नमस्कार मित्रांनो.
३० ऑगस्ट सोमवारच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे. याला गोकुळाष्टमी सुद्धा म्हटले जाते. कंसासारख्या दृष्टाचा वध करणारा, द्रौपतीची विटंबना होत असताना रक्षणासाठी धावून येणारा, महाभारतात अर्जुनाचा साठी व त्याला गीतेचे तत्वज्ञान देणारा भगवान म्हणजेच श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी.
मित्रांनो या दिवशी हा उत्सव भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा हा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. मित्रांनो श्रावण पक्षामध्ये रोहिणी नक्षत्राला मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला. मित्रांनो रोहिनी नक्षत्रामध्ये आपण जे काही कार्य करतो त्यात आपल्याला यश नक्की मिळते. त्यामुळे याकाळात आपण शुभ आणि महत्वाची कामे केली तर आपल्याला यश नक्की मिळत.
या दिवशी श्रीकृष्णाची विधिवत पूजा केली जाते त्यांची आरती केली जाते आणि त्यांना आवडता नैवेद्य दाखवला जातो. पण अश्यावेळी काही चुका आहेत ज्या आपण करायच्या नाही आहेत. नाहीतर त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. तर जन्माष्टमी च्या दिवशी कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहे ते आपण बघणार आहेत.
श्रीकृष्ण यांचा २४ अवतारपैकी श्रीकृष्ण हा एक अवतार मानला जातो. आणि श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. म्हणून पूजेत तुळशीचा वापर अवश्य करावा. तुळशीला विष्णूप्रिय असेही म्हटले जाते. श्रीकृष्णाच्या पूजेत तुळस ही अत्यन्त आवश्यक असते. एकादशी तिथी किंवा जन्माष्टमी तिथी असेल तेव्हा श्रीहरी विष्णू आणि कृष्णाला तुळशीपत्र अर्पण केले जाते.
मित्रांनो पण एक लक्षात ठेवा की, तुळशीपत्र आपल्याला कधीही जन्माष्टमीच्या दिवशी तोडायचे नाही आहे. एक दिवस आधी आपण तोडून ठेवायचे आहे आणि ते तुळशीपत्र कृष्णाला अर्पण करायचे आहे. अनेक लोक एकादशीच्या दिवशी किंवा जन्माष्टमीच्या दिवशी ते देवाला अर्पण करतात पण असे करू नका.
दुसरी चूक जी आपल्याला जन्माष्टमी च्या दिवशी करायची नाही. ती म्हणजे या दिवशी आपल्याला कोणतेही झाडे झुडपे काटायची नाही आहे. आपण आपल्या घरातील किंवा गार्डन मधील झाडांची सुद्धा छाटणी या दिवशी करू नका. त्याचसोबत मांसाहार किंवा मद्यपान सुद्धा या दिवशी करू नका याला आपल्या शास्त्रामध्ये निषिद्ध मानले गेले आहे. पुढची गोष्ट म्हणजे गोरगरीब किंवा ज्या व्यक्तीकडे धन नाही त्यांचा अपमान करू नका. यामुळे आपण जर या दिवशी गोरगरिबांचा अपमान केला.
तर श्रीकृष्ण आपल्यावर नाराज होतात त्यांची कृपा आपल्यावर होत नाही आणि श्रीकृष्ण आपल्यावर नाराज झाले तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर नाराज होते आणि परिणामी आपल्या धनात कमतरता येते.
पुढची गोष्ट म्हणजे गायीचा अपमान करू नका कारण हिंदू धर्मात गायींना देवी मानली आहे त्यांच्यात सर्व देवी देवतांचा वास असतो. मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की गायी भगवान श्रीकृष्ण यांना किती प्रिय आहेत.
गायीची पूजा करणाऱ्यांवर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. त्याला आशीर्वाद देतात तर दुसरीकडे गायीचा अपमान करणाऱ्याला भगवंत कधीच माफ करत नाहीत. शक्य असेल तर या दिवशी गौशाळेत जाऊन गायींना अन्न दान करा आणि जखमी गायीची सेवा करून तिला चारा दिल्याने सुद्धा श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात. ज्या घरात श्रीकृष्णची पूजा व आराधना केली जाते. त्या घरावर माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद असतो. कारण माता लक्ष्मी ही सुद्धा विष्णूची पत्नी आहे आणि विष्णू हे श्रीकृष्णाचा अवतार आहे.
म्हणून जेथे श्रीहरी विष्णू असतील तेथे माता लक्ष्मी असणारच जर तुम्हाला असे वाटत असेल की, आपल्यावर धनाचा वर्षाव व्हावा आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा व्हावी तसेच श्रीहरी विष्णू यांची कृपा व्हावी तर या जन्माष्टमीला तुम्ही या चुका करू नका. जर श्रीहरी विष्णु ची कृपा आपल्यावर झाली तर माता लक्ष्मी आपल्यावर पसन्न होणारच. तर मित्रांनो या होत्या काही चुका ज्या आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी चुकूनही करु नाही.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी व्हायरलचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी व्हायरल कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.