Skip to content

जगाचा सत्यानाश करणाऱ्या हिटलरने एक चांगली गोष्ट केली फंटा काढला

  • by

नमस्कार मित्रांनो.

फंटाचा शोध एका मजबुरीतून लागला होता हे तुम्हाला ठाऊक आहे का? तेही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाजी जर्मनीमध्ये आज आम्ही सांगतोय फंटाच्या जन्मकथेविषयक. नमस्कार मित्रांनो अमेरिकेत १८८६ साली कोकाकोलाचा शोध लागला. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत अफाट लोकप्रियता मिळवल्यानंतर कोकाकोलाने युरोपमध्ये हातपाय पसरवायला सुरुवात केली होती. तिथे आणि विशेषतः जर्मनीत हे ड्रिंक सर्वांना आवडल. १९३३ साली ज्यावेळी जर्मनीमध्ये हिटलर आणि त्याची नाजी पार्टी हळूहळू सगळी सत्ता केंद्र ताब्यात घेत होती. 

त्याचवेळी मॅक्स काईट नावाच्या माणसाने कोकाकोलाचा  जर्मनीतील प्रमुख म्हणून सूत्र हातात घेतली. हा अतिशय महत्त्वाकांक्षी माणूस होता. शिवाय त्याच्याकडे व्यवहार चातुर्य होत. त्याच्याच नेतृत्वाखाली १९३३ ते १९३९ या कालावधीत कोकाकोलाची विक्री एक लाखांपासून ४५ लाखांपर्यंत गेली. काईटने अतिशय आक्रमकपणे राबवलेल्या मार्केटिंगच्या धोरणामुळे या विक्रीमध्येही विक्रमी वाढ झाली होती. 

मार्केटिंगची कुठची धोरण राबवताना त्याला कुठलाही बरा किंवा वाईट मार्ग वर्ज नव्हता. कंपनीच भल होतय का? हा एवढाच विचार धोरण राबवताना तो करत असे. हिटलरने भांडवलशाही अमेरिकेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कोको कोलावर बंदी आणू नये. 

यासाठी काइटने नाझी पक्षाशी जवळीक साधून चांगले संबंध प्रस्थापित केले होते. १९३६ साली जर्मनीतील बर्णील इथे खेळवण्यात आलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये अधिकृत जाहिरात दारांच्या यादी कोकाकोला सर्वात पुढे होता. हिटलरने ज्या वेळी ऑस्ट्रेलिया पोलंड या देशांवर हल्ले करून ते देश ताब्यात घ्यायला सुरुवात केली. 

त्यावेळी अतिशय धूर्त आणि धंदेवाईक असणाऱ्या काइटने जर्मन सैन्याच्या पाठोपाठ कोकाकोला कंपनीलाही या देशांमध्ये चंचू प्रवेश मिळवून दिला. काईटच्या अमेरिकन वरिष्ठांनीही यावर कधीच आक्षेप घेतला नव्हता. काइट कंपनीला फायदा मिळवून देतोय यावरच ही मंडळी खुश होती.

 १९४० साल उजाडेपर्यंत दुसरे महायुद्ध ऐनभरात आल होत. युद्धाच्या धामधुमीतही काईटच्या कोकाकोलाने संपूर्ण मार्केट वर आपला ताबा मिळवला होता. त्या काळात कोपच्या जाहिरातीने युरोपात धुवून उडवली होती, जर्मन लोक त्यांच्या दारू. पिण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.

पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हिटलर दारूच्या थेंबाला देखील स्पर्श करायचा नाही. शिवाय तो शाकाहारी होता अस म्हणतात की, युद्धाच्या धुमस चक्रेत कधी पावलावर मिळालाच तर तो कोकाकोलाचा आस्वाद घ्यायचा. 

१९४१ साली जपानने अमेरिकेच्या पोल हार्बरवर बॉम्ब टाकला आणि अमेरिका देशांक विरुद्ध युद्धात उतरली.

याचा अर्थ असा की त्या देशाबरोबरचा अमेरिकेचा व्यापारही बंद झाला. याचा सर्वाधिक फटका बसला तो कोकाकोला कंपनीला. कोकाकोलाच्या जर्मनीमधल्या फॅक्टरीला अमेरिकेतून करण्यात येणारा कोकाकोला सिरपचा पुरवठाही थांबला.

ते सिरप बनवण्याची पद्धत या काळात गुपित ठेवण्यात आलेली असल्याने जर्मनीत ते बनवणे देखील अशक्य होत. सिरपच्या अभावी जर्मनीमधले कोकाकोलाचे कारखाने बंद पडू लागले. मात्र काइट हा माणूस काही हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. शिवाय कंपनीत काम करणाऱ्या हजारो कामगारांची जबाबदारी ही त्याच्यावरच होती. 

त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून कंपनीच्या केमिस्टन हाताशी धरून नवीन ड्रिंक बनवण्याचा निर्णय काईटने घेतला सर्व तयारी सुरू केली. परंतु युद्धामुळे ड्रिंक बनवण्यासाठीचा कच्चा मालच मिळत नव्हता. शेवटी नाईलाज म्हणून त्याने बाकीच्या फूड इंडस्ट्रीज मधून उरलेल्या पदार्थांना एकत्र करून एक ड्रिंक बनवल. 

यामध्ये विशेषतः सफरचंदाचा पल आणि चीज बनवल्यानंतर उरलेल्या वेळी या पदार्थाचा समावेश होता. कमीत कमी कारखाने तरी सुरू राहतील. हा या मागचा विचार होता, ड्रिंक तयार झाल. पण आता प्रश्न असा होता की या पेयाच नाव काय ठेवायच. 

काईटने मीटिंग बोलवली आणि सांगितल की तुमच्या कल्पनांना भरारी येऊद्यात. आणि या ड्रिंक साठी एक भन्नाट असं नाव सुचवा. लेट यू फॅनटीसी रन वाईल्ड अगदी हेच काईटचे शब्द होते. आणि हेच शब्द त्याच्या नव्या ड्रिंकला नाव पण मिळून देणार होते. 

काईटच वाक्य ऐकून एका म्हाताऱ्या सेलस्मनने वाक्यातल्या फँटीसी या शब्दावरून फंटा हे नाव सुचवल. आणि विशेष म्हणजे ते सगळ्यांच्या पसंतीस उतरले. बाजारात दाखल झाल्यानंतर अगदी अत्यल्प काळातच हे पेय जर्मनीमध्ये प्रसिद्ध झाल.

फंटा ओर नथिंग म्हणजेच फंटा नाही तर काहीही नाही असच त्या काळातल्या मार्केटचे वर्णन करण्यात आले. त्यानंतरच्या काळात दुसऱ्या महायुद्धात अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांकडून जर्मनीचा पराभव झाला. जर्मनीमध्ये कोकाकोलाचे उत्पादन पुन्हा पूर्ववत सुरू झाल. युद्धकाळात कंपनी बंद पडायला नको. म्हणून सुरू करण्यात आलेल्या उत्पादन बंद करण्यात आल. 

१९५० च्या दशकात जेव्हा पेप्सीच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या कोकाकोलाच्या स्पर्धा करू लागले. त्यावेळी कंपनीचा अधिकाऱ्यांना जर्मन फंटाची आठवण झाली. आणि १९५५ साली त्रुटी सोडाच्या स्वरूपात नव्याने फंटा लॉन्च करण्यात आल. विशेष म्हणजे जर्मनी प्रमाणेच जगभरातल्या लोकांनी ते स्वीकारल. 

सध्या फक्त सफरचंदच नाही तर इतर फळांच्या फ्लेवर मध्ये ही फंटा मिळतो. मात्र सगळ्यात जास्त गाजलाय तो ऑरेंज फ्लेवर. आज फंटाचा ऑरेंज फ्लेवर आज फंटाची ओळखच ऑरेंज ड्रिंक बनली आहे. तर फंटाची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *