नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की वर्षाचा पहिला सण मकर संक्रांति असतो. सूर्य जेव्हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच संक्रांति असे म्हणतात. मकर राशीत जातो म्हणून त्याला मकर संक्रांति असे म्हणतात.
मकर संक्रांति १४ जानेवारीला येत आहे. तर मित्रांनो १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये तुम्ही चुकूनही हे काम करू नका. नाहीतर तुमच्या वर सुद्धा शनीदेवाचा कोप होईल. तर मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करायला नाही पाहिजे.
कारण हा दिवस सूर्यदेवाचा आणि शनिदेवाचा मानला जातो. हा दिवस शनीशी निगडित आहे. म्हणून या गोष्टी हे काम अजिबात तुम्ही करू नका. मित्रांनो यातले पहिले काम आहे ते म्हणजे नॉनव्हेज. मकर संक्रांतीच्या दिवशी खायचे नाही. किंवा घरात करायच नाही. यांने शनि देव नाराज होतात.
सूर्यदेव नाराज होतात. आणि समस्या आपल्या वाडू शकतात. दुसरी गोष्ट आहे. भांडण वाद-विवाद चिडचिडपणा अजिबात तुम्ही तुमच्या घरात करू नका. याने सुद्धा शनीचा कोप होऊ शकतो. शनिदेव आणि सूर्यदेव तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्यसनी माणसासाठी व्यसनी माणसाला रोज दारु लागतेच. गुटका लागतोच. त्याला व्यसन असेल ते लागतेच. तर मकर संक्रांतीच्या दिवशी त्याने अजिबातच कोणतेही व्यसन करू नये. नाहीतर शनीचा कोप होईल. आणि साडेसाती सुद्धा लागू शकते.
मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे वाईट बोलू नका. वाईट वागू नका. या दिवशी कोणाबद्दलही वाईट विचार सुद्धा करू नये. आपले मन पवित्र ठेवावे. मनात चांगले विचार ठेवावे. याने शनिदेव प्रसन्न होतात. मित्रांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी अंघोळ करताना अशीच पाण्याने अंघोळ करू नये.
त्या पाण्यामध्ये एक चिमूटभर तीळ टाकावी आणि त्यानंतर आंघोळ करावी. याने सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात. तर मित्रांनो ही काही कामे आहेत ती तुम्ही या दिवशी चुकून सुद्धा करू नका. नाहीतर साडेसाती लागेल. शनीचा कोप सुद्धा होऊ शकतो.
मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद