Skip to content

५ जून पासून शनीची या राशींवर वक्र दृष्टी, या राशींच्या अडचणीत वाढ. अडचणी कमी करण्यासाठी करा हे उपाय.

  • by

नमस्कार मित्रांनो.

भगवान महादेवाच्या कृपेने न्यायदेवतेचा स्थान प्राप्त झालेले शनिमहाराज येत्या ५ जून पासून वक्री होणार आहेत. शनिदेव ५ जून पासून कुंभ राशीत वक्री होणार आहेत आणि याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. शनीची अशुभ दृष्टी टाळण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या वर्षी सोमवारी ३० मेला शनि जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय करण आवश्यक आहे.

जेणेकरून त्याचा प्रभाव टाळता येईल. मग कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर शनीदेवांची वक्रदृष्टी होणार आहे आणि काय करायचे आहेत उपाय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. ५ जून पासून कुंभ राशीत शनीदेवांच वक्री होण जवळपास सर्वच राशीवर परिणाम करणार आहे. पण काही राशींवर याचा विशेष प्रभाव पडेल.

जस की मीन राशीला साडेसाती सुरू होईल. कुंभ राशीच्या दुसऱ्या चरणात साडेसाती राहील. साडेसातीचा शेवटचा टप्पा मकर राशीत असेल. मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. कर्क आणि वृश्चिक राशीत शनी ढिय्या अर्थात अडीच किची  सुरुवात होईल. पण मग शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करायचे ते आता बघूया. 

ज्या राशीत शनी आहे किंवा ज्यांच्यावर शनीदेवांची वक्रदृष्टी पडत आहे. त्यांनी शनिदेवांचा प्रकोप कमी करण्यासाठी, शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. त्यामध्ये आता ३० मेला शनि जयंती आहे, त्या दिवशी भगवान शनि महाराजांची विधिवत पूजा करणे आवश्यक आहे.

शनिदेवांना निळा आणि काळा रंग प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी शनी देवाच्या मंदिरात जाऊन निळ्या  रंगाची फुले  त्यांना अर्पण करावी. रुद्राक्षाची जपमाळ धारण केल्याने सुद्धा शनिदेवांचा वाईट गोष्टीचा प्रभाव कमी होतो. शनि जयंतीच्या दिवशी शनी देवाच्या मूर्तीसमोर बसून किंवा शनी देवांच्या मंदिरात जाऊन शनि मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. 

ज्यामुळे शनीची साडेसाती की ढिय्या याचा प्रभाव कमी होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाच शनिदेवांना प्रसन्न करायचा असेल तर तुमच्या आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांना आणि आई वडिलांना त्रास देणाऱ्या लोकांवर शनिदेव कधीही प्रसन्न होत नाही, हे लक्षात ठेवा. 

शनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तूंच गरजू व्यक्तींना दान करणे सुद्धा खूप फायद्याचे ठरत. यामध्ये काळे तिळ, काळे उडीद किंवा मोहरीच्या तेलाचा समावेश होऊ शकतो. गरीब असय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव निश्चितच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.

शनि जयंतीच्या दिवशी दारूचे सेवन चुकूनही करू नका. मांसाहारी लोकांनी मांसाहार सुद्धा त्यादिवशी वर्ज्य करावा. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही यापैकी कुठलाही एक उपाय करू शकता आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाच हे सगळे उपाय शनी जयंतीला तर कराच. 

पण त्याशिवाय हे सगळे उपाय तुम्ही कुठल्याही शनिवारी सुद्धा करू शकता किंवा दर शनिवारी करू शकतात. यातला कुठलाही एक उपाय नित्यनेमाने दर शनिवारी केला, तरीसुद्धा शनिमहाराजांची कृपा तुमच्यावर होते आणि तुमची संकटे दूर होतात अस म्हटल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *