Skip to content

या मकर संक्रातीला चुकूनही दान करू नका या २ गोष्टी घरातील गरिबी आणि दरिद्री येईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मकर संक्रांतीला केलेला दान हे खूपच फायद्याचा मानलं जातं. आज आपण पाहणार आहोत. मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टीचं दान हे शुभ मानलं जातं. तसेच कोणत्या गोष्टी दान करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.

सूर्य देवतेच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याला संक्रांत म्हणतात. सूर्याचा मकर राशीत संक्रमण होतं म्हणूनच या संक्रातीला मकर संक्रांति असं म्हणतात. मकर संक्रांतीला दानधर्म करणे याला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी दान केल्याने खूप सार्‍या पापांचे क्षालन होतं. 

मकर संक्रांतीला तिळाचे दान हे विशेष मानला जात. या तिळाना धार्मिक कार्यामध्ये देखील वापरले जातात. कारण हे तिळ शनीच द्रव्य आहे. मकर संक्रांतीला सूर्य एक महिना शनी मकर राशीमध्ये राहतात. शनिदेव न्याय आणि पूर्वजन्मीच्या पापांचे प्रायश्चित्त घडवून आणतात. 

म्हणूनच या दिवशी तिळाचे दान केल्याने आपल्या पूर्वजन्मीच्या पापाचे आपली सुटका होते. राहू व केतू हे देखील शनीचे शिष्य आहेत. त्यामुळे ज्या कोणाला राहू केतूची साडेसाती चालू असेल त्यांनी या मकर संक्रांतीला तिळाचे दान अवश्य करा. जेणेकरून राहू-केतू ची साडेसाती कमी व्हायला त्यांना मदत होईल. 

तसेच तिळाच्या दाण्याने शनी राहू केतू यांची दोष दूर होतात. आणि शनिच्या साडेसाती पासून देखील सुटका होते. गरिबांना या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू करून खायला दिल्यास विविध व्याधींपासून आपली मुक्तता होते. तसेच या दिवशी तांदूळ गहू यांच्या दानालाही विशेष महत्त्व आहे. 

शास्त्रात सांगितलेले आहे जो व्यक्ती एखाद्या गरजू व्यक्तीला ज्याला खरंच गरज आहे. अशा व्यक्तीला या तांदूळ आणि गव्हाचं दान करतो. त्याला जीवनात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. अशा लोकांच्या घरात कसलेही अपघात घडत नाही. कोणाचाही अकाली मृत्यू या घरात होत नाही.

 तसेच या दिवशी दीपदान केलं म्हणजे एखाद्या मंदिरात किंवा सरोवर नदी तलावामध्ये दिवा प्रज्वलित करून दीपदान केल्याने आपल्या डोळ्यात संबंधित एखादी विकार असतील तर ते कमी व्हायला देखील या दीपदानाने मदत होते. आजारी व्यक्तींना तुम्ही जर औषधांचा दान या संक्रांतीच्या दिवशी केल. 

तर खूप सार्‍या आजारांपासून व्याधींपासून आपल आपोआपच रक्षण होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा. दान देताना कधीही मनात चुकीचे विचार घमंड किंवा गर्व येऊ देऊ नका. यांने केलेल्या दानाचा योग्य फळ आपल्याला मिळणार नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही खराब वस्तूंचे दान करू नका.

 म्हणजे जी गोष्ट आपल्यासाठी निरूपयोगी आहे त्या वस्तूंचे दान या दिवशी चुकूनही करू नका. अशा दानाने पुण्य फलाची प्राप्ती तर होणार नाहीच उलट अशुभ फळ त्यांनी आपल्याला मिळतील. आता आपण पाहूयात या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टींचे दान हे अशुभ मानल जात. या दिवशी झाडूचे दान हे चुकूनही करू नका. 

यांने माता लक्ष्मी ही आपल्यावर नाराज होते. या दिवशी झाडूच दान केल्याने आपल्या घरात दरिद्री तर येतेच. परंतु घरातली शांतता देखील याने कमी होते. 

तसेच त्या दिवशी चप्पलच दान देखील करू नका. याने शनि देव नाराज होऊन त्यांची साडेसाती आपल्या मागे लागू शकते. तसेच प्लास्टिक आणि स्टीलच्या वस्तूंचे दान देखील घरात दरिद्री आणते. या दिवशी काळ्या  वस्तूंचे दान देखील अशुभ मानले जाते. 

कारण यामुळे सूर्य देवतेचा कोपाला रागाला आपण निमंत्रण देत असतो. दान हे नेहमी स्वइच्छेने आणि आनंदाने करा. आणि ते देताना योग्य व्यक्तीला द्या. जेणेकरून त्याच शुभफळ हे आपल्याला मिळेल. 

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *