१७ मार्च होळी स्वामींना या वेळी दाखवा हा नैवेद्य, स्वामी प्रसन्न होतील.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो स्वामी समर्थ जेव्हा हयातीमध्ये होते. तेव्हा त्यांचे भक्त त्यांचे सेवेकरी त्यांना अनेक सणावारा दिवशी विविध नैवेद्य आणून त्यांना खाऊ घालायचे. आणि स्वामिनी आवडीने ते नैवेद्य खात होते. 

असे काही स्वामींचे आवडते नैवेद्य आवडते पदार्थ होते. जे स्वामींना अत्यंत आवडायचे आणि सणवार आले की ते भक्त त्यांना त्यांचे आवडते नैवेद्य घेऊन जायचे. आणि स्वामी आवडीने खायचे. तर मित्रांनो असाच एक सण होळीचा सण होळीच्या सणाच्या दिवशी सुद्धा तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. 

कोणताही सण असतो त्यावेळी स्वामींना विशेषता नैवैद्य दाखवला जातो. तर तुम्हीसुद्धा होळीच्या दिवशी स्वामी समर्थांना हा नैवेद्य नक्की दाखवा. स्वामी प्रसन्न होतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील. आता तुम्हाला स्वामींना नैवेद्य केव्हा दाखवायचा आहे. कारण होळी तर संध्याकाळी पेटवली जाते. 

आणि होळीला नैवेद्य सुद्धा संध्याकाळी दाखवला जातो. तर तुम्ही हा नैवेद्य संध्याकाळी स्वामींना दाखवू शकता. किंवा जर तुम्ही नैवेद्यासाठी जेवण सकाळी करत असाल. तर सकाळी सुद्धा तुम्ही हा नेवेद्य स्वामी समर्थांना दाखवू शकता. 

होळी साठी एक वेगळा नैवेद्य काढून ठेवायचा आहे. तर तुम्हाला नैवेद्य मध्ये स्वामींना काय दाखवायचे आहे. तर होळीच्या दिवशी स्वामी समर्थांना पुरणपोळी आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. 

बऱ्याच लोकांना माहित असेल आणि बर्‍याच लोकांना माहीतही नसेल. तर होळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी पुरणपोळी खीर करायचे आहे. जर शक्य नसेल तर पुरणपोळी आणि दूध सुद्धा स्वामींना दाखवू शकता. 

किंवा हे सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साधी पोळी दूध त्यामध्ये एक चमचा साखर टाकून स्वामींना दाखवू शकता. फक्त हा नैवेद्य विशिष्ट नैवेद्य म्हणून दाखवला जातो. कारण यामध्ये काही तरी गोड दाखवायचे असते. म्हणून तुम्ही गोड दूध आणि चपाती हा नैवेद्य देऊ शकता. 

आणि जमलं तर तुम्हाला पुरणपोळी आणि खीर याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवा. या सोबत आमटी भात करा त्यासोबत तुम्ही एखादी चपाती लिंबू कापून ठेवू शकता. त्यावर तुळशीचे पाणी ठेवायला अजिबात विसरू नका. 

मग ते पोळी आणि दूध देत असाल किंवा पुरणपोळी आणि खीर देत असाल पण तुळशीचे पाने त्यावर आवर्जून ठेवायचे आहेत. स्वामींना एक तर पुरणपोळी खीर आमटी भात असा नैवद्य द्या किंवा जमतच नसेल तर तुम्ही एक चपाती आणि गोड दुध स्वामींना दाखवू शकता. 

तर आठवणीने हा नैवेद्य स्वामींना दाखवायला विसरू नका. तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.