Skip to content

तुमच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर

  • by

नमस्कार मित्रांनो.

देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास आपल्या घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते. आपल्याला चांगले आरोग्य लाभते. आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही.

बहुतांश लोकांकडे देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते. पण काहीच लोकांना ती मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवावी. याबद्दल माहिती नसते. म्हणूनच आता आपण देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवावी. याबद्दल माहिती पाहूया.

देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती फक्त अंथरलेल्या वस्त्रावर कधीही ठेवू नये. मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम तांब्याची किंवा पितळी ची ताटली किंवा वाटी घ्यावी. आणि त्या वाटीमध्ये गहू किंवा तांदूळ घालावेत. आणि त्यानंतर त्या गहू किंवा तांदूळवर हळद-कुंकू वाहवे.

आणि त्यावर श्री अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी श्री अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता आहे. म्हणूनच अन्नपूर्णा देवीची मूर्ती धान्यावर ठेवण्यास विशेष महत्त्व आहे. अशा या देवघरामध्ये ठेवलेल्या अन्नपूर्णा देवीची दररोज यथासांग पूजा अर्चना केली पाहिजे.

शक्य झाल्यास दररोज किंवा दर आठवड्याला श्री अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती खाली असलेले गहू किंवा तांदूळ बदलले पाहिजे. जुन्या गहू किंवा तांदूळ यातील काही भाग हा आपल्या घरातील धान्यांमध्ये घातला पाहिजे. आणि काही भाग हा पक्ष्यांना खाण्यासाठी दिला पाहिजे.

तसेच अन्नपूर्णा देवीची उपासना करताना अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र ही म्हटले पाहिजे. अशाप्रकारे श्री अन्नपूर्णा देवीची उपासना केली असता. श्री अन्नपूर्णा देवीची आपल्या घरावर अखंड कृपा दृष्टी राहते. व आपले कुटुंब सुखी व समाधानी राहते.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *