नमस्कार मित्रांनो.
१५ जानेवारीपासून ५ राशी आशा आहेत ज्यांना सावध राहायला सांगितले जाते पण कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांनी राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सावध राहायचं म्हणजे नक्की काय करायचं काही उपाय करायचे आहेत का? चला हे सर्व जाणून घेऊया.
मित्रांनो १७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. आता ही एक ज्योतिष शास्त्रीय घटना आहे. आणि या घटनेचा परिणाम आपल्या बाराही राशींवरती होणार आहे. आणि त्यापैकी ५ राशी आशा आहेत. ज्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय.
१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकतो. काहींना मानसिक तणावाला सामोरे जावं लागू शकतो. उत्पन्नाच्या तुलनेत जास्त खर्च होईल. प्रगतीत अडथळे येऊ शकतात. तुमच्या वडिलांसोबतचं नातं जरा जपा आणि त्यांच्याशी वाद घालू नका. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. परंतु २२ एप्रिल पासून या राशीमध्ये गुरूचा प्रवेश झाल्यानंतर शुभ वार्ता मिळू शकतील आणि सन्मानही वाढेल. म्हणजे सावध राहायचे फक्त २२ एप्रिल पर्यंत पण यावर एक उपाय आहे तो उपाय मी या लेखाच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हे शेवटपर्यंत वाचा.
२) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश संमिश्रच ठरणार आहे. काम आणि व्यवसाय आणि तसेच प्रगतीमध्ये अडथळे येथील. काम आणि धावपळीमुळे आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. कुटुंबामध्ये काही गोष्टींमुळे मतभेद होऊ शकतात. कोणाशीही बोलताना काळजी घ्यावी. विचार करून बोला. वडील आणि शिक्षकांचा आदर करा. उत्तरधात काही रखडलेल्या कामांमध्ये यश सुद्धा मिळेल.
३) सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश जरा संमिश्रच ठरेल. व्यावसायिक गुंतागुंती वाढू शकते. कामकाजात अडचणी येऊ शकतात. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. भावंडांमध्ये मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकतात. कोणत्याही प्रकरणाची गुंतवणूक न करण्याच्या सल्ला या काळात दिला जातो.
४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचा ढिय्यीचा प्रभाव दिसून येईल. पैशांची संबंधित गोष्टींना सामोरे जावं लागू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. घरगुती आणि व्यवसाय संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. आणि नातेसंबंध बिघडणार नाहीत याकडे लक्ष द्या.
५) मीन रास- मीन राशींच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश जरा वेगळे ठरेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणार आहे. ज्यामुळे आर्थिक संतुलन बिघडू शकते. काम करताना अडचणी येऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये सावधगिरी बाळगा. व्यवसायिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकतो. सोशल मीडियापासून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा.
मात्र २२ एप्रिल नंतर गुरुने मेष राशीत प्रवेश केल्यावर लाभ आणि प्रगतीच्या संधी आहेत. शनीच्या कुंभ प्रवेशाने साडेसाती चक्र बदलणार आहे. धनु राशीची साडेसाती पूर्णपणे संपणार आहे. मीन राशीची साडेसाती सुरू होणार आहे. मकर राशीची साडेसाती शेवटच्या टप्प्यात असेल आणि कुंभ राशीची साडेसाती दुसऱ्या टप्प्यात असेल.
उपाय -आता ज्या काही राशी आहेत त्यांनी एक उपाय करायचा आहे, रोज मारुतीस्तोत्र म्हणायचा आहे. मारुतीची उपासना करायची आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी नक्कीच कमी होणार आहे. आणि बजरंग बली त्यांचे रक्षण करणार आहे. मग बोला जय बजरंग बली.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.