Skip to content

हृदयीस्पर्शी कथा- लग्नाला फक्त ८ दिवस झाले आणि पत्नी माहेरी गेली तर ती पुन्हा परतलीच नाही. कारण

  • by

नमस्कार मित्रांनो.

राहुल संतापाने बोलत होता हॉलमध्ये सर्वजण गप्प गुमान ऐकत होते आणि नेहा खाली मान घालत हुंदके देत रडत होती आणि नेहा चे बाबा राहुलला म्हणाले जावईबापू मला माफ करा मी तुमचा दोषी आहे माझे संस्कार कुठेतरी कमी पडले. त्यांच्या डोळ्यात दोषी पणा साप दिसत होता.

राहुललाही खूप वाईट वाटले, त्यांची काहीही चूक नसताना मुलीच्या चुकीची शिक्षा ते भोगत होते. राहुल त्यांना म्हणाला नाही बाबा दोषफक्त तुमच्या एकट्याचा नाही मुलांना संस्कार आई वडील दोन्ही रुजवतात. आणि मुलीच्या बाबतीत तर आईने तिची मैत्रीण होऊन तिच्या भावना समस्या जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्या सोडवायला पाहिजे.

नेहाचे तर वय अल्लड होते आणि या वयात मुली पोरांकडे खूप लवकर आकर्षित होतात. अश्या मुलींना सर्वस्वी मार्गदर्शन करणे ही सर्वस्वी आईचीच जबाबदारी असते. या प्रकरणात नेहा जितकी दोषी आहे त्याहून दुप्पट तुम्ही दोषी आहात सासूबाई. तुम्हाला या सर्व गोष्टींची जाणीव असूनही तुम्ही तिच्याकडे नीट लक्ष दिले नाही व तिला नीट मार्गदर्शन केले नाही.

असो आता तुम्हाला दोघांना काय तो निर्णय घ्या आणि मला कळवा. मी निघतो आणि राहुल घरी जाण्यासाठी निघाला. नेहाचे बाबा राहुल ला जाताना अडवून म्हणाले थांबा जावईबापू आमची चूक निस्तारण्याची एक संधी आम्हाला दया. तुमच्या सारखा जावई मिळायला नशीब लागत पण आमच्या मुलीला त्याची जाणीव नाही याचीच खंत वाटते. 

नेहाच्या बाबांनी नेहाला विचारले नेहा तू आता काय करायच ठरवल आहे. नेहा रडत होती तिच्या डोळ्यात अपराधी पणाचे भाव स्पष्ट दिसत होते. त्यावर नेहा म्हणाली बाबा मला माफ करा माझ्याकडून चूक झाली आता तुम्ही जो काही निर्णय घेणार तो मला मान्य असेल. त्यावर बाबा म्हणाले निर्णय आम्हाला नाही तुला घ्यायचा आहे. 

नेहा म्हणाली बाबा माझी चूक झाली माफ करा.आणि तुम्ही खर बोललात राहुल सारखा समजदार नवरा मिळायला नशीब लागत. नेहा राहुलच्या पुढे येत हात जोडत म्हणाली मला माफ करा मी स्वतःच्या सुखासाठी सर्वांचा विश्वासघात केला, मला चूक सुधारण्यासाठी एक संधी द्या. नाही नेहा तू परत चूक करतेय मला हे सर्व मान्य नाही. 

हे ऐकून नेहाचे बाबा खाली बसले आता नेहाच्या बाबतीत काहीतरी अशुभ होणार याची काळजी त्यांना वाटू लागली. नेहा राहुल कडे बघत होती तेव्हढ्यात तिला कोणीतरी कानशिलात मारल्याचा अनुभव झाला नेहाच डोक गरगरल व ती सोफ्यावर बसली. थोड्यावेळाने राहुलने नेहाला विचारले नेहा तू प्रेम विपीन वर करते मग संसार माझ्याबरोबर करू शकणार का? 

तू शरीराने माझ्याकडे व मनाने विपिन जवळ असणार म्हणून म्हणतो ज्याच्यावर तू प्रेम करतेस त्याच्याबरोबर संसार कर. मी तुझ्या सोबत आहे तू आधी विपीन ला फोन कर आणि त्याला सांग मला तुझ्यासोबत लग्न करायचेय. नेहाने विपीन ला फोन लावला व फोन स्पीकर वर टाकला समोरून आवाज आला हा बोल नेहा, विपीन मला उद्या तुझ्याशी लग्न करायचेय आपले लग्नासाठी सर्व तयार आहेत.

 विपीन म्हणाला अग तू पागल झाली आहेस का तुझे आता लग्न झालेय चक्क १२ दिवस तू तुझ्या सासरी राहून आलीय आता मी कसा लग्न करू तुझ्याशी? हे ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन सरकली ती म्हणाली काय रे काय बोलतोय तू तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आणि काय रे चार दिवसांपासून आपण भेटतोय ते काय होत.

 मग त्यावर विपीन म्हणाला मी भेटायला येत नाही तू मला बोलवतेस. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी लग्न करेल आग तुझ लग्न झालय तू तुझ्या नवऱ्यासोबत राहून आलीय सॉरी मला माफ कर. असे बोलत फोन कट झाला. नेहासोबत तिच्या घरच्यांना पण धक्काच बसला. 

नेहाच्या मनात विचार आला ज्याच्यासाठी आपण घरच्या लोकांना सोडले व आपल्या नवऱ्याला देखील सोडले त्या व्यक्तीने आपल्याला एक क्षणात परक केल. तेही माझ लग्न झालय अस सांगून. आता आयुष्य संपले अशी नेहाची अवस्था झाली हा सर्व प्रकार नेहाचे बाबा बघत होते.

पुढे काय होणार याची त्यांना भीती वाटू लागली. नेहाच्या बाबाने राहुलला हात जोडले व म्हणाले माझ्या मुलीला स्वीकार करा तिच्यासाठी तुम्हीच योग्य जोडीदार आहेत. नेहानेही राहुलचे पाय पकडले व म्हणाली राहुल मला माफ कर मी ज्या प्रेमामुळे तुला सोडत होते ते प्रेम नव्हतेच फक्त शारिरीक आकर्षन होते. 

प्लिज मला माफ कर भविष्यात अशी चूक माझ्याकडून कधीच घडणार नाही. राहुल ने नेहाला मिठीत घेतले राहुलच्या मिठीत नेहा मनसोक्त रडली आणि काही वेळाने राहुल म्हणाला काय मग नेहा आता आपण निघायचे का आपल्या गावाला? 

नेहाने मान हलवून मी पॅकिंग करते म्हणत होकार दर्शविला. नेहाच्या आईला आपली चूक कळली होती तिने राहुलची माफी मागितली. थोड्यावेळाने नेहा आणि राहुल जाऊ लागले ते बाबाकडे आशिर्वाद घेण्यासाठी वाकले बाबांच्या तोंडातून नकळत निघाले सुखी राहा. त्या नंतर ते घरी गेले नेहा तिची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडू लागली.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *