Skip to content

३ दिवसात चेहरा उजळण्यासाठी सापडला एक सोपा उपाय, जाणून घ्या तुम्हीही.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो अनेक लोक खूप सुंदर असतात, त्यांची सुंदरता पाहून अनेकांना त्यांचा हेवा वाटत असतो. काही लोकांचा रंग काळा,सावळा असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील डाग वाढत राहतात. भरपूर उपाय करूनही ते डाग सहज जात नाहीत, त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग आपण कुठे बाहेर जाताना आपल्या सौंदर्या कडे आपण  जास्त लक्ष देतो. 

मित्रहो तुमच्या समस्येवर आता एक सोपा उपाय मिळाला असून हा उपाय नैसर्गिक असल्याने कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय. भरपूर व्यक्तींच्या चेहऱ्यावर पिंपल असतात, काळे डाग असतात तसेच काही जणांच्या चेहऱ्यावर वांग असतो. हे चेहऱ्यावर येण्याचे टाळण्यासाठी आपण मार्केट मधील क्रीम चा उपयोग करतो.

पण आपल्या चेहऱ्यावर त्याचा काहीही फरक पडत नाही. उलट त्यामुळे आणखीन चेहरा खराब होतो, अशा या समस्यांना दूर करण्यासाठी व चेहरा गोरा करण्यासाठी आज एक सोपा उपाय आपण जाणून घेऊ. जो घरातील उपलब्ध वस्तूंचा वापर करून हा उपाय पूर्ण करता येईल. या उपायांमुळे अवघ्या तीन दिवसात चेहरा उजळ बनेल व चेहऱ्यावर असणारे डाग पण निघून जातील.

या उपायासाठी लागणार आहे काकडी, दही, बटाटा व हळद या चार वस्तू आपणाला लागणार आहेत. आपण दोन चमचे दही घ्यायची आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. तसेच बटाटा व काकडी खिसून घ्यायची आहे, जेणेकरून याचा रस काढता येईल व हा रस या मिश्रणात टाकून द्यायचा आहे. 

हे सगळे मिश्रण एकजीव होईल अशा पध्दतीने चमच्याने एकत्र करायचे आहे. ते एकत्र झाल्यावर काहीवेळा साठी त्याला तसेच राहू द्यावे, व नंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून जवळपास पंधरा ते वीस मिनिटं ते चेहऱ्यावर तसेच राहू द्यावे व नंतर थंड कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. 

जरी हे मिश्रण चेहऱ्यावर रात्री झोपताना लावले व सकाळी उठल्यावर चेहरा धुतला तरी काही अडचण येत नाही. चेहरा अगदी सुंदर आणि मऊ बनतो. चेहऱ्यावर एक निराळाच ग्लो येतो आणि चेहरा खूपच छान वाटतो. सगळे डाग निघून जातात, चेहऱ्यावर असणारे पुरळ, पिंपल वगैरे सगळं काही निघून जाते. चेहरा तेजस्वी बनतो, चेहऱ्याचा रंग गोरा होतो.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुंदर चेहऱ्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. बाहेर जाताना, लोकांच्यात वावरताना आपल्यातील न्यू-नगंड नाहीसा होतो. तसेच हा उपाय नैसर्गिक असल्याने याचा कोणताच वाईट परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत नाही. 

आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा. आजचा हा लेख आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *