नमस्कार मित्रांनो.
मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कुणी राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर देश आणि जगावर दिसून येतो. तसेच हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. धन आणि वैभव देणारा शुक्र कन्या राशित प्रवेश करणार आहे. जी सर्वांत नीच राशी मानली जाते.
म्हणजे कन्या राशीतील शुक्र अशुभ फल देतो. त्यामुळे या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण या तीन राशी आहेत ज्यांनी या काळात खूप काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी. पहिली सिंह रास.
सिंह रास- शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी थोडे कष्टदायक ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत शुक्राचे द्वितीय भावात भ्रमण होणार आहे. ज्याला पैशाचे आणि वाणीचे घर म्हणतात. या काळात कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच यावेळी तुमचा बॉस किंवा तुमच्या कामाशी सहकाऱ्यांची वियोग होऊ शकतो.
एखाद्या विषयावर मानसिक अस्वस्थता असू शकते. मुलाच्या बाबतीत समस्या असू शकतात. यावेळी तुमच्या व्यवसायात पैसे कमी होऊ शकतात. दुसरीकडे सिंह राशीवर सूर्य देवाचे राज्य आहे. आणि ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि सूर्यदेव यांच्यात वैराची भावना आहे. त्यामुळे तुम्ही जरा सावध राहा. दुसरी कर्क रास.
कर्क रास- शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी थोडे हानिकारक ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून शुक्र तिसऱ्या घरात प्रवेश करेल. ज्याला धैर्य शक्ती आणि लहान भावंडाचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य कमी होऊ शकते. तसेच भावंडांशी मतभेद होऊ शकतात. तुम्ही व्यवसायात हुशारीने निर्णय घ्या.
व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये दुष्काळजीपणा करू नका. अन्यथा नुकसान होऊ शकते.कर्क राशींचा स्वामी चंद्र देव आणि ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि चंद्र यांच्यात वैर आहे. त्यामुळे तुम्ही जरा सावध रहा. तिसरी मेष रास.
मेष रास- शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी थोडे कष्टदायक ठरू शकतेऋ कारण तुमच्या गोचर कुंडलीत शुक्र सहाव्या भागात गोचर करणार आहे. ज्याला शत्रू आणि रोगाचे स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला काही आजार होण्याची शक्यता आहे.
तसेच या काळात गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. व्यवसायात नुकसान होऊ शकते. एक महत्त्वाचा करार अंतिम होता होता थांबू शकतो. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता असू शकते. अनावश्यक खर्च वाढू शकतो. यामुळे तुम्ही जरा सावध राहा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.