Skip to content

२५ ऑगस्ट २०२२- गुरुपुष्यामृत योग, गुपचुप करा गुलाब फुलांचा हा उपाय लक्ष्मी धावत येईल घरी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

२५ ऑगस्ट २०२२ गुरुवारचा दिवस आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे. सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. तिथी आहे श्रावण कृष्ण त्रयोदशी तर अशा या गुरुपुष्यामृत योगावर आपण सुद्धा आपल्या घरात माता लक्ष्मीचे प्रसन्न करणारे काही छोटे छोटे उपाय अगदी आवर्जून करा. 

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की २७ नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे आठवे अत्यंत शुभ नक्षत्र आहे. आणि अशा गुरुपुष्यामृतावर केलेल कोणतंही कार्य सफल बनत.माता लक्ष्मीचा आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा कृपाशीर्वाद त्या व्यक्तीच्या पाठीशी नक्की राहतो. गुरुपुष्यामृत योग हा धन आणि समृद्धीचा कारक आहे. आणि म्हणूनच या दिवशी अनेक लोक सोन्या-चांदीची खरेदी करतात.

मौल्यवान वस्तू खरेदी करतात. अनेक लोक घराची आणि वाहनांची खरेदी करताना सुद्धा दिसून येतात. जर तुमचाही विचार असेल घर वाहन किंवा फ्लॅट प्रॉपर्टी वगैरे विकत घेण्याचा तर त्यासाठी हा अत्यंत शुभ योग आहे. नवीन उद्योग धंदा जर सुरू करावयाचा असेल नवीन बिजनेस ची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी सुद्धा गुरुपुष्यामृत योग अतिशय उत्तम योग मानला जातो. 

कारण गुरुपुष्यामृत योगावर सुरू केलेला बिजनेस लक्ष्मीच्या कृपेने हा नेहमीच लाभस्थानी राहतो. त्या उद्योग व्यवसायात नेहमी लाभ होतोच होतो. तर मित्रांनो पाणी आणि संहितेनुसार या गुरुपुष्यामृत योगा वरती आपण कोण कोणते उपाय करू शकतो. जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि आपल्या घरात धनवैभव पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. पैसा उत्तरोत्तर वाढत जाईल. यासाठी कोणकोणते उपाय करावेत चला तर आपण जाणून घेऊया.

मित्रांनो त्यातील पहिला सर्वश्रेष्ठ उपाय आहे. तो म्हणजे माता लक्ष्मीची या दिवशी मनोभावे पूजा करणे. आपल्या देवघरांमध्ये जी काही माता लक्ष्मीची तस्वीर फोटो किंवा मूर्ती आहे. त्या मूर्तीची आपण या गुरुपुष्यामृत योगावर मनोभावे पूजा करा. ही पूजा करण्यापूर्वी अर्थातच आपल्या घराची अंगणाची आपण व्यवस्थित साफसफाई करा. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे. 

त्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने  किंवा हळदीने एक स्वस्तिक नक्की रेखाटा आपल्या मुख्य दरवाजाला एक छान असं अशोकाच्या पानांच किंवा आंब्याच्या पानांच तोरण सुद्धा लावा. घरासमोर छानशी रांगोळी काढा. या सर्व गोष्टी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करणाऱ्या असतात. या सर्व गोष्टी केल्याने माता लक्ष्मी म्हणजेच सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते. 

मित्रांनो माता लक्ष्मीची पूजा करताना विशेषत्वाने लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे कमल गट्ट्याची माळ असेल किंवा स्पटिकांची माळ असेल तर या माळावरती आपण माता लक्ष्मीचा दारिद्र्य नष्ट करणार आणि धनसमृद्धी वाढवणारा मंत्र ओम ह्रीं श्रीं दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करा. कमीत कमी १०८ वेळा तरी या मंत्राचा जप आपण करायला हवा.

जर आपल्याकडे स्पटिकांची किंवा कमल गट्ट्याची माळ नसेल कमल गट्टा म्हणजे कमळाच्या बियांची माळ. नसेल तर आपण कोणत्याही धान्याचे १०८ दाणे मोजून घ्या. आणि या दाण्यांच्या मदतीने आपण हा मंत्र जप करू शकता. मित्रांनो माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करताना जर खीर बनवली तर अतिउत्तम होईल किंवा कोणतेही सफेद रंगाची मिठाई सुद्धा आपण माता लक्ष्मीच नैवेद्य म्हणून भोग म्हणून अर्पण करू शकता. 

माता लक्ष्मीस कमळाची फुले किंवा गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत. कोणतेही लाल रंगाची फुले आपण माता लक्ष्मीस नक्की अर्पण करा. आणि आपली जी काही मनोकामना आहे पैशांशी संबंधित ती त्या ठिकाणी नक्की व्यक्त करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या देवघरामध्ये किंवा तिजोरी श्री यंत्राची यंत्राची स्थापना नक्की करावी.

श्रीयंत्र हे धन धान्यांमध्ये वृद्धी घडून आणणारे यंत्र मानलेल आहे. आणि गुरुपुष्यामृत योगा सारख्या अत्यंत मंगलकारी योगा वरती या श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात केल्यास त्यामुळे लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि धनप्राप्तीची नवनवीन योग सुद्धा सातत्याने निर्माण होतात. पैसा कधीच कमी पडत नाही. अनेक लोक या दिवशी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना सुद्धा करण पसंत करतात. 

