Skip to content

मुंगूस दिसताच करा हे एक काम खूप शुभ व मंगल घडेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मात बऱ्याच प्राण्यांविषयी शुभ किंवा अशुभ संकेत दिले जातात. आपण गाय, कावळा, कासव अश्या कितीतरी प्राण्यांचा संबंध देवासोबत जोडतो. व ते खरेही आहे प्रत्येक प्राण्यांचा काही न काही संबंध हा थोडातरी देवासोबत असतो. आज आपण मुंगूस या प्राण्यांविषयी जाणून घेणार आहोत. मुंगूस दिसणे हा एक खूप शुभ संकेत मानला जातो. मुंगूस चे दर्शन करणे म्हणजे साक्षात भगवंत श्री हरी विष्णू यांचे दर्शन करण्यासारखे आहे. 

ज्या दिवशी आपल्याला मुंगूस दृष्टीस पडते तेव्हा असे समजावे की आजचा दिवस आपल्याला खूप शुभ जाणार आहे. आपण जे काही कार्य करणार आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळतेच. मुंगूस आपल्याला दिसले की सात दिवसाच्या आत धनलाभ नक्की होतो. कोणत्याही कारणाने आपल्याला पैसे जरूर मिळतात. आपण घराबाहेर कोणत्याही कार्यनिमित्त बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूस मुंगूस दिसणे हे अगदी शुभ असते सोबतच मुंगूस व साप यांचे भांडण बघणेही खूप शुभ असते. 

ज्या घरात मुंगूस असते त्या घरात भगवान विष्णूसोब साक्षात लक्ष्मी मातेचा वास असतो. म्हणून आजकाल घरामध्ये मुंगूस पाळले जातात. मुंगूस ज्या घरामध्ये राहतात त्या घरात सापाची भीती उरत नाही. साप आणि मुंगूस सोबत दिसणे तर खूप शुभ असते. आज आपण या  मुंगूस संबंधित एक उपाय बघणार आहोत. आवल्या शुभ अशुभ मानणाऱ्या शास्त्रामध्ये मुंगूस वरील शुभसंकेत व त्यावरील उपायांवर माहिती दिली आहे. 

ज्या प्राण्याकडे किंवा वनस्पती कडे पाहून आपल्याला आनंद होतो ते प्राणी आपल्यासाठी शुभ असतात. व ज्या प्राणी किंवा वनस्पती कडे पाहून आवल्याला भीती वाटते किंवा त्रास होतो ते प्राणी आपल्यासाठी अशुभ असतात. असा चुकीचा अर्थ लावला जातो. प्रत्येक उपाय करताना त्या प्राण्यांचा व वनस्पती चा काही न काही अर्थ असतोच. चला तर पाहूया मुंगूसचा धनसंपत्ती आणि सफलता मिळवून देणारा उपाय.

जर आपण कोणत्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असतो आणि आपल्या वाटेत आडवे मुंगूस गेले तर त्या ठिकाणची माती घेऊन लगेचच घरी परतावे. त्या मातीत आणखी थोडी माती मिसळून ती माती देवासमोर ठेवावी व वाटीसमोर अगरबत्ती व दिवा लावावा. जोपर्यंत ती अगरबत्ती पूर्ण बळत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा. व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामासाठी परत जावे. 

असे केल्याने आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील आपली अडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. आपल्या सर्व अडचणी व त्रासापासून आपली  सुटका होईल. जे काम करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत होता व त्यात नेहमी अपयश येत होते ते कामही मार्गी लागेल. ज्या काही नकारात्मक घटना घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील. 

नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल म्हणजे सर्व बाजूने फक्त आणि फक्त सकारात्मक फायदा होईल. हा उपाय खूप प्रभावी आहे. मातीची वाटी जोपर्यंत आपल्या मनाला वाटेल तोपर्यंत घरात ठेवावी नंतर ती माती झाडाच्या कुंडीत टाकून द्यावी. हा उपाय करा व आपले जीवन सकारात्मकतेने व धनाने  परिपूर्ण करा.

मंडळी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी टाइम्स कोण-तयाही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *