नमस्कार मित्रांनो.
२१ जानेवारीला एक चांगला योग जुळून आलाय आणि तो म्हणजे पौष महिन्यातील येणारी मौनी अमावस्या शनिवारी आली आहे. आणि त्यामुळे ती आहे शनि अमावस्या सुद्धा मग अशावेळी तुम्ही तीन उपाय केलेत तर तुमच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते. मग कोणत्या आहेत ते तीन उपाय चला जाणून घेऊया.
१) तुम्हाला शनि अमावस्येच्या दिवशी जे पहिल काम करायच आहे ते आहे तर्पण आणि पिंडदान अमावस्येच्या दिवशी पित्राचे तर्पण आणि पिंडदान करणे शुभ मानले जाते. या दिवशी नदीच्या काठावर दक्षिण दिशेला तोंड करून पाण्यामध्ये तीळ टाकून पित्रारांना अर्पण करा. त्याचबरोबर पिंडदानही करा. असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते. पूर्वजांच्या आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभतात. आणि घरात पितृदोष असेल तोही दूर होतो.
२) दुसरी गोष्ट करायची आहे ती अगदी तुम्ही सहज करू शकता ती म्हणजे दानधर्म मौनी अमावस्येला दिलेल्या सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. म्हणूनच या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पीठ,तांदूळ, घोंगडी, तीळाचे पदार्थ, मिठाई,साखर,दुध किंवा उबदार कपडे गरजू आणि गरीब लोकांना दान करू शकता. त्यामुळे तुमच्या जीवनात आलेली संकटे दूर होतील आणि समोरच्याची गरजही भागेल.
३) सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि तिसरी गोष्ट आहे ती तुम्हाला करायचे आहे. ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता करायची आहे पण ती कशाप्रकारे तर घराची साफसफाई करताना पाण्यामध्ये मीठ टाकायचा आहे. त्या मिठाच्या पाण्याने तुम्हाला घर स्वच्छ करायचा आहे, फरशी पुसायची आहे. अगदी तुम्ही एक चमचाभर मीठ टाकू शकता किंवा खडे मीठ सुद्धा टाकू शकता.
हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. कधी कधी असं होतं ना माहित नाही आपल्याला घरात खूप अस्वस्थ होते प्रसन्न वाटतच नाही अशावेळी तर हा उपाय करूनच बघायला हवा. जर तो तुम्ही अमावस्येच्या दिवशी करत असाल तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. घरातील सगळीच इडापिडा बाहेर निघून जाईल.
मित्रांनो मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही सूर्याला सुद्धा अर्घ्य देऊ शकता. अर्थात सूर्याला पाणी अर्पण करू शकता. पण ते कशा पद्धतीने करायचा आहे एक तांब्याचे भांडे घ्यायचा आहे अर्थातच तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कुंकू टाकायचा आहे, लाल फुल टाकायचा आहे आणि काळे तीळ सुद्धा टाकायचे आहे हे तुम्हाला सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला अर्पण करायचा आहे. त्याचं सुद्धा फळ तुम्हाला नक्कीच चांगला मिळेल.
त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्ही प्राणी, पक्षू पक्षांना खायला दिल. कोणताही प्राणी असेल गाय, कुत्रा, मुंगी किंवा पक्षी तर त्यांना थोडेसे दाणे,पोळी काही ना काही खायला द्या. त्यामुळे तुमचे पित्राही संतुष्ट होता. आणि मुक्या प्राण्यांची भूकही भागते. शनि देवाची शनिवारी नक्की पूजा करा. त्याचा विशेष फळ आहे. म्हणूनच शनि देवाला मोहरीचे तेलही अर्पण करा. आणि मोहरीच्या तेलाचा दिवा घरामध्ये सुद्धा लावा. पण त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात ठेवा.
शनी अमावस्याला केस कापू नका, नखे कापू नका, दाढी करू नका. त्यामुळे दोष निर्माण होतो. सगळ्यात महत्त्वाचं मध्य पिऊ नका,जुगार खेळू नका, चोरी करू नका आशा कर्मापासून लांब राहा. कारण शनि महाराज कर्मफल दाता आहेत. तुमच्या कर्माचा फळ ते देतात देतात.
शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही कुठल्याही वाईट कृत्य तर त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. म्हणूनच या दिवशी दुराचार्या विचार, दुर्व्यवहार यासारख्या कर्मांपासून लांब राहा. खरतर यासारख्या कारणांपासून लांबच राहायला हव. पण कमीत कमी शनि अमावस्येच्या दिवशी तरी सावधगिरी बाळगा. मग नक्की शनि महाराजांची कृपा तुमच्यावरती होणार.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.