Skip to content

“२०२४” ८ राशींना भाग्याचा काळ, या राशींवर शनी, गुरू राहुची कृपा तर इतर राशींवर वाईट…!

नमस्कार मित्रांनो.

जवळजवळ सर्वांनाच नववर्षाच वेड लागलाय काही दिवसांनी २०२४ या नवीन वर्षाचे जोरदार उत्साहात स्वागत केले जाईल. २०२३ या वर्षात घडलेल्या घटनांचा स्मरण करून नवीन जोमाने आशेने अपेक्षेने आणि नवीन वर्षासाठी संकल्प केले जातील. नवीन वर्षासाठीचे प्लॅन कार्यक्रम योजना आतापासूनच आखल्या जात आहेत. मात्र नवीन वर्षाचा वेड लागल्याने २०२४ वर्ष अनेक अर्थाने विशेष ठरू शकेल अस ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते.

त्यात या ८ राशींवर शनी गुरु आणि राहूची कृपा असणार आहे. म्हणून त्यांना भरपूर संधी नोकरीत व्यापारात भरपूर लाभ आणि हा भाग्याचा काळ ठरू शकणार आहे. कोणत्या आहेत त्या आठ राशी त्यात तुमचे राशीचा समावेश आहे का तुमच्या राशीसाठी २०२४ कसा असेल त्याचा प्रभाव कसा असेल त्याचा प्रभाव कसा असेल चला जाणून घेऊयात.

१) मेष रास – मेष राशीसाठी २०२४ वर्ष करिअरच्या दृष्टीने थोड आव्हानात्मक असणार आहे. गुरु ग्रह जेव्हा वृषभ राशि प्रवेश करेल तेव्हा आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना या वर्षात करावा लागू शकतो. काही गोष्टींबाबत मानसिक दबाव सुद्धा या वर्षात राहील. व्यावसायिकांसाठी हा चांगला काढणार आहे.अन्य व्यावसायिकांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र कामानिमित्त प्रवासामुळे आपल्या जोडीदाराशी मतभेदही होऊ शकतात. रियल इस्टेट मध्ये काम करणाऱ्यांना नफा मिळू शकेल. शिवाय मेष राशींची कालांतराने आर्थिक स्थिती ही सुधारेल.

२) वृषभ रास – वृषभ राशींना २०२४ मध्ये नवे रंग भरले जातील. शनी कृपेने चांगला नफा होऊ शकेल. बहुतेक सुखात वाढ ही होऊ शकेल संपत्ती मानस मनातही वाढ होईल. प्रवासासाठी नवीन वर्ष चांगल राहील. गुरु गोचनानंतर काही आर्थिक समस्यांना सामोरे जाव लागू शकत. या सोबतच मुलांमुळे त्रासही होऊ शकेल. तर करिअरमध्ये काही चढ-उतार येतील. काही आव्हानासह २०२४ मध्ये करिअर मध्यम चांगले होईल. भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मध्यम ते चांगली राहू शकेल.

३) मिथुन रास – २०२४ मध्ये मिथुन राशीच्या आयुष्यात नवीन चमक येऊ लागेल. वाहन सुख मिळण्याची शक्यता या काळात आहे शिवाय वडिलोपार्जित संपत्ती ही मिळेल.विद्यार्थ्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी ठरणार आहे. इथून राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले निकालही मिळू शकतील. करिअरमध्ये अनेकजण प्रभावित होतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षात नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू केल्यास सुरुवातीला तणाव असेल पण हळूहळू व्यवसायात जम बसू लागेल. शिवाय वैवाहिक जीवनात सुसंवाद ही राहील मिथुन राशींच्या व्यक्तींना येणार २०२४ मध्ये कुटुंबांकडून पूर्ण सहकार्याचा असेल. आरोग्याची काळजी या काळात घ्यावी लागेल. नवीन गुंतवणूक किती नफा मिळण्याची शक्यता आहे.

४) कर्क रास- कर्क राशीसाठी २०२४ वर्ष जीवनात आनंददायी ठरणार आहे. २०२४ मध्ये कर्क राशीसाठी राशी स्वामी चंद्र आनंदाचे क्षण घेऊन येईल. शनी भैय्या सुरू आहेत काही जुन्या गुंतागुंतीच्या समस्यांवरही उपाय मिळतील. शिवाय बौद्धिक क्षमतेचा फायदाही होईल. परदेश दौऱ्यावर जात असाल तर हे वर्ष परदेश दौऱ्यासाठी अनुकूल नाही. म्हणून या काळात परदेश दौरा टाळावा.

कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला चांगले निकाल नक्कीच मिळतील. शिवाय २०२४ मध्ये आर्थिक ताकदही वाढेल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी नक्की बाळगावी. कारण यामध्ये समस्यांना स्तवर जावं लागू शकत. गुंतवणुकीच्या बाबतीत चांगले परिणाम या वर्षात मिळणार मात्र अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.

५) सिंह रास – सिंह राशींसाठी येणाऱ्या वर्षत सप्तम स्थानातील काहीशा आर्थिक समस्या शनी प्रभाव नाही येऊ शकतात. राहू आणि केतू यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असेल. व्यावसायिकांसाठी काही विशेष घडेलच अस नाही. कामावर असमाधान मात्र नक्की येईल. त्याबरोबरच तणावपूर्ण नकारात्मक परिस्थिती यावेळी निर्माण होऊ शकेल. मात्र परिणाम तुमच्या बाजूला असेल. शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित कामात प्रगती होईल. शिवाय अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाही.

म्हणून तेव्हा राशीच्या व्यक्तींनी याकडे विशेष लक्ष द्याव. २०२४ या वर्षात सिंह राशीसाठी कोणताही सरकारी निर्णय करिअरवर परिणाम करेल. व्यवसायाबाबतची योजना कराल ती यशस्वी होईल. मुलांमुळे आपली मानसिक शांतता ही कमी होईल. आरोग्याची मात्र या काळात काळजी घ्यावी. २०२४ मध्ये गुंतवणूक इथून सिंह राशीच्या लोकांना नफा मिळण्याची जास्त शक्यता आहे. मात्र खर्च वाढू शकतात. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात नुकसान होण्याची ही शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित बाबींकडे थोडी सावित्री वाढवावी.

६) कन्या रास – कन्या राशीसाठी नवीन वर्षात नवीन व्यवसायातून फायदा होईल. परदेशात जाण्याची संधी या काळात मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल. शिवाय निर्णय घेताना खूप सावध राहण्याची गरज २०२४ वर्षात आहे. कोणत्याही चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकत. विद्यार्थ्यांसाठी वर्ष खूप चांगलं जाणार आहे कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले परिणाम मिळतील. मात्र ऑफिसमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानसिक त्रास होऊ शकतो. मालमत्ता आणि वाहन व्यवसायातून लाभ कन्या राशीना होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यताही या काळात आहे. शिवाय आरोग्याची काळजी ही नवीन वर्षात घेणं जास्त फायदेशीर ठरेल.

७) तूळ रास – नवीन वर्षामध्ये सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकतात. करिअर साठी खूप चांगला काळ आहे. वर्षाच्या मध्यभागी काही मानसन्मान प्राप्त होऊ शकतात. व्यवसायकांसाठी चांगला काळ राहील. शिवाय कायदेशीर गुंतागुंतीमुळे काही अडचणींचा सामना तूळ राशींच्या व्यक्तींना नवीन वर्षात करावा लागू शकेल. उच्च पदावर असलेल्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. तूळ राशीच्या व्यक्तींना सहकार्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर २०२४ या नवीन वर्षात व्यवसायात नवीन आव्हानांना तूळ राशींच्या व्यक्तींना सामोरे जाव लागू शकत.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या व्यक्तींना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उत्तम काळ राहू शकेल. व्यवसाय विस्तारित उत्तम वाहन सुखही मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. नवीन वर्षात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य संशोधन करण मात्र आवश्यक आहे. एखाद्याच्या हृदयात दडलेल्या मत्सरांच प्रकटीकरण एखाद्याचा विवेक अस्वस्थ करेल. लांबची प्रवास करावी लागतील खर्च खूप जास्त असेल विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनेकांना सामोरे जावे लागू शकेल. धीर धरावा संयम ठेवावा याचे नक्कीच फायदे होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्ती ज्या वैद्यकशास्त्रांचा शिक्षण घेत असेल त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला जाणारा आहे. काही वृश्चिक राशींच्या व्यक्ती जोडीदाराच्या विचित्र वागणुकीमुळे चिंतेत राहतील. मात्र आरोग्य सामान्य राहील.

९) धनु रास – धनु राशीसाठी २०२४ हे नवीन वर्ष नशिबाची उत्तम साथ देणारा ठरेल. करिअरला नवीन चालना मिळेल.शैक्षणिक क्षेत्रातही नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. व्यवसायातील करार निश्चित होईल. शिवाय आईकडून लाभ मिळण्याची ही शक्यता आहे. लांब प्रवास आणि पदोन्नतीची शक्यता या काळात आहे. २०२४ हा काळ करिअरच्या दृष्टिकोनातून अनुकूल असेल. मात्र धनु राशींचे व्यक्तींना अनावश्यक खर्चामुळे चिंता वाटू शकेल.

१०) मकर रास – मकर राशींना मुलांकडून काही फायदा होऊ शकेल. २०२४ मध्ये आकर्षण खूप वाढेल. आर्थिक स्थिती थोडी कमवत असेल. थोडी सावध राहावे. विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल.मालमत्ता आणि व्यवसायाच्या बाबतीत सावध रहाणे आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहाव शिवाय मकर राशींच्या व्यक्तींचे जीवनात जे व्यवसाय करत असतील त्यांच्या व्यवसायात नवीन सौदे निश्चितच होऊ शकतात. गेल्या काही वर्षापासून बिघडलेल्या जुन्या नातेवाईकांशी नाते आता सुधारू शकेल. मकर राशीच्या लोकांना पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कोणतीही जुनी गुंतवणूक नफा देणारी ठरेल.

११) कुंभ रास – कुंभ राशींच्या व्यक्तींना २०२४ या वर्षात करिअरच्या बाबतीत काहीसा संमिश्र काळ असू शकेल. आत्मविश्वासामुळे नवीन दिशा मिळेल. शनी साडेसातीमुळे विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम ही होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेत निदर्शकारक रिजल्ट मिळू शकतात. अभ्यासाबाबतीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शिवाय काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडी प्रतीक्षा करण्याची गरज आहे. आरोग्यच्या बाबतीत थोड सावध राहाव. याचबरोबर आर्थिक बाबतीत हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे.

१२) मीन रास – मीन राशींच्या व्यक्तींना उत्पन्नाच्या बाबतीत काही गोष्टी बाजूने दिसत नाहीत. उत्पन्नात घट झाल्यामुळे खिशावर ताण येऊ शकेल. कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मीन राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला राहील. शिक्षणात अनेक आव्हानांचा सामना या काळात करावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ लाभदायक नाही. मीन राशीच्या व्यक्ती दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक परिस्थितीमुळे थोडे विचलित राहतील.

अशाप्रकारे २०२४ मध्ये आत्ताच्या घडीला मकर कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. तीस वर्षभर कायम असेल. याचबरोबर नवग्रहांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी राहू आणि केतू अनुक्रमे मीन शिवाय कन्या राशीत असतील. येणारी सन २०२४ चे वर्ष काही राशींसाठी अतिशय उत्तम अनेक बाबतीत ठरू शकतील. तर काही राशीसाठी काहीसा संमिश्र काळ असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *