Skip to content

१८ ऑक्टोंबर पासून या ३ राशींना ‘अच्छे दिन’. अचानक चमकून उठेल या राशींचे नशिब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १८ ऑक्टोबर पासून काही राशींना अच्छे दिन येणार आहेत. अस काय विशेष घडणार आहे १८ ऑक्टोंबर पासून. १८ ऑक्टोबरला शुक्राचे गोचर होणार आहे शुक्राचे गोचर म्हणजेच भ्रमण. शुक्र हा ग्रह दिवाळीपूर्वीच तूळ राशीत गोचर करणार आहे. थोडक्यात काय तर तूळ राशीमध्ये शुक्र असणार आहे आणि शुक्राची मूळ रास आहे तुळ रास. 

त्यामुळेच अर्थात शुक्राच्या या गोचरामुळे सर्वच राशींवर काही ना काही प्रभाव पडणार आहे. पण तीन राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे मार्गक्रमण शुभदायक लाभदायक ठरणार आहे. आणि अच्छे दिन घेऊन येणार आहे अस म्हणायला हरकत नाही. या राशी कोणत्या आणि त्यांना लाभ नक्की कसा होणार आहे. चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिली रास आहे कन्या रास.

कन्या रास- शुक्र ग्रहाच्या गोचाराचा कन्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. शुक्र गोजरासह कन्या राशीच्या कुंडलित दुसऱ्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान वाणिज्य संबंधित आहे अर्थात बोलण्याशी संबंधित आहे. आणि म्हणूनच हे नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. तसेच धनलाभाचे सुद्धा उत्तम योग आहेत. 

विशेष म्हणजे तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतात. परिणामी आनंदी आनंद गडे. तुम्हाला घरगुती कार्यक्रमात नातेवाईक जोडीदाराकडून सुद्धा मानसन्मान मिळण्याची चिन्हे आहेत. तुमच्या भावंडांची साथ तुम्हाला लाभू शकते. जर तुम्ही मीडिया मार्केटिंग अशा क्षेत्रात असेल तर तुम्हाला प्रगतीचे लाभ मिळू शकते.

धनु रास- शुक्र देवांचे तुळ राशीत संक्रमण हे करिअरसाठी सर्वच क्षेत्रात तुम्हाला शुभ वार्ता घेऊन येणार आहे. शुक्र धनु राशि मध्ये अकराव्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. हे स्थान धनलाभ आणि शांतीसाठी शुभ मानले जाते.

शुक्र गोचराने आपल्याला व्यापार वृद्धीचे योग आहेत. शेअर मार्केट मध्ये उत्तम गुंतवणुकीचा योग आहे. पण घाई अजिबात करू नका. तज्ञांचा सल्ला घ्या. तुमचे जोडीदाराबरोबर काही वाद चालू असतील तर ते संबंध सुधारण्यासाठी सुद्धा हा काळ तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल.

मकर रास- शुक्र देवांचे हे गोचर अनेकांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण घेऊन येणारे ठरणार आहे. यातली तिसरी आणि महत्त्वाची रास असणार आहे मकर रास. शुक्र गोचर होतास मकर राशीत शुक्र दहाव्या स्थानी विराजमान होणार आहेत. हे स्थान शुभ मानले जात असल्याने मकर राशीच्या व्यक्तींना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. 

शुभ वार्ता कानी पडतील. जे अगोदरच नोकरी करत आहेत त्यांना प्रगतीचे नवे द्वार उघडतील. पगारातही वाढ होण्याचे संकेत आहेत. तुम्ही प्रॉपर्टी च्या दृष्टीने नवीन काही मार्ग बघत असाल तर हे निर्णय शुभ असणार आहेत. तुमचा खर्च नाहीतर गुंतवणूक वाढवून प्रगतीच होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *