नमस्कार मित्रांनो.
कार्तिकी पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार असून ते खग्रास पद्धतीने भारतात दिसणार आहे. ऐन दिवाळीत सूर्यग्रहण झाल होत. आता तुळशीच्या विवाहाला चंद्रग्रहण होतय. आणि याचा तीन राशींवर अतिशय प्रतिकूल परिणाम होणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी आणि कसा होणार आहे प्रतिकूल परिणाम, कारण २०० वर्षांनी असा योग येतो आहे. त्यामुळे त्या तीन राशींना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.
घाबरू नका काळजी करू नका. कारण शेवटी आम्ही उपाय सुद्धा सांगणार आहोत. जो तुम्हाला चंद्रग्रहणामध्ये करायचा आहे. त्यामुळे तुमचा हा काळ सुखकर होईल. चला तर मग सुरुवात करुया. चंद्रग्रहणाची सुरुवात म्हणजेच ग्रहण स्पर्श भारतात दिसणार नाही. तर ग्रहणाचा मोक्ष दिसेल. हे चंद्र ग्रहण मेष राशीत होणार आहे.
ग्रहण स्पर्श दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटांनी, ग्रहण मध्य दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी, आणि मोक्ष संध्याकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी आहे. २०२२ या वर्षातील हे शेवटच चंद्रग्रहण आहे. जे ८ नोव्हेंबरला होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण आपल्याला ग्रस्तोदय रूपात आपल्याला संपूर्ण भारतात दिसेल.
त्याचबरोबर या चंद्रग्रहणामध्ये २०० वर्षानंतर दोन प्रतिकूल योगही तयार होत आहेत. या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना काळ समस्याकारक आणि अडचणींचा ठरू शकतो. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार १५ दिवसात दोन ग्रहण लागण म्हणजे फारस शुभ मानल जात नाही. ज्योतिष शास्त्रानुसार शनी आणि मंगळ समोरासमोर आल्यामुळे शडाष्टक योग नीचभंग अशुभ योग तयार होत आहेत.
त्याचबरोबर हा योग मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात असेल. आणि त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्तींना चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. वर्षातील शेवटचा चंद्रग्रहण याच राशीत आहे. या काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल.
१) मेष रास- कार्यालय कार्यक्षेत्रातील वरिष्ठ किंवा इतर कोणाशी तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे जरा सावध राहा. बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुद्धा मतभेद होऊ शकतात. याशिवाय तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोड थांबा ही वेळ योग्य नाही. भागीदारीच्या कामातही तुम्हाला नुकसान होऊ शकत.
आता एवढ सगळ ऐकल्यानंतर तणाव घेऊ नका. शेवटी उपाय सुद्धा सांगत आहोत. पण त्याआधी बघूया की दुसरी कुठली रास आहे ज्यांना सावध राहण्याची गरज आहे. तर ती आहे तुळ रास.
२) तूळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना सुद्धा चंद्रग्रहणात सावध राहण्याची गरज आहे. तूळ राशीत केतू विराजमान आहे आणि येणाऱ्या काळात काही गोष्टी त्रासदाय ठरू शकतात. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत अनेक अडथळे सुद्धा येऊ शकतात. व्यवसायिकांसाठी खूप आव्हानात्मक असा हा काळ ठरू शकतो. त्यामुळे वाहन जपून चालवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो.
३) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण संमिश्र असेल. कुठलीतरी भीती तुम्हाला सतावू शकते. कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा एखाद्या गोष्टीचा तणाव तुमच्यावर असेल. जुन दुखण उफाळून येईल. व्यवसायातील कोणताही मोठा करार अंतिम टप्प्यात येईपर्यंत थांबू शकतो. शनी साडेसातीचा प्रभावही धनु राशीवर सध्या सुरू आहे.
आणि म्हणूनच धनु राशीच्या व्यक्तींना सुद्धा सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आता या तीन राशी मेष तूळ आणि धनु यांना सावध राहण्याची गरज आहे. हे तर आपल्याला कळल. पण त्याचबरोबर उपाय काय तर सगळ्यात महत्त्वाच चंद्रग्रहणाचा जो काळ आहे.
त्या काळामध्ये तुम्हाला काही स्तोत्र आणि मंत्र म्हणायचे आहेत. जर तुम्ही चंद्रग्रहणाच्या काळामध्ये हनुमान चालीसा म्हटली तर ती तुम्हाला लाभदायक ठरेल. त्याचबरोबर तुम्ही कुलदेवतेच्या नावाचा जप करा. किंवा तुमची जी कोणी इष्ट देवता असेल त्या इष्ट देवतेच्या तुम्ही मंत्राचा किंवा स्तोत्त्राचा जप करा. त्याचबरोबर रोज आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण किंवा जर तुम्ही गुरु मंत्र घेतला असेल तर गुरु मंत्राचा जप किंवा जी कुठली तुमची ईस्ट दैवता आहे.
त्या इष्ट देवतेच्या मंत्राचा जप करत जा. कारण आपण रोज जी साधना करतो ती आपल्याला अशावेळी मदत करते. स्वामी पाठीशी असतील तर तुम्हाला कुठलीही ग्रहपिडा होऊ शकणार नाही. म्हणूनच तुमचे गुरुदेव तुमचा इष्टदेव किंवा तुमची कुलदेवता यांच्यासाठी साधना करत रहा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.