नमस्कार मित्रांनो.
वर्ष २०२२ चंद्रग्रहण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला आहे. अर्थात १६ मे रोजी पूर्ण चंद्रग्रहण असेल. या चंद्र ग्रहणाचा प्रभाव भारतात कमी असेल. १६ मे ला सकाळी ८:५९ मिनिटांनी हे चंद्र ग्रहण सुरू होईल. आणि सकाळी १०:३० मिनिटांनी समाप्त होईल.
वर्षातलं हे पहिले चंद्रग्रहण दक्षिण पश्चिम युरोप पश्चिम आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका पॅसिफिक महासागर हिंद महासागर अटलांटिका आणि अंटार्टिका या भागातही दिसणार आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी वैध ठरणार नाही.
खर तर कुठल्याही ग्रहणाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर होत असतो. चला तर मग जाणून घेऊया वर्षातल्या पहिल्या चंद्रग्रहणाचा परिणाम कोणत्या राशीसाठी शुभ असणार आहे. सुरुवात करुया मेष राशी पासून.
मेष राशी- या वर्षातलं हे पहिले चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ दिसत आहे. या राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी शोधणार्यांना सुद्धा नोकरी मिळेल आणि नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बढती देखील मिळेल गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे.
कुटुंबात सुखशांतीचे वातावरण तयार होईल. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तेसुद्धा पूर्ण होऊ शकत. पैशाच्या बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागेल. आणि आईच्या तब्येतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. कर्ज घेण्यापासून दूर रहा. अतिउत्साहामुळे नुकसान होऊ शकत. गोंधळामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण जाईल.
सिंह राशी- या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हे ग्रहण शुभ राहील. आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं खूप कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले होतील. नोकरीत चांगली बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. कमाईचे साधन वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुम्हाला जोडीदाराचा सहकार्य मिळेल.
वाद आणि गोंधळाच्या परिस्थितीपासून दूर राहण्याचा मात्र प्रयत्न करा. धन हानी होऊ शकते. वैवाहिक जीवनातही चढ-उतार येऊ शकतात. संघर्षाची गती टाळण्याचा प्रयत्न करा आणि अज्ञात गोष्टींची भीती वाटू शकते. तर ती सुद्धा वाटून घेऊ नका. ईश्वरचरणी प्रार्थना करत रहा. प्रतिस्पर्ध्यांना पासून सावध राहा. कारण त्यांच्यामुळे नोकरी आणि करियर मध्ये अडचणी येऊ शकतात.
धनु रास- या राशीच्या लोकांसाठी सुद्धा ग्रहण शुभ राहील. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे मात्र टाळा.
अन्यथा नुकसान होऊ शकते. याकाळात तणावपूर्ण परिस्थितीतून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. मेहनतीचे फळ मिळेल थोडा धीर धरा. पैशांच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. रागावर नियंत्रण मात्र ठेवावे लागेल. प्रवास आणि वाहन चालवणे टाळा.
मकर राशि- आर्थिक समस्या सुटतील तसेच कर्ज प्रकरण करण्यासाठी अर्ज केला असेल तेही मान्य होतील. तसेच कर्जाच्या संबंधित सर्वच समस्या सुटतील. तुमच्या वरिष्ठ मंडळींचे तुम्हाला सहकार्य मिळेल. तसेच तुमच्या आयुष्यात मानसन्मान येईल.
कन्या राशि- या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी भगवद्गीतेचे वाचन करायचे आहे. तसेच या दिवशी चंद्र दर्शन, चंद्र उपासना करावी. ओम सोम सोम आय नमः या मंत्राचा जप करावा.
तसेच काळजी घ्या. अति उत्साहाने नुकसान होऊ शकत. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. आणि कुटुंबातील मोठ्या भावासोबत चे संबंध प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे थोड सावध रहा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.