विशेष करून दक्षिणावर्ती शंखावरती माता लक्ष्मीचा मंत्र लिहिला जातो. आणि हा शंख आपल्या देवघरामध्ये ठेवतात. मित्रांनो याने सुद्धा धनवृद्धीचे योग निर्माण होतात. पती-पत्नी यांनी या योगावर एक छोटासा उपाय करावा. कोणतीही सोन्याची वस्तू दोघांनीही धारण करावी आणि एकत्रितरित्या माता पार्वती आणि शिवशंकराची पूजा करावी. 

अशी मान्यता आहे की वैवाहिक जीवन सुखमय करण्यासाठी पती-पत्नीतील प्रेम वृद्धींगत करण्यासाठी हा उपाय अत्यंत सफल ठरतो. मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा तर येतो भरपूर येतो मात्र व्यर्थ विनाकारण गोष्टींवरती पैसा जर खर्च होत असेल तर हा पैसा टिकून ठेवण्यासाठी पैशांमध्ये वाढ घडून आणण्यासाठी आपण हा लाल चंदनाचा देवघरासमोर एक छोटासा उपाय करा. 

हे लाल चंदन तुम्हाला पूजेच्या दुकानांमध्ये किंवा किराणा दुकानांमध्ये अगदी सहज मिळू शकत. आपण थोडसं लाल चंदन घ्यायच आहे. आणि आपल्या देवघरासमोर एक छोटासा पाठ मांडून त्यावरती पिवळ्या रंगाच वस्त्र एक पिवळा कपडा अंतरायचा आहे. आणि त्यावरती हे लाल चंदन ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपण माता लक्ष्मीची  मनोभावे पूजा करा. 

या पिवळ्या कपड्यांमध्ये लाल चंदन आपण व्यवस्थित बांधा   आणि पोटली करा. ही पोटली दिवसभर त्याच ठिकाणी ठेवून आपण दुसऱ्या दिवशी मध्ये शुक्रवारी आपल्या धन ठेवण्याच्या जागी म्हणजे आपली तिजोरी असेल कपाट असेल गल्ला असेल त्या ठिकाणी ही पोटली ठेवून द्या. किंवा तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ही कुठली ठेवू शकता. 

जो काही विनाकारण खर्च होतो हा खर्च बंद होऊ लागेल. आणि तुमचं पर्स पॉकेट तिजोरी कधीच रिकामी होणार नाही. अत्यंत चांगला आणि शुभ असा हा उपाय आपण करू शकता. मित्रांनो समाजामध्ये मान सन्मानाची प्राप्ती होणे हे सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे. समाजात जर तुम्हाला लोक मानत नसतील किंवा कुटुंबामध्ये तुमचा मान ठेवत नसतील. 

कुटुंबामध्ये तुमची मानहानी होत असेल  लोक तुमचा अपमान करतात. योग्य तो मान तुम्हाला देत नाही तसं वाटत असेल तर या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या जवळपास असणाऱ्या कोणत्याही लाल रंगाच्या गोमातेस आपण एक रोटी त्यावरती गुळाचा एक छोटासा खडा ठेवून ती खाऊ घाला व मातेला उजव्या हाताने आपण ही रोटी खाऊ घालायची आहे. आणि मनोभावे गोमातेच्या पाठीवरून हात फिरवा. 

शक्य नसेल तर आवश्यकता नाही मनोभावे हात जोडून आपण आपली इच्छा गोमातेसमोर व्यक्त करायची आहे. गोमातेमध्ये ३३ कोटी देवता वास करतात. आणि म्हणूनच हा उपाय अत्यंत श्रेष्ठ ठरतो समाजामध्ये मानसन्माजनाची प्राप्ती होण्यासाठी. 

मित्रांनो सोबतच सायंकाळच्या वेळी आपण कोणत्याही किंवा विशेष करून माता लक्ष्मीच्या मंदिरात जाव आणि त्या ठिकाणी एखाद्या गोर गरीब व्यक्तीला काही ना काही तरी वस्तूच दान कराव पण पैसेसुद्धा मतदान करू शकता. याने सुद्धा विशेष लाभ प्राप्त होतात. समाजामध्ये माण सन्मान वाढतो. 

आपण सकाळच्या वेळी पिंपळाच्या वृक्षाचे पाणी घालाव आणि आपली मनोकामना बोलून दाखवावी हा सुद्धा अतिशय चांगला उपाय आहे. मानसन्मान वाढण्यासाठी लहान लहान मुलं असतील तर या लहान मुलांना पण काही ना काहीतरी वस्तूच दान नक्की करा याने सुद्धा मानसन्मानामध्ये वाढ होते.

मित्रांनो जर घरामध्ये सातत्याने वादविवाद होत असतील लोक एकमेकांशी भांडतात मानसिक शांतता उरलेली नाहीये जीवनामध्ये तर अशावेळी मानसिक शांतता लाभावी समाधान लाभाव यासाठी या गुरुपुष्यामृत योगा सारख्या दुर्लभ योगावरती आपण भगवान शिव शंकराची माता पार्वती भगवान श्री गणेश आणि स्वामी कार्तिकेय यांच्यासह पूजा आणि गोरगरिबांना पिवळ्या वस्तूंचा दान करा. 

मित्रांनो हा छोटासा उपाय आपल्या कुंडलीतील अनेक अशांत ग्रहांना शांत करतो. होय हे ग्रह हे आपल्या मानसिक अशांतीला जी काही आपली चंचल अवस्था आहे त्यास कारणीभूत असतात. आणि म्हणून हा छोटासा उपाय मानसिक शांती प्रस्थापित करतो. आपल्या घरातील वातावरण हे संवाद पुराने प्रेमाचं बनवतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *