीची उपास्य देवता श्री गणेश आहेत. या राशीचे रत्न पोवळे आहे. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून हि रास क्रांतीवृत्ताच्या एक १ ते ३० अंशात पसरली आहे. 

मेष राशीच्या व्यक्ती तापट कर्तबगार व्यवहारिक दृष्टिकोन ठेवणारा धिट महत्वकांक्षी कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणारा अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नांवर अधिक विश्वास असतो. हे आरसीक, वृक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात. 

काल पुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास जसे दाह, मस्त क्षुल, तसेच चेहऱ्याचा पक्षघात, नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे, असे विकार होतात. मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी सैन्य अधिकारी पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.

वृषभ राशि- वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीची देवता वासुदेव विश्व रूप आहेत. या राशीचा जप मंत्र ओम क्लिम विश्व रुपया नमः हा आहे. वृषभ राशीचे उपास्य देवता दुर्गादेवी आहे. तसेच या राशीचे रत्न हिरा आहे. वृषभ राशि वर शुक्र ग्रहाची मालकी आहे. हि रास कष्टाळूपणा शोषितपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोउद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही सम राशी आहे. 

कुंडलीतील समस्थानात समराशी सामान्यतः बलवान असते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पात राशी आहे. चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात. ती पृष्ठ उदय राशी आणि रात्री बली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे. वृषभ ही रास चंद्राची उच्च रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी बुद्धिमान असतात. लोकांना आपल्याशी करणारी ही रास आहे. यांना बँकिंग क्षेत्रात उत्तम यश मिळते. यांना सिनेमा नाटके नवीन गाणी बघण्याची व सेंट वगैरे सुगंधित वस्तू वापरण्याची व इंटरियर डेकोरेशनची खूप आवड असते. 

मिथुन राशी- मिथुन राशीचा स्वामी हा बुध आहे. मिथुन राशीची देवता केशव आहे. या राशीचा जप मंत्र ओम क्लिम केशवाय नमः असा आहे. या राशीची उपास्य देवता श्री कुबेर आहेत. मिथुन राशीचे रत्न पाचू आहे. मिथुन राशि वर बुध ग्रहाची मालकी आहे. ही रास वायु तत्वाची आहे. या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती हे दोन महत्त्वाचे गुण या राशीत आढळतात. 

कर्क राशी- कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. कर्क राशीची देवता हरिवंश आहे. या राशीचा जप मंत्रिम हरिहराय नमः हा आहे. कर्क राशीची उपास्य देवता शिव आहेत. तसेच या राशीचा रत्न मोती आहे. ही राशी चार आकड्याने दर्शवतात. पुनर्वसू नक्षत्राचे एक चरण पुश्य आणि आश्लेषा ही नक्षत्र मिळून ही रास बनते. कर्क राशीचा जलप्रदेश समुद्र नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. 

कर्क रास पृष्ठोदय आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते. साधारणपणे ही रास चंचल कोमल सौम्य पण अस्थिल स्वभावाची दिसून येते. ही रास रजगुनी जलतत्व युक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी कफ प्रकृतीची स्त्री प्रधान आणि बहु संततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा लज्जा आणि विवेक आहे. 

सिंह राशी- सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सिंह राशीची देवता भगवान मुकुंद आहेत. या राशीचा जप मंत्र ओम बालमुकुंदाय नमः हा आहे. या राशीची उपास्य देवता सूर्यदेवता आहे. तसेच या राशीचे रत्न माणिक आहे. ही राशी अग्नि तत्व राशी आहे. या ग्रहावर रवी ग्रहाची मालकी आहे. ही राशी वन्या राशी म्हणूनही ओळखली जाते. 

कुंडलीमध्ये हे पाच आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कार्यक्रम आहेत. ही अग्नितत्त्व पुरुष राशी आहे. राशीचा स्वामी सूर्य आहे. यांना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती तत्त्वनिष्ठता आकर्षता आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिंमत ठेवतात. मिरवण्याची खूप हौस असते. मानसन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते. 

कन्या राशि- कन्या राशीचे स्वामी हा बुध आहे. कन्या राशीची देवता पितांबर आहे. या राशीचा जप मंत्र ओम क्लिम परमात्मने नमः असा आहे. कन्या राशीची उपास्य देवता श्री कुबेर आहेत. तसेच या राशीचे रत्न पाचू आहे. कन्या रास एक ज्योतिष राशी आहे. राशीवर बुधाचा अंमल आहे. द्विस्वभाव पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. 

मीन रास ही कन्या राशीची विरोधी रास मानली जाते. उत्कृष्ट बुद्धिमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळीच कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती या राशीत आढळते. बुद्धीचातुर्य हजरजबाबीपणा हास्यविनोद यांच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते. पैशाच्या बाबतीत काटेकोर दूरचा विचार करणारी ही माणसे असतात. यांना माणसाची उत्तम पारक असते. 

तुळ राशी- तूळ राशीचे स्वामी हा शुक्र ग्रह आहे. तुळ राशीची देवता भगवान राम आहेत. या राशीचा जप मंत्र ओम श्री रामायण हा आहे.  या राशीची उपास्य देवता दुर्गादेवी आहे. तसेच या राशीचे रत्न हिरा आहे. तूळ हा एक अंतराळातील तारखा समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष राशी आहे. यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे.

तुळ रास- कुंडली मध्ये सात आकड्याने दर्शवितात. ही वायूतत्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या व्यक्ती आकर्षक सुंदर प्रेमळ कष्टाळू सौंदर्यप्रेमी न्यायप्रिय आणि नीतीवान असतात. या व्यक्तींमध्ये अंतकरण जाणून घेण्याची हातोटी दिसून येते. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीची देवता जानकीजी आहे. या राशीचा जप मंत्र ओम श्री क्लीम जानकी रामायण हा आहे. तसेच या राशीची उपास्य देवता श्री गणेश आहेत. आणि या राशीचे रत्न पोवळे आहे. या राशीवर मंगळ ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिर स्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास आहे. ही रास असणारी माणसे शारीरिक दृष्ट्या चिवट काटक व स्पष्ट वक्ते असतात. त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते. आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात. 

धनु राशी- धनु राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीची देवता धरणी धर आहे. या राशीचा जप मंत्र ओम भिम श्रीम क्लिम धरणीधराय नमः हा आहे. धनु राशीची उपास्य देवता श्री दत्तात्रेय आहे. तसेच या राशीचे रत्न पुष्कराज आहे. ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर गुरु ग्रहाचा अंमल आहे. ही द्विस्वभावी राशी आहे. ही रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीसा संतापी पण याचवेळी संयमी आणि सात्विक असतो. माणसात अध्यात्माची ओढ दिसते. तो आशावादी असतो. आणि त्याच्यात परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. 

मकर राशि- मकर राशीचा स्वामी हा शनी आहे. मकर राशीची देवता ब्रह्ममातृक आहे. या राशीचा जप मंत्र ओम श्री वत्साय उपेंद्रय नमः हा आहे. मकर राशीची उपास्य देवता हनुमान आहेत. तसेच या राशीचे रत्न नीलम आहे. या राशीवर शनीचा अंमल आहे. व्यवहारी धोरणे महत्त्वकांक्षी शिस्तप्रिय अशी ही रास आहे. मकर राशीचे लोक खूप व्यवहारी धोरणी महत्त्वकांक्षी शिस्तप्रिय संयमी असे असतात. मकर राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टींबद्दल थोडीशी निराशा वृत्ती असते. 

कुंभ राशी- कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे. कुंभ राशीची देवता गोपाल गोविंद आहे. या राशीचा जप मंत्र ओम श्री गोपाल गोविंदाय नमः असा आहे. कुंभ राशीची उपास्य देवता दत्तात्रेय आहे. तसेच या राशीचे रत्न नीलम किंवा गोमेद आहे. ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. 

मित्रांनो राशी  मिथुन व तुळ त्यांना प्रिय बोललेले आवडते. आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुंभ राशीला सगळ्या गोष्टींची आधीच माहिती असते. कुंभ राशीचे लोक हुशार मैत्रीपूर्ण निसर्गप्रिय प्रामाणिक स्वावलंबी नवीन संकल्पना सुचणारी असतात. या राशीला आहारावर नियंत्रण करणे सहज जमते. 

मीन राशी- मीन राशीचा स्वामी हा गुरु आहे. या राशीची देवता चक्रपाणी आहे. या राशीचा जप मंत्र ओम क्लिम चक्राय नमः हा आहे. मीन राशीची उपास्य देवता हनुमान आहेत. तसेच या राशीचे रत्न पुष्कराज किंवा लसणी असे आहे. ही द्विस्वभावी राशी आहे. कन्या रास मीन राशीच्या विरोधी रास मानले जाते. माशाला पाठीचा कणा नसतो. 

त्यामुळे मीन मानसिक व शारीरिक बाबतीत खूप लवचिक असतात. मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर संवेदनशील कल्पक कधीही नाही न म्हणणारे असे असतात. मीन राशीला व्यवहार जमत नाही. तसेच जास्त वेळ लक्ष देणारा व्यायाम प्रकारांना ते कंटाळतात. खाण्यावर ताबा अजिबात नसतो. पोहोता न येणारी मीन राशीची व्यक्ती क्वचितच आढळते. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *