Skip to content

२०२३ सुरू होताच या राशीची साडेसाती संपणार. अचानक चमकुन उठणार या राशींचे भाग्य.

  • by

नमस्कार मित्रांनो.

२०२३ मध्ये एका राशीची साडेसाती संपणार आहे. कोणती येते रास साडेसाती संपल्यामुळे त्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नक्की काय बदल होणार आहेत आता तरी प्रगती होणार आहे का? चला जाणून घेऊया. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहांपैकी असलेले शनिदेव हे कर्मफल दाताआहेत. अर्थात मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात.

जर मनुष्याचा कर्म चांगला असेल तर निश्चितच त्याला चांगलं फळ मिळते. मनुष्याचं कर्म जर चांगलं नसेल तर मात्र त्याच्या पाठी साडेसाती लागणार. साडेसातीचा त्रास सुद्धा त्या मनुष्याला होणार. तशी तर साडेसाती सगळ्यांच्याच आयुष्यात येते पण ज्यांची कर्म कठीण असतात त्यांची साडेसाती सुद्धा कठीण असते. यांची कर्म चांगले आहेत त्यांना साडेसाती चांगली जाते. त्यामुळे आपली कर्म चांगली ठेवा असं आपल्याला म्हटलं जातं.

आता ज्योतिष शास्त्रानुसार जी एक रास आहे जिची साडेसाती तून सुटका होत आहे. रास कोणती आहे ते आता आपण पाहूयात. पण त्याआधी शनीचा गोचर कसं होत आहे हे आपण पाहूयात. अर्थात शनिदेव कुठून कुठल्या राशीत कसे भ्रमण करणार आहेत हे पाहुयात. जानेवारीमध्ये शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. त्यामुळेच एका राशीची साडेसाती संपणार आहे. आणि एका नव्या राशीला साडेसातीचा सामना करावा लागणार आहे .

१) धनु रास- रास आता मुक्त होणार आहे. शनि देवाच्या साडेसाती पासून आता साडेसाती धनु राशीची संपल्यानंतर या राशीची प्रगती मध्ये येणारे सगळे अडथळे दूर होणार आहेत. त्यांची जी काम अडकले असतील कितीतरी दिवसांपासून कितीतरी वर्षांपासून ती आता मार्गी लागतील. त्यांच्या नोकरीची समस्या असेल तर ती सुद्धा आता सुटणार आहे. आयुष्यात आनंदी आनंद येईल.

समृद्धीचे वातावरण निर्माण होईल. इतके वर्ष जो काही त्रास त्यांनी काढला आहे आता तो संपला म्हणून समजा. मुख्यतः प्रॉपर्टी बद्दल तुमचे जे काही काम अडून राहिलं होतं ते आता मार्गी लागेल. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल. तर तुम्हाला प्रगतीची नवीन संधी येईल. नोकरी सुद्धा येईल. तुमच्या व्यापारात सुद्धा धनलाभाचे संकेत आहेत. आता धनु राशीची लोक निवांत झाली असणार यात काही शंकाच नाही. पण त्या राशीचं काय ज्या राशीच्या मागे आता साडेसाती लागणार आहे.

२) मीन रास- मीन राशीची साडेसाती जानेवारी महिन्यापासून सुरू होणार२०२३ पासून मीन राशीला साडेसाती सुरू होणार आहे. शनी ग्रहाने कुंभ राशीत गोचर करताच मीन राशीची साडेसाती सुरू होईल. म्हणजेच जानेवारी २०२३ पासून कुंभ मकर आणि मीन या तीन राशी राशींना साडेसाती असेल. लक्षात घ्या कुंभ आणि मकर या राशींची साडेसाती चालूच आहे. मकर राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे.

कुंभ राशीचा मधला टप्पा आहे. मीन राशीचा मात्र पहिलाच टप्पा आहे. पण आता मीन राशीच्या व्यक्ती किंवा मकर राशीच्या व्यक्ती ज्यांना ऑलरेडी साडेसाती चालूच आहे त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही साडेसाती मध्ये काही उपाय केले तर तुमची साडेसाती कमी होऊ शकते. साडेसातीचा त्रास कमी होऊ शकतो.

साडेसाती मध्ये तुम्ही हनुमान चालीसा चा पाठ करा. तर मंगळवारी जर तुम्ही हनुमान चालीसा म्हंटली हनुमानाचं दर्शन नित्यनेमाने घेतलं त्याचबरोबर गोरगरिबांना दानधर्म केला तर तुम्हाला साडेसाती मध्ये काहीही त्रास होणार नाही.
शनि देवांना गोरगरिबांना मदत केलेली आवडते.

जो व्यक्ती इतरांचा दुःख जाणतो त्याचं दुःख शनिदेव जाणतात. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनी सुद्धा घाबरून जाण्याची गरज नाही तर तुम्ही साधना करा उपासना करा तुमच्याकडे गुरु मंत्र असेल तर गुरु मंत्राची साधना करा गोरगरिबांना अन्न खाऊ घाला नक्कीच तुमची साडेसाती सुद्धा चांगली जाईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *