Skip to content

२०२३ मध्ये या ३ राशींना अच्छे दिन. या ३ राशींना शनी कृपेचा होईल अनुभव.

  • by

नमस्कार मित्रांनो.

२०२३ या नवीन वर्षामध्ये तीन राशींना येणार आहेत अच्छे दिन. पण कोणत्या आहेत त्या तीन राशी आणि अच्छे दिन येणार म्हणजे नक्की त्यांच्या आयुष्यात काय घडणार चला जाणून घेऊया. मित्रांनो २०२३ या नवीन वर्षामध्ये १७ जानेवारीला शनी ग्रह मकर राशीतून कुंभ राशी प्रवेश करेल. आणि या स्थित्यंतराचा शुभ परिणाम ३ राशींवर होईल.

तर त्या तीन राशींपैकी पहिली रास असणार आहे धनु दुसरी रास असणार आहे मकर आणि तिसरी रास असणार आहे कुंभ रास. आता कुंभ आणि मकर या राशीला साडेसाती चालू आहे पण तरीसुद्धा त्यांना शनि महाराजांच्या कृपेचा अनुभव कसा मिळणार आहे चला जाणून घेऊया.

मकर आणि कुंभ ही शनि देवांची हक्काची स्थान आहे. धनु राशीची साडेसाती संपणार आणि मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे. साडेसातीचा काळ हा खडतर असला तरी या काळात परीक्षा बघितली जाते. या काळात कोणाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर कोणासाठी हा काळ उत्कर्षाचा ठरतो.

या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो तर शनिदेव साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये भरपूर लाभ सुद्धा देतात. म्हणून मकर राशीच्या दृष्टीने हे स्थित्यंतर महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच धनु आणि कुंभ राशीच्या वाट्याला सुद्धा चांगलाच काळ येणार आहे. १७ जानेवारी नंतरचा काळ धनु राशीसाठी पूर्णपणे अनुकूल असेल.

साडेसातीच्या या काळात आलेल्या अनुभवावरून ते भावी आयुष्यात यशस्वी वाटचाल करतील. यासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नांना उपासनेची जोड द्यावी. विशेषतः शिवशंकराची उपासना त्यांना फलदायी ठरू शकते. १७ जानेवारी रोजी मकर राशीचा अंतिम टप्पा सुरू होणार आहे. मकर राशीच्या वाटायला खडतर प्रवास ठरलेला असतो. मात्र १७ जानेवारी नंतर त्यांच्या वाट्याला अच्छे दिन येणार आहेत.

रखडलेली काम मार्गी लागतील. आर्थिक अडचणी दूर होतील. जानेवारीमध्ये मागी गणेशोत्सव देखील आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मकर राशीच्या लोकांनी गणेश उपासना सुरू करावी. विघ्नहर्ता गणपती बाप्पा त्यांना येणाऱ्या काळात सुखच सुख देईल. आता बोलूया कुंभ राशीबद्दल शनिच्या सिद्धंतराचा शुभ परिणाम कुंभ राशीच्या वाट्याला येणार आहे.

वास्तविक त्यांची साडेसाती सुरू आहे साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. परंतु कुंभ म्हटल्यावर शनीची प्रिय रास आहे हे सुद्धा विसरता कामा नये. आणि शनिदेव कुंभ राशीत येणार आहेत म्हटल्यावर स्वगृही येणार आणि त्याचाच फायदा कुंभार असेला होणार आहे. अडचणी येतील पण मार्गही सापडतील. कष्ट घ्यावे लागतील पण यश सुद्धा मिळेल.

त्यामुळे साडेसाती असूनही नसल्यासारखीच त्यांना वाटेल. शारीरिक मानसिक आर्थिक लाभ होतील. त्यांनी आपल्या प्रयत्नांना मारुती उपासना महादेवांची उपासना आणि शनी उपासनेची जोड द्यावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *